Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नेत्रदानाची मोहीमच ‘दृष्टीहीन’

$
0
0
राज्यात दोन लाखाहून अधिक अंध व्यक्ती आहेत. यातील पंधरा टक्के अंध व्यक्तींना नेत्रदान मिळाले तर ते पुन्हा सुंदर जग पाहू शकतात. मात्र ते पंधरा टक्के अंध कोण ? याबाबत राज्य सरकारकडे अथवा स्वयंसेवी संस्थांकडे डाटाच नसल्याने अशा अंधांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत.

पॅलेस्टिनवरील हल्ल्याचा निषेध

$
0
0
इस्राईलने पॅलेस्टिननवर सुरू केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज, बुधवारी येवला शहरातील मुस्लिम बांधवानी तहसील कार्यालयावर 'मूक मोर्चा' काढला.

केबीसीच्या ठेवीदारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

$
0
0
केबीसीत पैसे गुंतल्यामुळे हैराण झालेल्या ठेवीदार आणि एजंटांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे गयावया केली. त्यामुळेच गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांशी या सर्वांची भेट करून देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हाधिकारीच घेणार DIC ची झाडाझडती

$
0
0
तब्बल आठ महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जिल्हा उद्योग मित्रची बैठक (झूम) वादळी ठरली. गेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यापासून उद्योजकांच्या इतर समस्यांबाबत यावेळी घमासान चर्चा झाली.

नाशकात वाजणार युवक महोत्सवाचा बिगुल

$
0
0
शहरातील सर्व सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येऊन पूर्वी पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत होणाऱ्या यूथ फेस्टिव्हलच्या धर्तीवर एक भव्य असा नाशिक युवक महोत्सव भरविण्याची तयारी दाखवली आहे. या युवक महोत्सवामध्ये चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत, शिल्प, साहित्य अशा विविध कलांच्या सादरीकरणाचा समावेश करण्यात येणार आहे.

शेंडेंना मूळ सेवेत पाठविणार ?

$
0
0
नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवरील नगररचना सहायक संचालक विनय शेंडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्‍यांच्या मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव बुधवारच्या महासभेत करण्यात आला आहे.

चव्हाणच्या नातलग महिलेची चौकशी

$
0
0
लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झालेल्या भाऊसाहेब चव्हाण याच्या एका नातलग महिलेला गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना शेळके असे तिचे नाव आहे.

राजकीय भाईंनाच सर्वाधिक फायदा

$
0
0
नाशिक महापालिकेच्या बुधवारच्या महासभेत गोदावरी नदीकाठावरील गावठाणातील मिळकतींच्या बांधकामाना परवानगी देण्याचा निर्णयाचा सर्वाधिक फायदा जमिनीच्या व्यवसायात असलेल्या शहरातील सर्वपक्षीय राजकीय भाईनांच होणार आहे.

गावठाणातील बांधकामांना परवानगी

$
0
0
शहरात गोदावरी काठावरील लाल व निळ्या पूररेषे अंतर्गत येणाऱ्या गावठाणातील शेकडो मिळकतदारांना महापालिकेन दिलासा दिला आहे. नदीकाठावरील गावठाणाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आजच्या महासभेत या मिळकतींना बांधकाम परवानगी देण्याचा ठराव मंजूर केला आहे.

इलेक्ट्रिकल लॅबला अखेर मंजुरी

$
0
0
नाशिक येथे प्रस्तावित असलेल्या पश्चिम विभागीय इलेक्ट्रिकल लॅबला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अर्थ समितीने मंजुरी दिली आहे. या लॅबसाठी औरंगाबादरोडवरील शिलापूर येथील १५० एकर जागा निश्चित करण्यात आली असून तिचा ताबा दिल्यानंतर ही लॅब सकारली जाणार आहे.

‘श्रीगणेशा’ पर्यावरणपूरकतेचा

$
0
0
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिककरांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक बनविण्यासाठी नाशिककर प्रयत्नशील असून त्यांना या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी यंदाही ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे.

प्रेक्षकांची रिअॅक्शन हीच पावती

$
0
0
पावसाची रिमझिम… कॉलेजरोडवरील ‘स्काय कॅफे’त दरवळणारा कॉफीचा सुगंध….आणि अशा वातावरणात कॅफेमध्ये एन्ट्री केल्याक्षणीच समोर बसलेली प्रिया मराठे. हे चित्र पाहून अभिषेकचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पासपोर्टचा भोंगळ कारभार

$
0
0
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या अनेक अर्जदारांना पासपोर्ट प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन अर्ज करताना आणि प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित असताना वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जात असून, अनेकांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ येत आहे.

मधुमित्र!

$
0
0
‘आम्ही जे सांगायचो, त्यावर कोणाचा विश्वासच बसायचा नाही. औषध कंपन्यांच्या मार्केटिंगचे हे खेळ आहेत, अशी टीकाही केली जायची. आज ५० वर्षांनंतर मात्र लहान मुलाला इन्शुलिन टोचायची वेळ येत आहे, तेव्हा आमचे महत्त्व पटते आहे...’

दाराशी टांगलेले पिंजरे

$
0
0
स्वातंत्र्य म्हणजे केवळ पाशातून मुक्ती नव्हे… स्वातंत्र्य म्हणजे केवळ गुलामगिरीतून सुटका नव्हे… पिंजऱ्याचं दार अचानक उघडल्यावर पक्षीही बावरतात…पिंजऱ्याच्या आसपास घोटाळतात…

जकात, एलबीटी की अन्य पर्याय?

$
0
0
जकात किंवा एलबीटी घेण्याचा पर्याय राज्य सरकारने महापालिकांवर सोपविल्यानंतर नाशिकमध्ये जकात, एलबीटी की अन्य पर्याय असावा याबाबत व्यापारी आणि उद्योजकांचा शनिवारी (१६ ऑगस्ट) निर्णय होणार आहे

पाटबंधाऱ्यांची ‘रेड लाईन’

$
0
0
गावठाण भागातील पूररेषेतील मिळकतधारकांना पुनर्विकासास महासभेने नुकतीच मंजुरी दिली. महासभेच्या या निर्णयावर चर्चा सुरू असतानाच पाटबंधारे विभागाचे एक पत्र पुढे आले आहे.

निर्यातीवर निर्बंध मान्य नाहीत

$
0
0
आयात करण्यात येणाऱ्या कृषीमालावर निणर्बंध घालण्याचे अधि,कार सरकारला नाहीत. मात्र, निार्यात केल्या जाणाऱ्या कृषीमालावर नििर्बंध घातले जातात. याचे उलट परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागताहेत.

अखेर एस्कॉर्ट रद्द

$
0
0
एलबीटी की जकात असा प्रश्न महापालिकांच्या गळ्यात टाकून राज्य सरकारने एस्कॉर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आज, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपासून होणार असल्याची माहिती उपायुक्त हरीभाऊ फडोळ यांनी दिली.

लासलगावला एल्गार

$
0
0
केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरी अहिताचे आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून सुंगविण्याची वेळ आली असल्याची टीका शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी गुरूवारी येथे केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images