Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लासलगावला शिक्षिकेचा खून

$
0
0
लासलगाव जवळील निमगाव येथे राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अविवाहीत शिक्षिकेचा शुक्रवारी (ता.४) सकाळी कोयत्याने वार करून खून झाला. त्यानंतर आरोपीने स्वत:च्या हाताची नस कापून व मानेवर वार करीत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टर आंदोलनाचा पहिला बळी

$
0
0
मॅग्मो संघटनेतंर्गत जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटल्समधील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. थंडी तापाने आजारी महिलेला डॉक्टरांअभावी योग्य व वेळेत उपचार न मिळू शकल्याने तिचा मृत्यू झाला.

`आमचं घर फुटू देणार नाही`

$
0
0
‘तुम्ही एक घर फोडलं आहेच. आता मी आमचं घर फुटू देणार नाही’, असे वक्तव्य खासदार सुपिया सुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषदेत केले. माझ्यात व दादामध्ये (अजित पवार) सत्तेसाठी कधीही भांडणे नव्हती आणि पुढेही होणार नाहीत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

दुर्मीळ घुबडाला जीवदान

$
0
0
तळवाडे शिवारात जखमी अवस्थेतील दुर्मीळ प्रजातीच्या घुबडाला आडसुरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शंकरराव आहिरे यांच्या प्रसंगावधानाने जीवदान मिळाले.

पॅसेंजर टर्मिनलवरुन वाद

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी सज्ज झालेले पॅसेंजर टर्मिनल हे आमच्या मालकीचे असावे, अशी भूमिका हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) घेतली आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला असून याप्रकरणी जिल्हाधिकारी लवकरच मुंबईला जाणार आहेत.

YCMOUचे प्रवेश सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या ३१ जुलै २०१४ पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

सोनवणेच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0
मुंबई येथे पोलिस भरती दरम्यान धावण्याच्या चाचणीत मृत्युमुखी पडलेला मालेगाव तालुक्यातील द्याने येथील अंबादास सोनवणे यांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार दीपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आला

संवाद शिवसैनिकांशी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत शिवसेनेने आघाडी घेतली असून, पुढील आठवड्यात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेला मंजुरी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रस्तावित उपकेंद्रासाठी आवश्यक जमिनीचा ताबा विद्यापीठाकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

STच्या चौघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
सन १९९१ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत बनावट दस्तऐवज तयार करून एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेतील तत्कालीन निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याबाबतचे खोटे पुरावे तसेच चुकीचा अहवाल सादर करून बदनामी व नुकसान केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एका विभागनियंत्रकासह महामंडळातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

इगतपुरीत पाणी योजना प्रतीक्षेत

$
0
0
इगतपुरी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे ३७ पाणीपुरवठा योजना धुळखात पडल्या आहेत. या योजनांवर १३.५० कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला होता. या सर्व योजनांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आमदार ‌निर्मला गावित यांनी सूतोवाच केले आहे.

इगतपुरीत सभापती, उपसभापतींवर अविश्वास

$
0
0
संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव मोठ्या फरकाने मंजूर करण्यात आला आहे. सभापतींविरोधात उपसभापती रमेश जाधव यांनीही मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर

$
0
0
सरकारी हॉस्पिटल्समधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप सलग पाचव्या दिवशीही सुरूच होता. शहरातील विविध संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शविला असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि विशेषज्ञ संवर्ग वर्ग एकचे अधिकारीही सोमवारपासून (दि.७) सक्रियपणे या संपामध्ये सहभागी होणार आहेत.

मालमत्ता कराची सवलत लालफितीत

$
0
0
मालमत्ता कराची रक्कम वेळेत भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना २ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयाची अमंलबजावणी एप्रिल २०१४ पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेच्या कात्रीत ही प्रक्रिया अडकली. आचारसंहितेनंतर देखील ही योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा झाला नाही.

महिला अत्याचारांची प्रकरणे निकाली काढा

$
0
0
मागासवर्गीय महिलांवर होणारे अन्याय, अत्याचारांची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.

आयुक्तांविरोधात गुन्हा

$
0
0
गोदावरी प्रदूषण प्रश्नी महापालिका आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात नाशिक कोर्ट येत्या २८ जुलैला निर्णय देणार आहे. यासंदर्भात कोर्टाने साक्षी नोंदवून घेतल्या आहेत.

मांसविक्रीमुळे कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
आकाशवाणी परिसर व प्रसाद मंगल कार्यालय येथे उघड्यावरील मटन, मास, मच्छी विक्रीमुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच मासांच्या तुकड्यांसाठी येथे भटक्या कुत्र्यांचाही सूळसुळाट झाला असून येथील लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्री येथून गाडीवरून अथवा पायी जाणाऱ्या नागरिकांत कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

टँकरवर जीपीएस वॉच

$
0
0
पाण्याच्या टँकरला बसविलेली जीपीएस यंत्रणा (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) नाशिक जिल्ह्यात केवळ शोभेचे बाहुले असल्याची धक्कादायक बाब ‘मटा’ने उघडकीस आणल्यानंतर राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

मंगळवारी बजेट

$
0
0
महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी शनिवारी आयोजित महासभा मान्यवरांना श्रध्दाजंली वाहून तहकूब करण्यात आली. या सभेचे आयोजन येत्या मंगळवारी (दि. ८) करण्यात येणार असल्याचे महापौर अॅड. यतीन वाघ यांनी जाहीर केले.

काँग्रेसचे राजीनामानाट्य

$
0
0
स्थायी समिती निवडणुकीपूर्वी झालेल्या घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाच्याच काही नगरसेवकांनी गटनेते लक्ष्मण जायभावे यांचा राजीनामा घेऊन तो महापौर अॅड. यतीन वाघ यांच्याकडे सादर केला. महापौरांनी हा राजीनामा मंजूर करून विभागीय आयुक्तांकडे पाठविला. यामुळे सध्या काँग्रेस पक्षाला गटनेताच नाही असे दिसते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images