Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओझर टर्मिनलसाठी वादाचे उड्डाण !

$
0
0
काही महिन्यांपूर्वीच सज्ज झालेले ओझर विमानतळाचे देखणे टर्मिनल वादात सापडल्याची चिन्हे आहेत. हे टर्मिनल सांभाळण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने टेंडर काढले आहे. मात्र या टर्मिनलसाठी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) इच्छूक असल्याने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी)ने एचएएलवर दबाव आणण्यासाठी टर्मिनलवर खर्च केलेला ८४ कोटींचा पर्यटन निधी परत द्या अशा मागणीचे पत्र ‘एचएएल’ला दिले आहे. यामुळे ओझर टर्मिनलवरून विमानाऐवजी वादाचेच उड्डाण होण्याची शक्यता अधिक आहे.

मंदीचा फटका ७१ कोटींवर

$
0
0
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे २०१३-१४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नाला ७१ कोटी रूपयांचा फटका बसला. तसेच जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न देखील १८ टक्क्यांनी कमी झाले असून, २०१४-१५ या आर्थिक वर्षांत मंदीचा फेरा कायम राहिला तर महापालिकेच्या आर्थिक डौलारा कोलमडणार की काय याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेला शाश्वत उत्पन्न हवे

$
0
0
एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) असो की जकात, कर कोणताही लावा. मात्र, यातून महापालिकेला दररोज पैसा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत महापौर अॅड. यतीन वाघ यांनी महापौर परिषदेमध्ये व्यक्त केले. याबरोबर महसूल गोळा करण्याचा अधिकार महापालिकेचा असून, राज्य सरकारने या अधिकारावर अतिक्रमण करू नये, असा सूर देखील बैठकीत उमटला. बैठकीस २६ पैकी अवघे ९ महापौर हजर होते.

अव्वल कारकुनाला लाच घेताना अटक

$
0
0
जमीन खरेदीच्या परवानगीची टिपणी तयार करून तिला मंजुरी मिळवून देण्यासाठी तसेच नजराणा भरण्याचे पत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकुनाला अटक करण्यात आली आहे. नामदेव बाबुराव मोरे असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे.

ट्रॅप रोखण्यासाठी व्हिजिलन्स सेल

$
0
0
जिल्ह्याच्या महसूल विभागात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करतानाच पारदर्शक कामकाजाला चालना देण्यासाठी लवकरच स्पेशल व्हिजिलन्स सेल (विशेष दक्षता विभाग) कार्यरत होणार आहे. या सेलसाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर दिला जाणार असून कुठल्याही कामासाठी लाच मागण्यात आली तर संबंधितांना या नंबरवर तक्रार करत येणार आहे.

लष्करी अधिकारी होणार संगणक साक्षर

$
0
0
लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे पुनर्वसन करुन ताठ मानेने जगता यावे यासाठी आयसेक्ट या शैक्षणिक संस्थेतर्फे संगणक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून लष्करी अधिकारी संगणक साक्षर होणार आहेत. हे प्रशिक्षण नाशिक बरोबरच ओझर, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि छत्तीसगडमधील रायपूर येथेही सुरू करण्यात आले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस खासगी आयटीआयचा विरोध

$
0
0
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रा‌बवितांना खासगी औद्यागिक प्रशिक्षण केंद्रांना (आयटीआय) राज्य शासनाने विश्वासात घेतले नाही. त्यामुळे खासगी ‘आयटीआय’चे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना मंगळवारी, २४ जून रोजी मुंबईला भेटणार असल्याचे अशासकीय आयटीआय संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी ‘मटा’ला सांगितले.

घर खरेदीत पुण्याला पसंती

$
0
0
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण डोंबवली आणि ठाणे शहरांपैकी पुणे शहरात घरांची सर्वाधिक खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येते. एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्समधून मिळणारा एक टक्का सरचार्ज मिळवण्यात पुणे आघाडीवर असून, यानंतर ठाणे, नाशिक आणि कल्याण डोंबवली महापालिकांचा नंबर लागतो.

नासाका सुरू करण्यासाठी खा. गोडसे यांचे प्रयत्न

$
0
0
नाशिक सहकारी साखर कारखाना मागील गळीत हंगामात बंद पडल्याने शेतकरी व कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगामी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळाशी चर्चा केली.

