Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सिन्नर नागरीमधील ज्येष्ठांच्या ठेवी परत करा’

$
0
0
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेतील जेष्ठ नागरिक व अल्पबचत ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेने प्राधान्याने परत कराव्यात, अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

गंगापूर धरणावर मद्यपींचा हैदोस

$
0
0
गंगापूर धरणाभवती मद्यपींचा हैदोस पहायला मिळत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रासले आहेत. तर यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात येत असल्याची तक्रार गंगावऱ्हे, सावरगाव येथील ग्रामस्थ करत आहेत. सिंचन विभाग व पोलिसांकडून यबाबत गंभीर दखल घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरू करा

$
0
0
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी चालू अधिवेशनात आर्थिक तरतूद करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम तत्काळ सुरू करावे यासाठी खासदार गोडसे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली.

प्रचार अंतिम टप्प्यात

$
0
0
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तीनही पॅनलचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी बरोबरच सोशल मीडियाचाही वापर करीत आहेत. यामुळे निवडणुकीत चांगीच रंगत आली आहे.

पूररेषेबाबत निघणार कायमचा तोडगा?

$
0
0
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पूररेषेतील मिळकतीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. यतीन वाघ यांनी केली. यापूर्वी अनेकदा अशा घोषणा करण्यात आल्या असून यावेळी तरी या प्रश्नावर तोडगा निघेल का असा प्रश्न पूररेषा बाधितांकडून उप​स्थित केला जातो आहे.

साधुग्रामची ४७ एकर जमीन आरक्षित

$
0
0
साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या ३२२. ९० एकर जमिनीपैकी ४७ एकर जमीन आरक्षित करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली. ४७ एकर जमिनीमध्ये पांजरपोळ ट्रस्टसह स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या जागेचा समावेश आहे.

उद्यापासून टाइम्स प्रॉपर्टी शो

$
0
0
शेकडो प्रॉपर्टीजची माहिती एकाच छताखाली ओझरककरांना उपलब्ध व्हावी या हेतूने टाइम्स ग्रुपतर्फे आयोजित ‘टाइम्स प्रॉपर्टी शो-२०१४’चा शुभारंभ उद्या (दि. १९) होणार आहे.

सुरक्षा कर्मचारी मानधनावरच

$
0
0
महापालिका हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी मानधन तत्त्वावर १५२ कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय महासभेने घेतला. अभ्रक चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने ​दिलेल्या आदेशानुसार याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता.

नियोजन विभाग होणार ‘पेपरलेस’

$
0
0
राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांसह आमदार आणि खासदारांच्या निधीतून जिल्ह्यात होणाऱ्या कामांची मंजुरी मिळणाऱ्या नियोजन विभागाचे कामकाज `पेपरलेस` होणार आहे.

निर्माल्याचा प्रस्ताव फेटाळला

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी नारायण नागबली आणि अन्य विधीनंतरचे पिंड व निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला.

केबीसी विरोधात ३४६ तक्रारी

$
0
0
केबीसी कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात तक्रार देण्यासाठी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुंतवणकदारांची गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारपर्यंत पोलिसांना ३४६ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १३ कोटी ६२ लाखांची फसवणूक झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

रिलायन्सच्या खड्ड्यात ३ जखमी

$
0
0
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ४ जी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून शिखरेवाडी परिसरात गुरुवारी तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोन जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

हुरहुरवणारी स्टेज एग्झिट!

$
0
0
प्रशांत दामले... रंगमंच, टिव्ही आणि चित्रपट यातील परिचित असा प्रसन्न चेहरा. समांतर रंगभूमीपासून ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ आणि अलीकडेच रंगमंचावर आलेले ‘नकळत दिसले सारे’ यांसारख्या विविध नाटकांपर्यंत आजही सातत्याने प्रयोग करणारे रंगभूमीवरील नामवंत कलाकार म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे.

‘सुदर्शन’ संचालकाच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची ३८ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुदर्शन आणि कंपनीचा संचालक राधेश्याम सोनीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ झाली आहे.

कांदा भाववाढीवरून सरकारचा रडीचा डाव

$
0
0
केंद्र सरकार कांदा भाववाढीचा मोठा गहजब करीत असून कांदा उत्पादकांच्या बाबतीत सरकार रडीचा डाव खेळत आहे. शहरी ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर सरकार कांद्यावर निर्बंध लादणार असेल तर कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यायलाच हवा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

द्वारका चौकाने भेदले अहंकाराचे वर्तुळ

$
0
0
द्वारका चौकातील सर्कल अखेर सर्व बाजूंनी कमी करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न ब-यापैकी सुटला असून, प्रदूषणही कमी झाले आहे. तसेच इंधन व वेळेचीही मोठ्याप्रमाणावर बचत होत आहे.

घोलपांच्या कारकिर्दीचा ट्रॅजिडीने शेवट !

$
0
0
भ्रष्टाचार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे बबन घोलप यांची आमदारकी जाणे ही काळ्या दगडावरील रेघ झाली आहे. सेनेचा एक नेता खासदार झाला असताना त्याच परिसरातील दुसऱ्या नेत्याला मात्र, पायउतार व्हावे लागत आहे.

सिंहस्थ निधीसाठी गोडसेंचे जेटलींना साकडे

$
0
0
नाशिकमध्ये २०१५ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार असून त्यासाठी २ हजार ३७८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली.

नायब तहसीलदाराचा विनयभंग

$
0
0
नायब तहसीलदार महिलेशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तसेच ‌तिचा विनयभंग करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारी जामिनावर सोडले.

रिलायन्सने केलेल्या खड्ड्यात पडून तिघे जखमी

$
0
0
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ४ जी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून शिखरेवाडी परिसरात गुरुवारी तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोन जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images