Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मधु मंगेश कर्णिक

0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नुकत्याच पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या विश्वस्तपदाची मुदत २५ जून रोजी संपत असल्यामुळे या बैठकीत भावी अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली.

अखेर जिल्हाधिकारी अवळखेड्यात मुक्कामी

0
0
राज्याच्या मुख्य सचिवांनी आदेश दिल्यानंतर पहिल्याच शुक्रवारी ग्रामीण भागात जाऊन मुक्काम करण्याच्या उपक्रमाला दांडी पडल्याने जिल्हाधिकारी विलास पाटील हे रजेवरुन कामावर रुजू होताच सोमवारी इगतपुरी तालुक्यातील अवळखेडा या गावात दाखल झाले. तेथेच त्यांनी मुक्काम करत अनेक समस्या जाणून घेतल्या.

उमेदवारांची २१ ला पुन्हा चाचणी

0
0
अॅथलेटिक्सच्या मार्गदर्शनाने बनविण्यात आलेला १०० मीटर धावण्याचा ट्रॅक पाच ते आठ मीटर कमी आखला गेला होता. पोलिस भरतीसाठी पहिल्या दिवशी आलेल्या उमेदवारांनी हे अंतर चमत्कारिकरित्या अल्पावधीत पूर्ण केल्याचे भरती प्रक्रियेच्या व्हिडीओ रेकॉर्डींगवरून स्पष्ट झाले आहे.

सिव्ह‌िलमध्ये परिचारिकांचा ठिय्या

0
0
सिव्हिल हॉस्पिटलमधील २० हून अधिक परिचारीकांच्या ग्रामीण भागात बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनने सोमवारी दुपारपर्यंत कामबंद आंदोलन केले. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरच त्यांनी ठिय्या मांडल्याने येथील कामकाज विस्कळीत झाले होते.

महाराष्ट्र बँकेचा सर्व्हर डाऊन

0
0
सार्वजनिक वाचनालयासमोरील महाराष्ट्र बँकेच्या शहर शाखेचा सर्व्हर ऐन सोमवारीच दिवसभर डाऊन राहिल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. दुपारपर्यंतही सर्व्हर चालू होऊ न शकल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मतदार हेल्पलाईन सुरू करणार

0
0
अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादी उपलब्ध नसल्याची दखल घेत लवकरच मतदार हेल्पलाईन कार्यरत करणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गितांजली बाविस्कर यांनी दिली आहे. या हेल्पलाईनला लोकसभा निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळाला असल्याने फोन करताच मतदारांना त्यांचे नाव यादीत आहे की नाही याची त्वरित माहिती दिली जाणार आहे.

‘भ्रष्टाचार निर्मुलन’ची बैठक वादळी

0
0
अनेक अनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभाराबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्यामु‍ळे अनेक तक्रारदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, अनेक प्रकरणात तक्रारदारांनी सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक अत्यंत वादळी ठरली.

जिल्ह्याचे महापौर

0
0
नाशिक शहरात सध्या खेळाला चांगले दिवस आले आहेत. राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जात असून अनेक खेळाडू यात सहभागी होत आहे. राज्यस्तरीय खेळाच्या आयोजनासाठी एका संस्थेने एका नामांकीत हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स आयोजीत केली होती.

हुश्श....! न‌िकाल लागला

0
0
दहावीच्या न‌िकालाबाबतच्या उलट सुलट अफवांमुळे संभ्रमात सापडलेल्या व‌िद्यार्थ्यांचा जीव आज अखेर भांड्यात पडला. मंगळवारी दहावीच्या परीक्षेचा न‌िकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर होताच आनंद अन् उत्साहाचे भाव यशस्वी व‌िद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास म‌िळाले.

भुजबळांचा सर्वाधिक ५५ लाखांचा खर्च

0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि डॉ. भारती पवार यांनी सर्वाधिक खर्च करूनही त्यांच्या पदरी पराभवच आला आहे. निवडणुकीतील उमेदवारांनी त्यांचा खर्च सादर केला असून, एकूण ५ उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही.