इलेक्ट्रो होमिओपॅथीक डॉक्टरांवरची कारवाई थांबवावी

$
0
0
राज्यातील इलेक्ट्रो होमिओपॅथीक वैद्यकीय व्यावसायिकांवर होत असलेली कारवाई त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मागण्यांबाबत ते बोलत होते. फेब्रुवारी २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालय तसेच डिसेंबर २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील इलेक्ट्रो होमिओपॅथीक वैद्यकीय व्यावसायिकांना आपला व्यवसाय अधिकृतपणे करता येईल तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अॅक्ट १९६१ च्या कलम ३३ नुसार कारवाई करता येणार नाही, असा निकाल दिलेला आहे.

`वन्य प्राण्यांची दुनिया’ प्रकाशित

$
0
0
विज्ञान लेखक रमेश महाले यांच्या ‘वन्य प्राण्यांची दुनिया’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. वन्य प्राण्यांचे जीवन, त्यांची जीवनशैली, आहार आणि निसर्गाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व या पुस्तकात मांडण्यात आले आहे. रमेश महाले यांचे हे १०० वे पुस्तक असून, त्याचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या हस्ते करण्यात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किशोर पवार उपस्थित होते.

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

$
0
0
मान्सूनपूर्व सरी वगळता नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत मान्सूनने आपले अस्तित्व दाखविले नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाचा नजरा आभाळाकडे लागल्या असून, `ये रे घना, दे रे घना` अशी आर्त साद तो घालत आहे.

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून

$
0
0
महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना व नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २५ जूनपासून सुरू होत आहेत. या स्पर्धा आडगाव नाका येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर (विभागीय क्रीडा संकुल) होतील.

आजपासून भागवत सप्ताह

$
0
0
जन्मजात अपंग असलेल्या व पोलिओग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठी श्रीमद भागवत सेवा परिवार जोधपूर व नाशिकरोड येथील महेश सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. मोहनाबाई नंदलालजी राठी माहेश्वरी भवन आर्टीलरी सेंटररोड येथे हा महोत्सव आयोजीत केला असून, २४ जून ते ३० जून या कालावधीत तो संपन्न होणार आहे.

क्रीडाभूमी म्हणून नाशिकची ओळख

$
0
0
‘नाशिक शहराने मंत्रभूमी, यंत्रभूमी बरोबरच क्रीडा क्षेत्रात आपले नाव उंचावले असून, क्रीडाभूमी म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.’ असे प्रतिपादन महापौर यतीन वाघ यांनी केले. जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने मॅरेथॉन धावपटू शिल्प अनावरण व ऑलिम्पिक डे रनचे सोमवारी सकाळी आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अन् टवाळखोरांना घडली अद्दल !

$
0
0
तरुणी, महिलांनी थोडा सावधपणा दाखवित धाडस केले व पोलिसांना योग्य माहिती दिल्यास टवाळखोरांना अद्दल घडविता येऊ शकते, याचा सुखद अनुभव नुकताच आला. रविवारी सायंकाळी नाशिकरोडपासून द्वारका चौकापर्यंत भररस्त्यात तरुणींची छेडछाड करीत चाललेल्या मोटरसायकलस्वार टवाळखोरांना भद्रकाली पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेऊन धडा शिकविला. संबंधित तरुणींनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. नागरिकांनी, संबंधीत व्यक्तींनी अशाप्रसंगी सतर्कता दाखविल्यास तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही पोलिसांकडून दिली जात आहे.

ये रे घना, दे रे घना...

$
0
0
मान्सूनपूर्व सरी वगळता नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत मान्सूनने अस्तित्व दाखविले नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाचा नजरा आभाळाकडे लागल्या असून, `ये रे घना, दे रे घना` अशी आर्त साद तो घालत आहे.

येवल्यात पक्षांतराचे वारे

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी ‘मातोश्री’वर जावून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त तालुक्यात आल्यानंतर येवल्यातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.

ग्रामीणभागात अवैध वाहतूकीत वाढ

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अनेकदा चर्चा होते. मात्र, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात आजही अवैध प्रवासी वाहतूक व्यवस्थेवरच ग्रामीण भागातील नागरिकांना विसंबून रहावे लागत आहे. या दुर्लक्षित घटकाकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न असून, अवैध वाहतुकीमुळे होणारे अपघात हाही मोठा प्रश्न आहे.

डीपी रस्त्याचे काम रखडले

$
0
0
महापाल‌िकेने आसाराम बापू आश्रमापासून ते नवश्या गणपती मंदिरापर्यंतच्या २४ मीटर डीपी रस्त्याचे काम मागील वर्षी हाती घेतले होते. मात्र, आसाराम बापू आश्रमातील रस्ता झाल्यानंतर पुढील रस्त्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. महापालिकेने हे काम अर्धवट ठेवल्याने गंगापूररोडला पर्याय समजला जाणारा हा रस्ता अजूनही प्रतीक्षेत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images