Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आजपासून एकदाच पाणी

$
0
0
पावसाने दडी दिल्यामुळे शहरात आज, सोमवारपासून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सध्याचा पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच असून, पावसाची स्थितती अशीच राहिल्यास एकवेळ पाणी पुरवठ्यात देखील कपात होण्याची शक्यता आहे.

नाराजांची मांदियाळी

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अतंर्गत धुसफुसीचे स्पष्ट चित्र रविवारच्या राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान समोर आले. आमदार वसंत ग‌िते यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अतुल चांडक व इतर कार्याकर्त्यांनी ठाकरेंच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली.

मनसेत ‘वसंत’ फुलला!

$
0
0
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीपासून नाराज असलेले मनसेचे वजनदार नेते, आमदार वसंत गिते ‘राजशिष्टाई’नंतर अखेर ‘राजी’ झाले आहेत. आपण पक्षावर नाराज नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोकेदुखी तूर्त तरी दूर झाली आहे.

जाणत्या राजाला ‘नियोजन’चा झटका

$
0
0
जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना केंद्रीय नियोजन आयोगानेच झटका दिल्याची बाब पुढे आली आहे. द्राक्ष प्रक्रिया उद्योगासाठी पवारांनी पाठविलेले दोन प्रस्ताव आयोगाने फेटाळले आहेत.

खान्देशात पाणीटंचाईची धग तीव्र

$
0
0
खान्देशात टंचाईची धग तीव्र असून नागरिकांना अाठ-नऊ िदवसाअाड पाणीपुरवठा होत अाहे. चाळीसगावात पाणीसाठा अवघ्या १५ दिवसांचाच आहे, तर अमळनेरची स्थिती त्याहूनही बिकट अाहे. अमळनेरला अवघ्या अाठ दिवसांचाच पाणीसाठा अाहे.

मनसेचा खान्देश प्रवेश

$
0
0
मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता राज्यभरात विस्तारण्यास सुरुवात केली आहे. मनसेने खान्देशवरही लक्ष केंद्रीत केले असून सोमवारी पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेतला जाणार आहे.

अन् घशात अडकला घास

$
0
0
शहरात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी एका अभ्यासक्रमाच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या निम्मीच असल्याने या प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळत आहे.

गजर हरिनामाचा...

$
0
0
इंग्रजी माध्यमांतील मुलांना वारीचं महत्त्व समजावं आणि यातून आपल्या संस्कृतीचीही जोपासना व्हावी या उद्देशानं नाशिकमधील बॉईज टाऊन स्कूलमध्ये पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

मालेगाव जिल्हा निर्मितीसाठीच भाजपमध्ये प्रवेश

$
0
0
खासदार, आमदार होण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा निर्णय घेतला आहे. त्यात विकासाचे स्वप्न पाहिले असून, मालेगाव जिल्हा निर्मितीला माझे प्राधान्य राहणार आहे.

घरबसल्या मनमाडकरांचे तोंड गोड

$
0
0
गरम गरम आणि स्वादिष्ट पूरणपोळी घरबसल्या मिळाली तर कोणाला नको आहे. मालेगावचे मांडे व पूरणपोळी यांनी मनमाडचे मार्केट काबीज करत बाराही महिने आता खास खापरावर बनवलेले स्वादिष्ट असे मांडे खा, असा गोड संदेश मनमाडकरांना दिला आहे.

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने ग्राहक संतप्त

$
0
0
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे दोन महिन्यांपासून हिंदुस्थान पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. या विरोधात शिवसेना ग्राहक मंचाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0
महिनाभरापासून असलेली पावसाची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपली. जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात मुसळधार तर इतरत्र आषाढ सरी कोसळल्या.

श्रीकृष्णनगर समस्यांच्या गर्तेत

$
0
0
गेल्या सात वर्षापासुन नाशिक रोड येथील श्रीकृष्ण नगरमधील रहिवासी पक्क्या डांबरी रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. साधारण ३ वर्षांपुर्वी येथे खडीकरण करण्यात आले होते. मात्र, अद्यापही येथे पक्का रस्ता झालेला नाही.

राज ठाकरे आले, उद्‌घाटन करून गेले

$
0
0
विश्वासनगर परिसरातील मिनाताई ठाकरे विद्यालयाच्या वाढीव इमारतीचे उद्‌घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नेहमी प्रमाणे राज ठाकरे सातपूरला आले अन् काही न बोलता परतले. यामुळे सातपूरकरांची पुन्हा एकदा निराशाच झाली आहे.

‘महाविद्यालयांची सुरक्षा वाढवावी’

$
0
0
महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी समन्वय समितीने नुकतीच शहराचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची भेट घेत काही मागण्या केल्या आहेत.

पाणीपुरवठा योजना पूर्ण करा

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील बारा गाव पिंप्रीसह ६ गावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम विनाविलंब हाती घेवून लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे केली आहे.

राष्ट्रवादीची हायटेक कनेक्टीव्हिटी

$
0
0
सोशल मीडियाचा धसका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आता गांभीर्याने 'हायटेक' व्हायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी पक्षाचे अॅप व वेबसाईट लाँच करून जनतेशी कनेक्टीव्हिटी वाढवल्याचा प्रयत्न केला आहे.

प्रभाग कामांची माहिती वेबसाइटवर

$
0
0
प्रभाग ५२ मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रभागातील विविध कामे नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्‌घाटन झाले.

केबीसीने गाशा गुंडाळल्याची धास्ती

$
0
0
मुंबई-आग्रा मार्गावरील हाटेल जत्रा चौकातील केबीसी मल्टीट्रेड या राष्ट्रीय कंपनीने गाशा गुंडाळल्याची चर्चा आहे. कंपनीचे संचालक कुटुंबीयांसह सिंगापूरला मुक्कामी गेल्याने कोणाशी संपर्क साधावा हेच कळेनासे झाल्याने कोट्यवधी रुपये गुंतवलेल्या हजारो गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहेत.

... टर्मिनलचे होईल पेलिकन पार्क

$
0
0
ओझर येथील विमानतळ टर्मिनल सज्ज झाले तरी तेथून विमानसेवा सुरू होत नाही किंवा या टर्मिनलप्रश्नी वाद निर्माण झाल्यामुळे या टर्मिनलचे पेलिकन पार्क तर होणार नाही ना, अशी खंत नाशकातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images