हमाल-व्यापाऱ्यांचा संप ही तर इष्टापत्ती

0
0
हमाल-व्यापाऱ्यानी पुन्हा एकदा संप पुकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणले. बाजार समित्यांचे व्यवस्थापन व जिल्हा निबंधक यांची भूमिका संशयास्पद ठरूनही शेतकरी संघटित नसल्याने व राज्य सरकारची उदासिनतेने ही दडपशाही चालू आहे.

अंबडमधील रस्ते ‘राम भरोसे’

0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे ते एक्सलो पॉईंट या मुख्य रस्त्यासोबतच अंतर्गत रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. जागोजागी असलेले खड्डे वाहनधारकांचीही पाठ खिळखिळी करत आहेत.

प्रियंका आल्याची अॅपवर हूल

0
0
जळोद येथील तापी पुलावर प्रियंका चोप्रा हिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची अफवा व्हॉट्स अॅपवरून मंगळवारी सकाळी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अमळनेरसह जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांनी आपली आवडती हिरोइन पाहण्यासाठी जळोद पुलावर धाव घेतली.

स्टेट बँकेतून सहा लाख लांबविले

0
0
सिन्नर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने एका ग्राहकाचे सहा लाख रुपये हातोहात लांबवल्याने खळबळ उडाली आहे. अशाच प्रकारची चोरी सोमवारी झाली असून एका ग्राहकाचे छत्तीस हजार रुपये लांबवल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे.

कांदा लिलाव आजपासून पूर्ववत

0
0
माथाडी कामगारांच्या वाढीव वेतनदाराच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी सोमवार (दि. १६) पासून पुकारलेला बेमुदत कांदा लिलाव बंद मंगळवारी मागे घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक होणार इलेक्ट्रॉनिक हब

0
0
इलेक्ट्रॉनिक विश्वातील संभाव्य संधी आणि रोजगाराची निर्मिती या दोन्ही बाबींचा विचार करता केंद्र सरकारने देशात आठ इलेक्ट्रॉनिक हब विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यात नाशिकचाही समावेश आहे.

हॉस्पिटल होणार कधी ?

0
0
सातपूर परिसरात कामगारवर्ग मोठ्या संख्येने असल्याने या परिसरात महापालिकेच्या हॉस्पिरटलची गरज आहे. चुंचाळे शिवारातील महापालि्केच्या हॉस्पििटलसाठी आरक्षित भूखंड आहे.

खायला काळ अन् भुईला भार!

0
0
वर्षानुवर्षे धूळखात‌ पडलेली वाहने पोलिस आणखी किती दिवस सांभाळणार आहेत, कोण जाणे? एकीकडे पोलिस स्टेशन्सची अपुरी जागा अन दुसरीकडे दिवसागणिक पोलिस आवारात वाढत चाललेली गुन्ह्यांतील वाहनांची संख्या यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होण्याऐवजी ती वाढतेच आहे.

म्हणे, देवा मला पास कर…

0
0
मंगळवारी दहावीचा निकाल लागला. पेपरच्या पहिल्या दिवसांपासून तर अगदी कम्प्युटरवर निकाल दिसेपर्यंत प्रत्येकाच्या मुखी भगवंताचा धावा सुरूच होता. काहींनी तर नवसही बोलून ठेवले होते. देवा मला पास कर…

‘ती’ आहे का सुरक्षित?

0
0
गेल्या काही महिन्यांमध्ये भारत सोडून जावा, अशी भावना आमच्यासारख्या तरुणांच्या मनात येते आहे. परदेशाचे आकर्षण, अमाप पैसा मिळविण्याची इच्छा किंवा लाइफस्टाईल ही या भावनेमागची कारणे मुळीच नाहीत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images