Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लिंगायत समाजाला OBC दर्जा द्या

0
0
लिंगायत समाजबांधवांच्या विविध मागण्यांप्रश्नी लिंगायत समाज संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शहराच्या मुख्य भागातील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली.

क्रीडा धोरण यंदापासूनच

0
0
नाशिक महापालिकेने महासभेत मंजूर केलेल्या क्रीडा धोरणाची अंमलबजावणी यंदाच्या अर्थिक वर्षापासून अमलात आणणार असल्याची माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली.

नाशिककरांसाठी फोरजी मोफत

0
0
फोरजीच्या माध्यमातून इंटरनेटचा हायस्पीड अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या नाशिककरांना चक्क मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. फोर जी सेवेच्या प्रमोशनसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केबीसी घोटाळा; सहा गजाआड

0
0
नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरात गुंतवणुकदारांना गंडविणाऱ्या केबीसीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.१४) आत्महत्या केलेल्या निकम मायलेकांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्याच रात्री तीन जणांना अटक करण्यात आली.

वाडकरांच्या जामिनावर उद्या निर्णय

0
0
जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले गायक सुरेश वाडकर बुधवारी नाशिक जिल्हा कोर्टासमोर हजर झाले. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी (दि. १८) रोजी अंतिम निर्णय होणार आहे.

बोरगावच्या विद्यार्थ्यांचे ऑलम्पियाडमध्ये यश

0
0
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ‘ब्रह्मा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल बोरगाव’ येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील ऑलम्पियाड परीक्षेत उज्वल यश मिळविले.

पंचवटी विभागीय कार्यालयाची महापौरांकडून पाहणी

0
0
नाशिक महापालिकेतर्फे पंचवटी विभागात नव्याने बांधण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी महापौर यतीन वाघ व आयुक्त संजीवकुमार यांनी केली. हे विभागीय कार्यालय नागरिकांसाठी १५ ऑगस्ट पूर्वी खुले करण्यासाठी कामाला गती देण्याची सूचना महापौरांच्या वतीने करण्यात आली.

लालेलाल डाळिंबाने उत्पादक मालामाल

0
0
भीषण दुष्काळी परिस्थितीतही पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लालेलाल, दर्जेदार डाळिंबाची विक्रमी आवक होत आहे. रमजान पर्व सुरू असल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. २० किलोच्या क्रेटला सरासरी १२०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरीही मालामाल होत आहे.

युवा सेनेच्या नोंदणीला नाशिकरोडला प्रतिसाद

0
0
नाशिकरोड येथे युवा सेनेच्या सदस्य नोंदणीला उत्साहात प्रारंभ झाला असून, त्याला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या सदस्य नोंदणीचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक पूर्व विधान सभा युवा सेनेतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले आहे.

साक्षांकन सुविधेची गरज

0
0
देवळाली कॅम्प परिसरात साक्षांकनाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. देवळाली कॅम्प परिसरातील विशेष कार्यकारी अधिकारी व छावणी परिषद नगरसेवकांचे साक्षांकन करण्याच्या अधिकाराची मुदत संपली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर द्या बळ

0
0
नाशिक शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर हे दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत असताना प्रामुख्याने हे शहर सोशल इन्फ्रा सिटी म्हणूनही उदयास येत आहे. सोशल इन्फ्रा म्हणजे समाजाच्या विकासासाठी आणि त्याच्या सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता. शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी नाशिककरांना कनेक्टिव्हिटीच्या सुविधांपासून मनोरंजन, हेल्थ केअर, एज्युकेशन अन् इंडस्ट्रीसाठीच्या गरजांचा विचार आता करावा लागणार आहे.

`वेलनेस टुरिझम`च्या नकाशावर नाशिक

0
0
मन आणि शरीरातील थकवा दूर करून चैतन्य निर्माण करणाऱ्या `वेलनेस टुरिझम`च्या नकाशावर नाशिक आले असून, नाशिक हे भारतातील तिसरे ठिकाण ठरले आहे. त्यामुळेच नाशिक शहर परिसरात हेल्थ आणि `वेलनेस रिसॉर्ट`ची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे

0
0
इयत्ता अकरावी व बारावीच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी शहरातील काही महाविद्यालये मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे पंधरा ते वीस हजार रुपये अतिरिक्त शुल्क घेत त्यांना प्रवेश देत आहेत. हा प्रकार या महाविद्यालयांनी थांबवावा, अशा मागणीचे निवेदन शिक्षण विभागाचे उपसंचालक यांना छावा मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या शहराध्यक्षा अश्विनी बोरस्तेंचा राजीनामा

0
0
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच त्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टांकसाळ लेनला समस्यांचा वेढा

0
0
प्रभाग २५ ब मधील टांकसाळ लेनमध्ये अस्वच्छता अन् मोकाट जनावरांनी थैमान घातले आहे. दिवसा गाई तर रात्री श्वानांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका व नगरसेवकांकडून दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिसरात कचऱ्याला खच पडला असतानाही महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.

माणिकपुंजवर एक्स्प्रेस फीडर

0
0
नांदगावकरांना पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अधिक कार्यक्षमतेने व अडचणी विरहीत व्हावा यासाठी माणिकपुंज धरणावर एक्स्प्रेस फीडर बसविण्याचा शुभारंभ आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार ठप्प

0
0
बँक ऑफ इंडियाच्या घोटी शहरातील शाखेत चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार ठप्प झाले असून यामुळे हजारो ग्राहकांचे अतोनात हाल झाले आहेत. व्यवहार तातडीने सुरू करावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

काँग्रेसच्या निरीक्षकांची मालेगावला भेट

0
0
अखिल भारतीय काँग्रेसचे मालेगाव व साटाणा विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक ईश्वर मकवान यांनी नुकतीच मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात भेट देवून आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.

दोन मोटरसायकली जाळल्या

0
0
दिंडोरी नाका येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात दोन मोटरसायकली जळाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. महाराष्ट्र हौसिंग बोर्डाच्या इमारत क्रमांक एकमधील मोकळ्या जागेत गुलाबराव पाटील आणि उमेश घुघे यांनी मोटरसायकली उभ्या केल्या होत्या. एमएच १५ सीपी ३२३६ आणि एमएच १५ डीएन ११ या दोन मोटरसायकली जळाल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले. पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

राष्ट्रवादीची नाशिकरोडला बैठक

0
0
नाशिकरोड विभागीय राष्ट्रवादी कांग्रेसची बैठक नुकतीच येथे झाली. शहराध्यक्ष अर्जुन टिळे अध्यक्षस्थानी होते. नाशिकरोड प्रमुख मनोहर कोरडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. २० जुलैचा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन श्री टिळे यांनी केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images