Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकात पावसाचा कहर...

$
0
0
गेल्या तीन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर धरण ७० टक्के भरले असून, जिल्ह्यातील दोन धरणे `ओव्हर फ्लो` तर एकूण चार धरणांतून विसर्ग सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये ८६२ मिलीमीटर पावसाटची नोंद झाली.

विधानसभेवर भगवा फडकावाः बांदेकर

$
0
0
शिवसेना या चार शब्दातच मोठी जादू असून सर्वसामान्यांचे अश्रू पुसून गोरगरिबांना न्याय देणारे शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार विधानसभेत निवडून आणा, असे प्रतिपादन होम मिनिस्टर फेम व शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी गुरुवारी मनमाड येथे केले.

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद

$
0
0
महंत ग्यानदास हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नाहीत. सरकार व मीडियाने हे लक्षात घेऊन यापुढे त्यांच्या नावाअगोदर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष असा नामोल्लेख करू नये, असे येथे साधू-महंतांनी जाहीर केले.

गोदेचा पूर : एक सोहळा!

$
0
0
नाशिकच्या गोदावरीचा पूर ही दरवर्षाची सर्वात मोठी सांस्कृतिक घटना असते. गणपती उत्सवाला हल्ली तसं व्यावसायिक इव्हेन्टचं स्वरूप प्राप्त झालंय. पण गोदेचा जवळपास दरवर्षी नियमितपणे येणारा पूर अजून तरी यापासून अस्पर्श राहिलाय.

राजमुद्रेचा गैरवापरप्रकरणी गुन्हा

$
0
0
भारत सरकारशी संबंध‌ित व‌िव‌िध पदांवर न‌ियुक्त असल्याचे खोटे भासवून खोटी कागदपत्रे सादर करणे आण‌ि राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी स‌िडको परिसरातील शुभम पार्क येथील रह‌िवासी व‌िरेंद्र श‌िंदे याच्यावर अंबड पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिंहस्थासाठी निधीची मागणी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने २३७८ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत केली.

शाही मार्गाला पुन्हा बगल

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही मार्गाच्या रूंदीकरणाच्या प्रश्नावर गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र शाही मार्गाच्या प्रस्तावाला विरोध झाल्याने हा विषय तहकूब करण्यात आला.

गुणवत्ता सुधाराचे उचलले शिवधनुष्य

$
0
0
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने टाटा उद्योग समुहाला काही शाळा दत्तक देण्याचा निर्णय घोषित केला असला तरी, ‘आधी आमचे प्रयत्न आणि नंतर टाटा’ असा निर्णय नाशिकच्या विभागीय ‌शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला आहे.

हरित कुंभला पंधरवड्यात गती

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा पर्यावरणपूरक करण्यासाठी हरित कुंभ या संकल्पनेला येत्या पंधरवाड्यात मोठी गती दिली जाणार आहे. त्यासाठीच १५ ऑगस्टपर्यंत हरित कुंभचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासह कृती आराखडा तयार करणे आणि हरित कुंभच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली

पीआयला लाच घेताना अटक

$
0
0
गुन्हा दाखल न करण्यासाठी ४५ हजारांची लाच घेताना गंगापूर पोल‌िस ठाण्याचे न‌िरीक्षक बाळकृष्ण शेलार यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रत‌िबंधक विभागाने ही कारवाई केली.

अतिवृष्टीचा इशारा कायम

$
0
0
गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. मात्र, आगामी ४८ तास जोरदार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील जलसाठा ४० टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

कसारा घाटात रस्त्याला तडा

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील ४७३ किमी ठिकाणी रस्त्याला अचानक तडा गेल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

विद्यापीठ घडविणार पत्रकार

$
0
0
केवळ उत्तम डॉक्टर घडविण्याचीच नव्हे, तर उत्तम वैद्यकीय पत्रकार घडविण्याची जबाबदारीही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वीकारली आहे. आरोग्य विद्यापीठ ‘हेल्थ कम्युनिकेशन’चे डिपार्टमेंट सुरू करण्याच्या प्रयत्नात असून, याद्वारे ‘हेल्थ जर्नालिझम’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘सरकारी योजनांचा लाभ घ्या’

$
0
0
ग्रामस्थांना विविध दाखले देण्यासाठी राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत गावागावात पोहोचत आहेत. या सुवर्णसंधीचा ग्रामस्थांनी लाभ घेत वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढून घ्यावेत.

शेतकरी ठार

$
0
0
नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातात एक शेतकरी ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

३ किलो ९०० ग्रॅम सोन्याचा शर्ट

$
0
0
हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हणतात. सोन्याची आवड महिलांनाच अधिक. मात्र, सोन्याचा लळा लागलेल्या येवला शहरातील पंकज पारख यांनी हौस पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या यादीत दुसरे 'गोल्डमॅन' ठरणार आहेत.

येवल्यात पाच घरफोड्या

$
0
0
शहरात मिल्लतनगर, विठ्ठलनगर, गंगादरवाजा परिसरात रात्रीच्या सुमारास पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असून एक मोटरसायकल बेवारस स्थितीत सापडली तर दुसरी एक मोटरसायकल चोरीस गेली आहे.

त्र्यंबकेश्वरला टेकड्यांची पाहणी

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पावसाने टेकड्यांच्या परिसरातील शेतजमीनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर शहराच्या हद्दतील टेकड्यांवर झालेले खोदकाम व भराव टाकणे यामुळे झालेले नुकसान दोन दिवसांच्या पावसानंतर दृष्टिक्षेपात येत आहे.

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

$
0
0
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करावा, या मागणीसाठी समाजाच्या वतीने सिन्नर तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषा करीत, मेंढरांसह धनगर समाज या मोर्चात सहभागी झाला.

पावसाच्या सरासरीत मालेगावात घट

$
0
0
मालेगाव शहर व तालुक्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी कमी झाली आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे शेतकऱ्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. अजूनही तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images