Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गटतट विसरा

0
0
'मिशन २०१४' अंतर्गत काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, त्याआड येणारी गटबाजी, हेवेदावे खपवून घेतले जाणार नाहीत, असा सूचक इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्याचे सहप्रभारी श्योराज वाल्मिकी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.

विज्ञानाच्या प्रसाराचा प्रयोग पोहोचणार देशभर

0
0
क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विज्ञानाच्या प्रसारासाठी संडे सायन्स स्कूल ही संकल्पना गेल्या दशकभरापासून नाशिकमध्ये रूजवली गेली आहे. प्राथमिक स्तरापासून राबवला जाणारा हा प्रयोग आता देशभर पोहोचणार आहे.

रिक्षातून होणार मोबाइल रिचार्ज

0
0
ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या आणि घरपोच सुविधा देण्याच्या स्पर्धेत युनिनॉरने आघाडी घेतली असून, आता नाशिकमधील रिक्षाचालकांकडूनही युनिनॉरचे रिचार्ज मिळणार आहे. पुण्यानंतर ही ऑटो रिचार्ज सुविधा नाशिकमध्ये सुरू करण्यात आली.

गोदावरीची जबाबदारी पालिकेचीच

0
0
गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेचीच असून त्यांनीच आवश्यक तो खर्च करावा, अशी खंबीर भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात मांडली. मात्र, याप्रकरणी महापालिकेची बाजू ऐकूनच कोर्ट निकाल देणार आहे.

पेट्रोलपंप चालकांचाही एल्गार

0
0
एलबीटी कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी पेट्रोलपंप चालकांनीही संपाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ आणि १६ जुलै रोजी महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंप कडकडीत बंद पाळणार असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी ‘मटा’ला सांगितले.

कैद्यांच्या वेतनातही होणार भरघोस वाढ!

0
0
महाराष्ट्रातील कैद्यांनाही इतर राज्यांप्रमाणे किमान वेतन देण्याची मागणी होऊ लागल्याने यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीने वाढ सुचविल्यास कैद्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार असून अभिनेता संजय दत्तलाही याचा लाभ मिळणार आहे.

खेळातून विज्ञानाची गोडी आता देशभर!

0
0
शालेय विद्यार्थ्यांना खेळातून विज्ञानाची गोडी लागावी यासाठी सुमारे दशकभरापासून नाशिकमध्ये संडे सायन्स स्कूलचा अभिनव प्रयोग सुरू आहे. या अफलातून प्रयोगाला मिळालेले यश पाहून आता तो देशभरातील महत्त्वाच्या ४० शहरांमध्ये राबवला जाणार आहे.

मोरवाडी परिसराला बसची प्रतीक्षा

0
0
गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमापासून मोरवाडी परिसरात जाण्यासाठी वाहतूक सेवेअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शनिवारी ‘दि लास्ट लीयर’

0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक विभागीय केंद्र व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट रसिकांना दर महिन्यात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये शनिवार, १३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचा ‘दि लास्ट लियर’ दाखविण्यात येणार आहे.

साहित्य अकादमीतर्फे ग्रंथप्रदर्शन

0
0
मुंबई साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने महात्मा गांधी रोड येथील मायबोली वाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (१३ जुलै) दुपारी चार वाजता वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल.

वाघ कला अकादमीतर्फे उद्यापासून मल्हार महोत्सव

0
0
के. के. वाघ कला अकादमीमार्फत शनिवारपासून (१३ जुलै) मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् व फाईन आर्टस् कॉलेजचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार असून गंगापूररोडवरील शकंराचार्य न्यास तसेच कुसुमाग्रज स्मारकामध्ये हा महोत्सव असणार आहे.

शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा

0
0
शहराच्या सर्वच भागात गढूळ आणि गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी महापालिका प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ऐन पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.

ज्यूनिअर्ससाठी सिनिअर सरसावले

0
0
कॉलेजमध्येही निवडणुका घ्याव्यात या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीला जवळपास सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या निवडणुकांना मान्यता मिळाली तर तयारी म्हणून आपल्या पक्षातील युवा आघाड्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. त्याचबरोबर या निवडणुकांबाबत काही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कॉलेजची हवा!

0
0
शाळेतून नुकतेच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा रुबाब काही वेगळाच असतो. आपण म्हणजे कोणी जगावेगळे अशा थाटात त्यांचं वागणं असतं. पण हे वागणं कधीतरी चांगलंच अंगलट येत. असाच एक किस्सा काही दिवसांपूर्वी घडला. कॉलेजला येण्यासाठी असाच एक कॉलेजकुमार नवीन बाईक घेऊन मित्राकडे आला. कॉलेज सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण कॅम्पसमध्ये हजेरी लावण्याव्यतिरीक्त वर्गाचं तोंडही या कॉलेजकुमाराने पाहीलं नव्हतं.

शहराला अस्वच्छतेचे गालबोट

0
0
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांकडे झालेले दुर्लक्ष, घंटागाडी ठेका देताना काही मिळते का याची दिर्घकाळ चाललेली चाचपणी, डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या औषध फवारणी योजनेचा उडालेला बोजवारा यामुळे नाशिक शहर अस्वच्छतेच्या खाईत ढकलत जात आहे. ठराविक नगरसेवकाचे वार्ड स्वच्छ असणे म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ असा अर्थ होत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, मनसेने शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यावर गांभीर्याने विचार केलाच पाहिजे.

पालकांनो व्हा सजग!

0
0
मुलांबाबत आपण काही अंशी सजग असतो पण आपली तितकी सजगता धावपळीच्या या जगात पुरेशी नाही अथवा नसल्याचे समोर आले आहे. रिक्षातून शाळेत जाणाऱ्या पालकांना रिक्षावाल्या काकांबद्दल अथवा रिक्षातून होत असलेल्या वाहतुकीबद्दल पुरेशी माहिती असते का? हे जाणून घेण्यासाठी ‘मटा’ने शहरात पाहणी केली. यात रिक्षातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि पालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गफलत करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

स्थायीला आयुक्तांची दांडी

0
0
खत प्रकल्पासह, शहर स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांवर तोडगा काढणे यासारखे गंभीर विषय असतानाही आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला गैरहजर राहतात याबद्दल संताप व्यक्त करत सदस्यांनी अध्यक्षांना सभा तहकूब करण्यास भाग पाडले.

नाकाबंदी नक्की कशासाठी?

0
0
शहरात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून आणि चेन स्नॅचर्सना आळा बसावा म्हणून बाहेरून शहरात अनेक ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. मात्र, या नाका बंदीतून चेन स्नॅचर सापडण्याऐवजी सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत असलेल्या नागरिकांनाच लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.

शाळेसाठी जागा द्या हो!

0
0
पाथर्डी गावच्या शाळा क्रमांक ९७ मधील साडेचारशे विद्यार्थी फक्त दोनच वर्ग खोल्यांमध्ये गुरा ढोरासारखे शिक्षण घेत आहेत. अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत.

'रामसर'ला सरकारी खोडा

0
0
महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पाणथळाचा समावेश रामसर साइटमध्ये करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली असतानाही जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांनीच याकामी असहकार दर्शविला आहे. यासंदर्भात वनविभागाने दोनवेळा दिलेल्या पत्राला या विभागांनी केराची टोपली दाखविली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images