Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदार नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठीच्या विशेष मोहिमेचा रविवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मतदारांना या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नुसते काँक्रिटीकरण नको; सुशो‌भिकरणही करा

$
0
0
गोदाघाटाच्या कामाअंतर्गत केवळ नुसते काँक्रिटीकरण करण्यापेक्षा वृक्ष लागवड आणि सुशोभिकरणाला प्राधान्य द्यावे, अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी केली. पर्यावरणप्रेमींच्या मागणीनंतर गोडसे यांनी शनिवारी सकाळी गोदाघाटाच्या कामाची पाहणी केली.

अवैध बांधकामांची चौकशी सुरू

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील अवैध बांधकामांच्या ‘मटा’तील वृत्तांची विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी गंभीर दखल घेतली असून या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हा परिषद सीईओ सुखदेव बनकर यांना दिले आहेत.

अर्थसंकल्पासाठी शनिवारी मुहूर्त

$
0
0
फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेला अर्थसंकल्प अखेर मंजुरीसाठी महासभेसमोर येणार आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी ५ जुलै, शनिवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पालखेडचे आवर्तन लांबले

$
0
0
एक तारखेला सुटणारे पालखेडचे आवर्तन आता येत्या ७ जुलैपर्यंत लांबल्याने येवला शहरवासीयांच्या पाणीसंकटात मोठी भर पडली आहे.

‘स्थायी’ वर आज तोडगा निघणार?

$
0
0
स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या रस्सीखेचवर आज (दि. २९) उशिरापर्यंत तोडगा निघण्याची शक्यता संबंधित पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बोगस आर्किटेक्टचे नाशकात इमले

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यात बोगस आर्किटेक्टचा सुळसुळाट झाला असून, किमान १०० जण स्वतःला आर्किटेक्ट म्हणून जाहीर करीत असल्याचा दावा द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी केला आहे.

...तर, ताकही फुंकून प्यावे लागते

$
0
0
भावनेच्या आहारी जावू नका, निवडणूक ही भावनेवर, प्रेमावर पार पडत नसते. गावागावात जाऊन अंदाज घ्या. सर्वांना विचारा, खरी माहिती काढा, मला ज्या सन्मानानं आणलं त्यात खंड पडू देवू नका. भावनेच्या आहारी जावून निवडणूक लढविण्याचा निर्णय लगेच घेता येणार नाही, कारण दुधाने तोंड पोळल्यावर ताक देखील फुंकून प्यावे लागते.

प्राध्यापंकाच्या प्रश्नांसाठी उभारणार आंदोलन

$
0
0
वरिष्ठा महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आगामी काळात या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन अभारणार असल्याचे प्रतिपादन एम. पुक्टोचे अध्यक्ष प्रा. ए.टी सानप यांनी केले.

मानवी हक्क आयोगाच्या कारभारात सुधारणा करावी

$
0
0
मानवी हक्क आयोगाकडे प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे निकालात काढून आयोगाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी आमदार वसंत गिते यांची विधानसभेत केली.

टर्मिनलप्रश्नी लवकरच बैठक

$
0
0
ओझर येथील विमानतळ टर्मिनलवरुन निर्माण झालेल्या वादाप्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी याच आठवड्यातच बैठक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पाणीकपात नव्हे, पाणी-कपात!

$
0
0
वरुणराजा रुसल्याने सगळ्यांनाच पावासाची आस लागली आहे. धरणांमधील आटत चाललेला पाणीसाठा आणि त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये भरगच्च छापून येणाऱ्या बातम्यांमुळे सामान्यांची चिंता वाढत चालली आहे.

रुग्‍णांचा उच्च दर्जाची सेवा द्या

$
0
0
सरकार ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा चांगल्या दर्जाची मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही.

पुन्हा प्रतीक्षा स्पेशल वॉटर ट्रेनची

$
0
0
मनमाड रेल्वेस्थानकात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना आणि येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे असताना शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वेने एकेकाळी पाणीटंचाईच्या काळात सुरू केलेल्या वॉटर स्पेशल ट्रेनची आठवण येत आहे.

जिल्हा बँकेच्या लिलावात ३७ ट्रॅक्टर्सची विक्री

$
0
0
प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळवण विभागीय कार्यालयामार्फत झालेल्या ट्रक्टर लिलावाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्हा बँकेच्या ट्रक्टर लिलावात ३९ पैकी ३७ ट्रॅक्टर विक्री झाले.

मोफत दफन विधी योजनेला सुरुवात

$
0
0
लिंगायत गवळी, महानुभाव, गोसा‍वी, ख्रिश्चन समाजातील नागरिकांना अंत्यविधीसाठी अर्थसहाय्य करण्याच्या मागणीला महापालिने मंजुरी दिली असून या योजनेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

पाणी कपातीबाबत आज होणार निर्णय?

$
0
0
लांबलेला पाऊस आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर DFO वठणीवर

$
0
0
वन हक्क दाव्याचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याला खुद्द वनविभागही जबाबदार असल्याची माहिती उजेडात आली आहे. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही विभागाच्या उपवनसंरक्षकांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी अखेर बैठकांना हजेरी सुरू केली आहे.

बिबट्या आला रे, आला!

$
0
0
इंदिरानगर भागात बिबट्याने दर्शन दिल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरातील अजिता सोसायटीच्या आवारात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या असल्याचे एका दूध विक्रेत्यानेही पाहिले, असा दावा केला जातो आहे.

विवरणपत्रांचा पडला पाऊस

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) बाबतचे विवरणपत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्यक्षात ४ हजार ७०० तर ऑनलाईन पध्दतीने ४ हजार ३०० विवरणपत्र एलबीटी विभागाकडे जमा झाले आहेत. महापालिकेने नोटीसा देईपर्यंत व्यापारी आपले विवरणपत्र सादर करू शकतात, अशी माहिती एलबीटी विभागाने दिली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images