Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘केबीसी’चा तपास सेबीकडे ?

0
0
केबीसीने केलेल्या फसवणुकीचा तपास हा स्थानिक पोलिसांनी करावा एवढा हा मर्यादीत विषय नाही. परदेशातही तपासाची परवानगी असलेल्या सेक्युरीटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे हा तपास जावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

पैसे बाळगताना घ्या काळजी

0
0
बँकामध्ये आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी याच्या मार्गदर्शक सूचनाच पोलिसांनी आता प्रसिध्दीसाठी दिल्या आहेत. शहरातील सर्व बँकांना या सूचनापत्रांचे वाटप केले जाणार असून बँकांनी नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कांदा उत्पादकांच्या मांडल्या समस्या

0
0
येवल्यातील भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. कांदा, टोमॅटो, बटाटे या शेती पिकांसाठी धोरण ठरवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व फसवणुकीला आळा घालण्याचे नियोजन असल्याचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी यावेळी सांगितले.

मालेगाव महापालिकेचे लेखापरीक्षण करावे

0
0
मालेगाव महापालिकेत सत्तारूढ काँग्रेस व तिसरा महाजने संगनमताने सफाई ठेक्यासह विविध विकासकामांत भ्रष्टाचार सुरू केला आहे. निविदा न काढता काही विकासकामे देण्यात आली आहेत.

राणेनगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

0
0
प्रभाग क्रमांक ५३ मधील राणे नगर परिसर चक्क कचऱ्याने माखला आहे. परिसरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी नियमित येत असूनही नागरिक उघड्यावर व मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.

आषाढीनंतर पावसाने फिरवली पाठ

0
0
अगोदरच कोरड्याठाक गेलेल्या रोहिण्या, नंतरच्या महत्वपूर्ण 'मृगा'च्या पाठोपाठ आलेल्या 'आर्द्रा' ने दिलेला मोठा दगा असा तब्बल महिना सव्वामहिना यंदा वरुणराजाने येवला तालुक्यातील बळीराजाला आकाशाकडे आशाळभूतपणे नजरा लावत मानपाठ एक करावयास लावले.

हरसूलला दुबार पेरणीही वाया

0
0
हरसूल परिसरात पावसाच्या भरवशावर टाकलेली रोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र, आता दुबार पेरणीही वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परिसरावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.

क्रीडा धोरणाला अखेर लागला मुहूर्त

0
0
महापालिकेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत क्रीडा धोरणास महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सोमवारी (ता.१४) मंजुरी दिली. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत असले तरी या धोरणाची अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. विरोधकांनीही हाच मुद्दा चर्चेदरम्यान लावून धरला.

सटाण्यात अपघातात दांपत्य ठार

0
0
सटाणा शहरापासून १३ किमी अंतरावर असलेल्या विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील हॉटेल तकदीर नजीक रविवार रात्री साडे दहावाजेच्या सुमारास दोघा मालमोटारमध्ये मोटारसायकल दबून झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याने सटाणा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिमेंटचे दर वाढ‌विण्याचा घाट

0
0
केवळ नफेखोरीसाठी सिमेंट कंपन्या सिमेंट गोणीचे दर अव्वाच्या सव्वा वाढवत असून येत्या काही दिवसातच हे दर ४०० च्या आसपास करण्याचा घाट सिमेंट कंपन्यांनी घातल्याचा आरोप, क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकार परिषदेत केला आहे.

केबीसीचे दोन बळी

0
0
जुन्या नाशकातील कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या मायलेकांनी केबीसी कंपनीत गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने सोमवारी (ता.१४) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली.

राजाभाऊ वाजेंचा गुरुवारी शिवसेनेत प्रवेश

0
0
जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे वाजे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत तालुक्यात सुरू असलेल्या तर्क वितर्कांना पूर्ण विराम मिळणार आहे.

शेतकरी झाला भाकरीला पारखा

0
0
नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात अद्यापर्यंत पाऊस न झाल्याने शेतकरी भाकरीला पारखा झाला आहे. जून प्रमाणेच संपूर्ण जुलैही कोरडा जाण्याची चिन्हे दिसून लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे

नगरपालिकांमध्ये कामबंद आंदोलन

0
0
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व पेन्शनसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, १० मार्च ९३ ते २७ मार्च २००० पर्यंतच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

समांतर सिनेमामुळे अभिरुचीची नवी वाट

0
0
‘समांतर सिनेमाच्या चळवळीने अभिरुचीची नवी वाट चोखाळून रोजच्या जगण्याच्या विषयांना कलात्मकता बहाल केली तसेच चित्रपटातील भूमिकांचा सुक्ष्म आणि बारकाईने विचार करुन जनसामान्यांचे रोजचे प्रश्न मांडले.

बोगसगिरीचा गोरखधंदा कुणाच्या पथ्यावर?

0
0
शहरात किमान १०० बोगस आर्किटेक्ट असल्याचा दावा खुद्द आर्किटेक्ट संघटनेने केला. मात्र, आम्हालाही डिझाइन तयार करण्याचा घटनादत्त अधिकार असल्याचा प्रतिदावा सिव्हिल इंजिनीअर संघटनेने केला.

सरकारला ट्रेकिंग संपवायचंय?

0
0
राज्याच्या क्रीडाधोरणात गिर्यारोहणाला खेळाचा दर्जा दिला आहे. मात्र, सरकारने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावाखाली गिर्यारोहणाचे नियम जारी करत गोंधळ निर्माण केला आहे.

‘कॉम्बो’ची सक्ती केल्यास आंदोलन

0
0
सिनेमॅक्समध्ये ‘लय भारी’ सिनेमादरम्यान प्रेक्षकांना सिनेमाच्या तिकिटाबरोबर पॉपकॉर्न आणि कोकालोलाच्या कॉम्बो पॅकची सक्ती केली जात असल्याच्या प्रकारावरुन ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) हल्लाबोल करत हे बंद करण्याची मागणी केली.

‘परी’चं इटलीला टेक ऑफ

0
0
परी तशी चिमुकली अन् गोंडसही. मात्र, नियतीने तिच्याशी क्रुर ‌चेष्टा केली. परीच्या हृदयाला सूक्ष्म छिद्र आणि किडनीचाही आजार. परंतु, तिच्यासाठी इटलीतील एक दाम्पत्य देवदूताप्रमाणे धावून आले आहे.

१०० स्मार्ट सिटीत नाशिक हवे

0
0
१०० स्मार्ट सिटीज संकल्पनेचा केंद्र सरकारने अर्थसंकल्पांमध्ये अंतर्भाव केला असून यामध्ये नाशिकचा समावेश व्हावा, यासाठी महापालिकेने तातडीने प्रस्ताव तयार करण्याची मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. स्मार्ट सिटीजच्या विकासासाठी ७,०६० कोटी रुपयांची तरतूद केंद्राने केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images