Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राज्य बॅडमिंटन स्पर्धेत नाशिक, पुण्याचे वर्चस्व

$
0
0
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकच्या प्रांजल येवलेने स्पर्धेतील महत्त्वपूर्ण विजय नोंदवित ठाण्याच्या सिद्धेश हुडेकरला १०-१५, १५-१२, १५-१३ अशा तीन गेममध्ये पराभूत केले.

जेलरोडच्या ग्राहकांना महावितरणचा शॉक

$
0
0
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना महावितरणने वाढीव बिलांचे वाटप करून शॉक दिला आहे. जेलरोड परिसरातील अनेक ग्राहकांना वाढीव रकमेच्या बिलांचे वाटप झाल्याने नागरिक महावितरणवर संताप व्यक्त करीत आहे.

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0
शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच होत असून असे गुन्हे रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरते आहे. जबरी चोऱ्यांप्रमाणेच घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढविली असून शहरातील असे एकही पोलिस स्टेशन नाही जेथे चोऱ्यांचे प्रकार रोखण्यास पोलिसांना यश आले आहे.

... तर १ जुलैपासून शाळा बंद

$
0
0
पटसंख्येबाबत सरकारच्या नव्या पण उफरट्या धोरणांमुळे श‌िक्षकांवर संक्रांत येण्याचा मुद्दा उपस्थ‌ित करीत हा न‌िर्णय त्वरीत बदलावा, अन्यथा १ जुलैपासून शाळा बंद ठेवण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य श‌िक्षक परिषदेने द‌िला आहे. परिषदेच्या या न‌िर्णयाला महाराष्ट्र राज्य श‌िक्षक संघटनेनेही पाठिंबा द‌िला आहे.

सुरेश वाडकरांसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0
बनावट साठेखत करारनामा स्वत:च्या लाभात लिहून घेऊन तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात तो नोंदवून विश्वासघात केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गायक सुरेश वाडकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळीत महिलेलाही मदत उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

$
0
0
हुंडाबळी अथवा कौटुंबिक अत्याचारातून घडलेल्या जळीत प्रकरणातील पीडित महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी यापुढे राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य योजने’तून आर्थिक मदत दिली जाईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना गुरूवारी दिले.

उरला नऊ टक्के पाणीसाठा

$
0
0
जून महिना सरत आला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणी साठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात सध्या ९ टक्केच (६०५५ दशलक्ष घनफूट) पाणी उपलब्ध आहे.

स्थायीच्या निवडणुकीत घोडेबाजार तेजीत

$
0
0
महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. विविध पक्षांच्या सात उमेदवारांनी १५ अर्ज सादर केले असून, यंदाही घोडेबाजार तेजीत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सर्वच पक्षांना हवी महापालिकेची तिजोरी

$
0
0
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या ७ उमेदवारांनी १५ अर्ज सादर केले. सर्वच पक्षांनी सभापतीपदावर दावा केला असून यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

गलथान कारभाराचा धनगर समाजाला फटका

$
0
0
‘ध’ चा ‘मा’ करण्याची पद्धत सरकारी यंत्रणेला नवीन नाही. मात्र, या सर्व गलथान कारभाराच फटका मात्र धनगर समाजाला बसत असून ‘र’च्या ऐवजी ‘ड’चा उल्लेख केल्याने धनगर समाजाला योग्य ते आरक्षण मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सरकारने ही चूक सुधारून समाजाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा धनगर समाज युवा संघटनेचे अध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी केली आहे.

रमजानच्या महिन्यात वाहतूक नियोजनाची गरज

$
0
0
पवित्र रमजान महिन्यात सारडा सर्कल ते दामोदर टॉकीज व वडाळा नाका ते नागजी हॉस्पिटल या रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने पोलिस आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस स्टेशन यांना निवेदन दिले आहे.

कृषी संजीवनी योजनेला सुरुवात

$
0
0
कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्याकरिता सरकारने कृषी संजीवनी योजना सुरू केली असून ही योजना नाशिक परिमंडळात लागू करण्यात आली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील थकबाकी असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हिस्टॉरीकल फोटोवॉकसाठी व्हा सज्ज

$
0
0
निळ्याशार आकाशाची नवलाई पाहत असताना काळ्याभोर नभांची भाऊगर्दी हे स्वच्छंद आकाश व्यापून टाकू लागली आहे. रखरखीत उन्हाळा संपून येऊ घातलेला हिरवागार चिंब पावसाळा फोटोग्राफी लव्हर्सना निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी खुणावत आहे. ही संधी एका वेगळ्या निमित्ताने साजरी करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि नाशिक फोटो सर्कल यांच्यामार्फत ‘हिस्टॉरीकल फोटोवॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२९ जून) हा फोटोवॉक होणार आहे.

स्वच्छक पदभरतीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा

$
0
0
नाशिक विभागात स्वच्छक पदाच्या गोठवलेल्या जागा त्वरित पुर्नजिवित करून भरण्यात याव्यात अशी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची मागणी आहे. महामंडळाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याने ३ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेचे सचिव प्रमोद भालेकर यांनी दिला आहे.

पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

$
0
0
शहरात पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. आपल्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांनी पोलिस आयुक्तांना दरमहा सादर करावेत, असा उच्च न्यायालयाचा आदेश होता. परंतु, या आदेशालाही केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप अॅड. दिलावरखान पठाण यांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हेगारी व अवैध व्यवसायांवर अंकुश न मिळविल्यास आंदोलन करु असा इशाराही पठाण यांन‌ी दिला आहे.

आयटीआय कर्मचाऱ्यांचे ‘जागरण आंदोलन’

$
0
0
आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘जागरण आंदोलन’ छेडण्यात आले. सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय शिक्षक पदधारकांना लागू केलेली वेतन संरचना महाराष्ट्रातील आयटीआय निर्देशकांसह शासकीय तथा पर्यवेक्षीय पदधारकांना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

येवल्यातील प्रस्तावित सिंचन प्रकल्प अडचणीत

$
0
0
येवला तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा निर्माण झाली असतानाच वनखात्याने ममदापूर येथील ६० चौ.कि.मी. क्षेत्र वन्य जीवांसाठी संरक्षित वनक्षेत्र (अभयारण्य) घोषीत करण्याचे ठरविले आहे. यामुळे हे अभयारण्य देवनाचा सिंचन प्रकल्प व ममदापूर साठवण बंधाऱ्यासाठी अडसर ठरू लागल्याने प्रस्तावित सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘हाफ डे’ला रचना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परवड

$
0
0
पोलिस आयुक्तालयाच्या शेजारीच असलेल्या रचना विद्यालयातील विद्यार्थ्यांना हाफ डेच्या दिवशी बसची प्रतीक्षा करत तास न् तास ताटकळत उभे रहावे लागते. शहर बससेवेकडून या दिवशी दुपारी बस दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सातपूर भागातून रचना विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व्यवस्थापन व महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची मागणी पालक करत आहेत.

घरचे झाले थोडे...

$
0
0
मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होईल असे वाटत होते; मात्र महामार्गावरील इंदिरानगर अंडरपास म्हणजे पोलिस यंत्रणा आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दररोज होणारी वाहतुककोंडी सोडविण्यासाठी सिंहस्थापूर्वीच इंदिरानगर अंडरपासबाबत गांर्भीयाने नियोजन व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बळीराजाला प्रतीक्षा जोरदार पावसाची

$
0
0
सिन्नर तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असून जून महिना संपत आला तरी पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसाअभावी खते व बियाणे खरेदी न केल्यामुळे दुकानदारांचेही डोळे आकाशाकडे लागले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images