Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादावर पडदा

$
0
0
काम नाही तर दाम नाही या सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आल्याने व्यापारी व माथाडी कामगारांच्या वादावर बुधवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या बैठकीत पडदा पडला. कृषी सचिव सुधीरकुमार गोयल यांनी पणनसंचालकानी दिलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे तीन हजार कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विजेचा शॉक लागून दोन महिलांचा मृत्यू

$
0
0
सटाणा तालुक्यातील जायखेडा येथे पाऊस सुरू असताना आडोसा घेण्यासाठी थांबलेल्या तिघांपैकी दोन महिलांना विजेच्या तारेचा धक्का लागला. या घटनेत दोन्हीही महिला जागीच गतप्राण झाल्या. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी ही घटना घडली.

बागलाण तालुक्यात नुकसानभरपाईची मागणी

$
0
0
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गारपीट ग्रस्त व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व अनुदान उपलब्ध न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

येवल्यात सिद्धीविनायकच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

$
0
0
अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त मंगळवारी येवला तालुक्यातील देशमाने येथील नवसाला पावणाऱ्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुमारे पन्नास हजारावर भाविकांनी गर्दी केली होती.

त्र्यंबकेश्वरला जोरदार पाऊस

$
0
0
दीड महिना दडी मारून बसलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात बुधवारी दमदार हजेरी लावली. हंगामातील हा पहिलाच जोरदार पाऊस आहे.

‘संभाजी पवार यांनी राजीनामा द्यावा’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी शिवसेनेत अधिकृत जाहीर प्रवेश केला आहे. स्वाभीमानाच्या गप्पा मारणाऱ्या पवारांनी पक्ष शिस्तभंगाची कार्यवाही होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येवला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोहन शेलार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

मालेगाव सिन्नरला दुष्काळाच्या झळा

$
0
0
जुलै महिना संपत आला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून गुरांना चारा नसल्याने व शेतीची कामे खोळंबली असून मजुरांना काम नाही. अशा परिस्थिती तातडीने नियोजन करून कार्यवाही होणे गरजेचे असल्याच्या सूचना आमदार दादा भुसे यांनी केल्या आहेत.

सिन्नर तालुक्यात पेरण्या खोळंबल्या

$
0
0
सिन्नर तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ असून तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. या वर्षी दीड महिना उलटूनही पाऊस नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. विविध कार्यकारी सोसायटी व राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेले पीककर्ज भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती राहिलेली नाही.

शिखरेवाडीचा जॉगिंग ट्रॅक बनलाय मद्यपींचा अड्डा

$
0
0
नाशिकरोडच्या शिखरेवाडीतील जॉगिंग ट्रॅकवर रोज रात्री दारुड्यांचा धुमाकूळ सुरू असून नागरिकांना फिरणे मुश्किल झाले आहे. दारुड्यांनी गंधर्वनगरी आणि शिखरेवाडीतील दोन्ही गेट तोडल्याने ट्रॅकवर गाड्या आणल्या जात असून रायडर्सचा धुमाकूळ सुरू आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

टांकसाळ लेनला समस्यांचा वेढा

$
0
0
प्रभाग २५ ब मधील टांकसाळ लेनमध्ये अस्वच्छता अन् मोकाट जनावरांनी थैमान घातले आहे. दिवसा गायी तर रात्री श्वानांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका व नगरसेवकांकडून दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिसरात कचऱ्याला खच पडला असतानाही महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केबीसी प्रकरणात तिघांना कोठडी

$
0
0
अल्पमुदतीत पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड कंपनीशी संबंधीत तिघांना न्यायालयाने बुधवारी २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे.

व्यापाऱ्याचे साडेतीन लाख लुटले

$
0
0
शहरातील मोसमपूल चौकातील गजबजलेल्या लोढा मार्केट समोर भररस्त्यावर दुपारच्या वेळी उभ्या असलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

मुख्याध्यापक संघाचे आंदोलन

$
0
0
मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात टाळाटाळ होत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक संघाने गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

नगरपालिकांचे कामकाज ठप्प

$
0
0
रोजंदारी कर्मचारी कायम करणे, वेतन व पेन्शनसाठी १०० टक्के अनुदान देऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोनल दुस ऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने नगरपालिकांचे कामकाज ठप्प झाले.

सरी आल्या धावून...

$
0
0
पावसाळ्याला प्रारंभ होऊन तब्बल दीड महिना उलटल्यानंतर पावसाने नाशिक शहर परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार हजेरी लावली. इगतपुरी व त्र्यंबकमध्ये दिवसभर संततधार सुरू होती. दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर असताना पावसाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण असून, आगामी काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहण्याची चिन्हे आहेत.

रविवार पेठेत सहा दुकाने फोडली

$
0
0
बॅग लिफ्टींग, चेन स्नॅचिंगच्या लागोपाठ घडणाऱ्या घटना कमी म्हणून की काय, चोरट्यांनी शहरातील मध्यवस्तीतल्या बाजारपेठेलाही बुधवार (ता. १६) पहाटे लक्ष्य केले. रविवार पेठ आणि घनकर गल्लीतील सहा किराणा दुकाने फोडत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. दुर्दैवाने त्यांच्या हाती फारशी रोकड न लागल्याने व्यापाऱ्यांनी सुस्कारा सोडला असला तरी बराच माल चोरीस गेला. दुकानाबाहेर ट्रक उभा करून माल लांबविण्यात आला.

शनिवारी रंगणार ‘मौनराग’चा प्रयोग

$
0
0
प्रायोगिक रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवणारी अनेक नाटके सध्या सुरु आहेत. 'आविष्कार'सारख्या अनेक संस्था आपले वेगवेगळे प्रयोग घेऊन प्रायोगिक रंगभूमीवर ठामपणे उभ्या आहेत.

आगीत दोन लाखांचे नुकसान

$
0
0
येवला तालुक्यातील विखरणी शिवारातील शेतकऱ्याच्या घरालगतच्या शेडला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीत उन्हाळ कांदा, मोटरसायकल, सायकली व शेती उपयोगी साहित्य भस्मसात झाले.

शहर कारभाराचा उडाला बोजवारा

$
0
0
सटाणा शहरात गत तीन दिवसांपासून पालिका कर्मचारी संपात सहभागी असल्याने शहरातील पाणी, आरोग्य व स्वच्छता यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. महिला व पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर हंडे घेवून उतरावे लागत आहे.

शेततळे निर्मितीचे गौडबंगाल

$
0
0
तालुक्यातील दहिदी येथील हरियाली पाणलोट विकास योजनेअंतर्गत शेततळे न बांधताच निधीचा अपहार करून हे प्रकरण उघडकीस येते आहे हे लक्षात आल्यावर अर्ध्यारात्रीत शेतावर शेततळे निर्मितीचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री आमदार दादा भुसे यांच्या प्रयत्नातून हाणून पडण्यात आला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>