Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भक्कम इमारत ठरवली धोकेदायक

0
0
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाचकंदील मराठी मुलींच्या शाळेची इमारत धोकेदायक असल्याचे ठरवित मालेगाव मनपा प्रशासनाने तोडण्याचा घातलेला घाट आमदार दादा भुसे, शिवसेना उपमहानगर प्रमुख दिनेश पाटील व स्थानिक नागरिकांनी आक्रमकपणे हाणून पाडला.

कामगारांच्या कल्याणासाठी विकास मोहीम

0
0
महाराष्ट्र शासनाने कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विकासासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करून विकास मोहीम राबविली जात आहे. मात्र, पुरेशा प्रचार आणि प्रसाराअभावी जुने सिडकोतील शिवाजी चौकातही कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीत राबविले जाणारे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसते.

सिध्देश भावसार गणितात प्रथम

0
0
श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा सिध्देश सुधीर भावसार गणित विषयात १०० गुण मिळवून राज्यात प्रथम आला. त्याला एकूण ४७८ गुण (९५.६०) मिळाल्याने तो येवला तालुक्यातही प्रथम आला आहे.

रामकुंडाचे यंदा काटेकोर निरीक्षण

0
0
पुढील वर्षी जुलैत सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होणार आहे. यामुळे यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची विशेष खबरदारी घेतानाच रामकुंड परिसरातील परिस्थितीचे काटेकोर निरीक्षण केले जाणार आहे. परिणामी, सिंहस्थात या सर्व बाबींचा आधार घेऊन योग्य ते नियोजन केले जाणार आहे.

होमिओपॅथीक डॉक्टरांना अखेर न्याय

0
0
राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या अॅलोपॅथी प्रॅक्टीस बाबतच्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात होमिओपॅथीक डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचे विधेयक पारीत करण्यात आले आहे.

तरुणाचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू

0
0
अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या तरुणाचा स्वाइन फ्ल्यूने इंदूर येथे खासगी हॉस्पिमटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. हा तरुण ५ जूनला नाशिकहून इंदूरला गेला होता. १२ जूनला त्याला स्वाइन फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झडती

0
0
सर्वसामान्यांच्या विविध कामांचे रखडणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, निर्णयाविना रखडलेली अनेक प्रकरणे या आणि अशा विविध विषयांवरुन विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

मालेगावकरांच्या आशा पल्लवित

0
0
नाशिक जिल्हाधिकारी यांना सरकारकडून मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रस्ताव मागितला आहे. यामुळे पुन्हा एकदा मालेगाव जिल्हा निर्मितीची आशा पल्लवित झाली आहे.

महिलेवर वार करून दागिने लुटले

0
0
नोकरीस लावण्याच्या आमिषाने बोलावून घेणाऱ्या पतीच्या मित्राने महिलेवर चाकूने वार करून तिच्याजवळील दागिने हिसकावून नेले. पाथर्डी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

बांडगुळाचीही पूजा!

0
0
एक ज्येष्ठ नागरिक फि!रण्यासाठी एका रस्त्याने जात असताना त्यांना एके ठिरकाणी पूजेचे तबक घेऊन जाणाऱ्या महिमलांचा घोळका दिरसला. चक्क लिंठबाच्या झाडाच्या खोडाला महि ला अत्यंत श्रध्देने दोरा गुंडाळून प्रदक्षिाणा घालत होत्या.

वीजचोरांना बसणार महावितरणचा शॉक

0
0
महावितरणतर्फे वीज चोरांना पकडण्यासाठी राबवविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात जवळपास ६२ जणांवर कारवाई केली आहे. यातून १० लाखांचा विक्रमी दंड वसूल करीत वीजचोरांना शॉकच दिला आहे.

कांद्यावरील निर्यातमूल्य हटविण्याची मागणी

0
0
कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातमूल्य 300 डॉलर प्रतीटन केले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य हटवावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला अडचणीत आणण्यात सुरुवात केली आहे.

नुकसानीचे पंचनामे करताना खाडाखोड

0
0
बागलाण तालुक्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थांनी चक्क खाडाखेाड करून सुमारे सातशेवर पीडित शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला.

पावसाने उडवली त्रेधातिरपीट

0
0
पहिल्याच पावसात गुरुवारी शहरातील रस्ते जलमय झाले होते. तसेच गंगापूररोड, सातपूर, अंबड व सिडको परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

भूमिहीनांना मिळणार ‘सातबारा’

0
0
तालुक्यातील महालखेडा पाटोदा व महालखेडा चांदवड या दोन गावांमधील गायरान जमिनीत अतिक्रमण करून ती कसणाऱ्या भूमिहीनांच्या जमिनीची तहसीलदार शरद मंडलिक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

गोदापार्क वर्षात राज यांची माहिती

0
0
गोदापार्कच्या कामाचा पहि;ला टप्पा आगामी वर्षभरात पूर्ण होईल, असाही विदश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्याने गोदापार्कचे काम लांबल्याचेही त्यांनी सांगितले.

`हाय कोर्टातील वृक्ष याचिका मागे घ्या`

0
0
गंगापूर रोड येथील रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याच्या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टातील जनहित याचिकाच मागे घ्या, अशी आर्जव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वृक्षप्रेमींकडे केली आहे. मात्र, ही याचिका मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले आहे.

बायपासने केला तोट्याला `पास`!

0
0
नाशिक आणि धुळे आगाराने संयुक्तरित्या सुरू केलेली ‘धुळे-नाशिक बायपास विनावाहक बस’ दोनही आगारांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरत आहे. विनावाहक असल्यामुळे कमी मनुष्यबळात सुरू असलेल्या या बसपासून जानेवारी ते मे पर्यंत नाशिक आगाराला जवळपास एक कोटी २८ लाख तर धुळे आगाराला तब्बल ३ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

गमावलेली संधी पुन्हा गवसली

0
0
पोलिसांनी ठरवून दिलेल्या दिवशी भरती प्रक्रियेसाठी हजर न राहू शकलेल्या उमेदवारांना गुरूवारी भरती प्रक्रियेला सामोरे जाण्याची संधी देण्यात आली. अशा ६० उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडली आहे. गमावलेली संधी पुन्हा प्राप्त झाल्याने या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आंनदाची लकेर उमटली.

महिलेचा संशयास्पद मृत्यू

0
0
दुसऱ्या लग्नाबाबत पतीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांची घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. हनुमानवाडीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images