Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाडेवाढीविरोधात काँग्रेसचे रेलरोको

$
0
0
मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ नांदगाव तसेच मनमाड शहर काँग्रेस कमिटीतर्फे मनमाड रेल्वेस्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आले. हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस काही मिनिटे रोखून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे भाडेवाढीचा निषेध करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

जोगन यांना पोलिस कोठडी

$
0
0
येवला शहर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक मंगल बाबुराव जोगन (वय २८) यांना बुधवारी निफाड येथील अतिरिक्त व सत्र न्यालायासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचे उपोषण

$
0
0
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या बोगस पंचनाम्यांची चौकशी करून मदतीपासून वंचित ठेवलेल्या पीडित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान अदा करावे, या मागणीसाठी सटाणा शहरासह मुंजवाडच्या बारा शेतकऱ्यांनी बुधवारपासून बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यात लाखोंचा घोटाळा

$
0
0
प्रत्यक्षात जमिनीवर कांदा, डाळिंब पीक नसताना बोगस पंचनामे करून बागलाण तालुक्यात शासकीय मदतीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय पथकाची ‘बीएचआर’वर धडक

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतील (बीएचआर) सोळाशे कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेने कोणत्याही पूर्वसूचनेविना राज्यभरातील आपल्या शाखा बंद ठेवल्याच्या तक्रारींची केंद्रीय सहकार खात्याने गंभीर दखल घेतली आहे.

पीएफ ऑफिस झाले अपडेट !

$
0
0
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालय म्हटले की, तेथील संथ कामकाजामुळे येथे जाणाऱ्या कामगारा अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, असा आतापर्यंतचा समज होता. मात्र, पीएफ कार्यालयाने कात टाकली असून, ऑनलाइन प्रक्रियेसह जलदकामकाज पद्धती स्व‌िकारल्याने पीएफ ऑफिस अपडेट झाले असून, आता एका महिन्यात क्लेम प्र‌क्रिया पूर्ण होऊ शकणार आहे. यामुळे कामगारवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

हिंमतराव पाटलांची चौकशीच नाही

$
0
0
वनविभागातील भ्रष्टाचारासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फेब्रुवारीमध्ये काही संशयितांची यादी मिळाली होती. यामध्ये चवथ्या–पाचव्या क्रमांकावर पाटील एवढेच आडनाव होते. पाटील कोण याचा उलगडा होत नसल्याने पाटील आडनावाच्या व्यक्तीची चौकशीच झाली नव्हती अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी बुधवारी दिली.

लालफितीत अडकले वसतिगृह?

$
0
0
आदिवासी विकास आयुक्तालयाने जुने सिडकोत कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली घरांची दयनीय अवस्था झाली आहे. आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची ३९ घरे पाडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव केवळ समन्वयाच्या अभावापायी मागे पडला आहे.

पिंपळगाव स्थानकाला बसेसचा असाही ‘बायपास’

$
0
0
नाशिक विभागातील सर्व आगाराच्या बसेसला पिंपळगाव बसस्थानकात थांबा द्यावा, या मागणीचे निवदेन पिंपळगाव आगारप्रमुख मनीषा सपकाळ यांना शहर शिवसेना व भाजपच्या वतीने देण्यात आले.

रेशनच्या गव्हात आढळले यूरिया, डीएपी

$
0
0
कळवाडी (ता. मालेगाव) येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात आलेल्या गव्हात रासायनिक खत आढळल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबधित धान्य दुकानदाराविरोधात ग्रामपंचायतीकडे दाद मागितली.

अंधांसाठी खुलं होतंय वाचनालय

$
0
0
श‌िक्षणाच्या मर्याद‌ित टप्प्यापल‌िकडे अंधांना वाचनासाठी मुबलक प्रमाणात अवांतर साह‌ित्यही उपलब्ध करुन देण्यात यावे, यासाठी नॅशनल असोस‌िएशन फॉर द‌ि ब्लाईंड (नॅब) च्या माध्यमातून दृष्टीबाधितांसाठी वाचनालय आण‌ि संदर्भ ग्रंथालय खुले करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (द‌ि.२७ जून) होणार आहे.

कर्जबाजारी पाल‌िकेला नकोशी झाली मदत

$
0
0
वृक्षलागवडीपोटी महापाल‌िकेचा होणारा तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचा खर्च वाचव‌िण्यासोबतच वृक्षलागवडीची हमी घ्यायला न‌िमा पुढे सरसावली आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या तोंडावर कर्जाच्या ओझ्याखाली बुडतीला लागलेल्या महापाल‌िकेला हा मदतीचा हातही नकोसा झाला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0
रस्त्यावर बेशिस्तपणाचे दर्शन घडवत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर बुधवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सीबीएस आणि शालिमार येथील तब्बल २०० रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

शिवाजी सहाणे यांची उलटतपासणी संपली

$
0
0
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जयंत जाधव यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जुलै अखेर निकाल लागण्याची शक्यता शिवाजी सहाणे यांनी वर्तविला आहे.

नाशिक होणार होर्डिंगमुक्त

$
0
0
शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणारे अनधिकृत होर्डिंग, फलक, पोस्टर्स लवकरच हटवावी लागणार आहे. अशा होर्डिंग्सवर चार आठवड्यांच्या आतच कारवाई करून १९ जुलैपर्यंत त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत.

नगररचना सहसंचालक बदलीसाठी दबाव

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील अनेक बांधकामाचे प्रस्ताव रखडल्याने नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक विनय शेंडे यांची तातडीने बदली करावी अन्यथा एकही प्रकरण दाखल केले जाणार नाही, असा इशारा बिल्डर, इंजिनीअर तसेच आर्किटेक्ट यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

नेहमीचीच हिडीस फिडीस!

$
0
0
कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील संबध सर्वज्ञात आहेत. अधिकारी कसाही असला तरीही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढे हाजी-हाजी करावे लागते. त्यातील काही स्वाभिमानी कर्मचाऱ्यांनी जर तत्वात न बसणाऱ्या अधिकाऱ्याच्या सूरात सूर नाही मिळविला तर त्याची काही खैर नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना अखेर पावली ‘लक्ष्मी’

$
0
0
एसटी महामंडळाचे तोट्याचे आकडे वाढतच असल्याने मुळातच वेतन कमी. ते वाढावे अशी रास्त अपेक्षा. मात्र, अपेक्षेनुरूप पगार न वाढता तोंडाला पानेच पुसली जातात. वाढीव फरकाची रक्कमही दोन वर्षे न मिळाल्याने कर्मचारी नाराज होते. परंतु, दिलेल्या शब्दाला जागत महामंडळाने बुधवारी थकबाकीतील अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली.

श‌िक्षकांच्या मेड‌िकल ब‌िलांची लागणार तड

$
0
0
शालेय श‌िक्षण आण‌ि क्र‌‌ीडा व‌िभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आण‌ि व‌िनाअनुदान‌ित शाळांमधील श‌िक्षक आण‌ि श‌िक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिलांबाबतच्या प्रलंब‌ित प्रकरणांची तड यापुढे त्वरित लागणार आहे.

तहसील कार्यालयात एजंटाला अटक

$
0
0
नाशिक तहसील परिसरात फिरणाऱ्या एका एजंटला खुद्द तहसीलदारांनीच बुधवारी पकडले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, तहसिल परिसरात एजंटगिरी बोकाळल्याचा दावा खुद्द तहसिलदारांनीच केला आहे. सुभाष सानप असे पकडलेल्या एजंटचे नाव आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images