Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनमाड, नांदगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी येत्या १७ जून रोजी निवडणूक होणार असल्याने मनमाड व नांदगाव येथे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मनमाड पालिकेत ओबीसी तर नांदगाव पालिकेत खुल्या वर्गासाठी आरक्षण असल्याने उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

गौळाणेत स्फोटात दोघे जखमी

$
0
0
कुतुहल म्हणून उचलेला धातुचा गोळा दगडावर आपटताच त्याचा स्फोट झाला. ही घटना गौळाणे येथील एका द्राक्ष मळ्यात शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सिडकोत पाण्यासाठी आंदोलन

$
0
0
सिडकोतील शांतीनगर प्रभाग ५२ मधील महिलांनी पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने आज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच महिलांनी सभापती उत्तम दोंदे यांना घेराव घालत वेळेवर पाणी देण्याची मागणी केली. यावेळी महिलांनी पिण्याचे पाणी दोन तास का होईना पण, वेळेवर देण्याची मागणी केली.

कर्नल आनंद देशपांडे यांना दंड

$
0
0
निर्धारित वेळेत अर्जदाराला मागितलेली माहिती न दिल्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाचे जन माहिती अधिकारी कर्नल आनंद देशपांडे यांना दोन हजार रुपये दंडाची शिक्षा राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक पी. डब्ल्यू. पाटील यांनी केली आहे.

पोलिस भरतीला साडेसातशे जणांची दांडी

$
0
0
ना‌शिक शहर आणि ग्राम‌ीणमध्ये भरती प्रक्र‌ियेला सुरूवात झाली असली तरी उत्साह कमी असल्याचे पहावयास मिळतो आहे. पहिल्याच दिवशी शहरात ३२८ तर ग्रामीणमध्ये ३९७ जणांनी भरती प्रक्र‌ियेला दांडी मारली. उर्वरीत उमेदवारांपैकी अनुक्रमे १५६ आणि १२६ उमेदवार भरतीसाठी अपात्र ठरले आहेत.

अंदाजपत्रकात एक हजार कोटींची वाढ

$
0
0
स्थायी समितीने १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाचा ठराव अखेर प्रशासनाला सादर झाला. स्थायी समितीने प्रशासनाच्या अंदाजपत्रकात तब्बल १ हजार कोटींची वाढ केली असून महासभेत येण्यापूर्वीच अंदाजपत्रकाचा आकडा २ हजार ९६२ कोटी रूपयांच्या पुढे सरकला आहे.

सीईटीत आद‌ित्य वडगावकर पह‌िला

$
0
0
असोस‌िएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड प्रायव्हेट मेड‌िकल अॅण्ड डेंटल कॉलेज (एएमयूपीएमडीसी) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या असो‌स‌िएट सीईटी परीक्षेत येथील आरवायके कॉलेजचा व‌िद्यार्थी आद‌ित्य वडगावकर याने उत्तर महाराष्ट्रातून पह‌िला तर राज्यात ११ वा क्रमांक पटकाव‌िला. त्याने ७२० पैकी ६५५ मार्क म‌िळव‌िले.

'गोदावरी'साठी प्राधिकरण स्थापा!

$
0
0
नाशिक तीर्थक्षेत्री​ पुढील वर्षी कुंभमेळा असून, त्याआधी नाशकातील गोदावरी नदीच्या स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात यावी. त्यासाठी राज्य सरकारने गोदावरी विशेष प्राधिकरण स्थापन करावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. हेमंत टकले यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

महापालिकेचे बजेट ‘गरम’

$
0
0
महापालिकेच्या २०१४-१४ या वर्षाच्या अंदाजपत्रकास अद्याप महासभेची मंजुरी मिळालेली नाही. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दीक वाद रंगले असून स्थायी समितीकडून आज, शुक्रवारी अंदाजपत्रकाचा ठराव प्रशासनाला देण्यात आला. आता, अंदाजपत्रकातील दिरंगाई हा मुद्दा कोणत्या वळणावर जातो, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शहरातून सात बाईक्सची चोरी

$
0
0
शहरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, गेल्या दोन तीन दिवसांत ७ मोटरसायकली चोरीस गेल्याची नोंद पोलिस स्टेशन्सला करण्यात आली आहे.

साधुग्रामचा प्रश्न निकाली निघणार?

$
0
0
साधुग्राम जमीन भूसंपादनाचा प्रलंबिित प्रश्न आणि महापालिकेची आर्थिक परिस्थिती अशा प्रमुख दोन प्रश्नांसह सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधीत इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी आज (शनिवारी) सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मध्यवर्ती कारागृहाची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे

$
0
0
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या उत्पादनात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सुमारे दोन कोटींच्या विविध वस्तूंचे उत्पादन कारागृहातील कैद्यांनी केले आहे.

देवळाली कॅम्पमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

$
0
0
बंद सदनिकेचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सव्वा लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरून नेला. देवळाली कॅम्प परिसरात ही घटना घडली. राजाराम पाटीलबा ढाले (पंचरत्न सोसायटी दे. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस भरतीला हजेरी वाढली

$
0
0
ना‌शिक शहर तसेच ग्राम‌ीण पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता फेरीसाठी हजेरी वाढली आहे. पहिल्या दिवशी जवळपास ४० टक्के उमेदवार अनुपस्थित होते. आज मात्र १७०० उमेदवारांपैकी ५३८ उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

निर्विघ्न सिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन महासंघ

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडताना गतवेळच्या चेंगराचेंगरीचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन सर्वंकष तयारीला लागले आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला काही धडपड्या लोकांचीही साथ मिळू लागली आहे.

‘मतदारांची नावे वगळू नका’

$
0
0
मतदारांची नावे वगळल्याबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीत आगपाखड सहन करावे लागलेल्या निवडणूक आयोगाने यावर्षी कुठल्याही मतदाराची नावे न वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तशा कडक सूचनाच राज्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आपत्तींशी करणार दोन हाथ

$
0
0
राज्यभरातील स्वयंसेवी संस्था राज्य आणि देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापनात भरीव योगदान देऊ शकतात, हा विचार एका प्रशिक्षण शिबीरात यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख कर्नल व्ही.एन सुपनेकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव आणि तेथील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी मांडला.

१२ द‌िवसात, १२ ज्योतिर्लिंग

$
0
0
अवघ्या बारा द‌िवसांच्या कालावधीत देशातील सात राज्य पालथी घालत बारा ज्योत‌िर्लिंगांच्या दर्शनाचा ध्यास चार नाश‌िककरांनी घेतला आहे. सोमवारी (९ जून) रामेश्वरपासून नाश‌िककरांच्या या अनोख्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे.

रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’च!

$
0
0
नाशिक शहरातील रेडिरेकनरचे (जागांचे सरकारी मूल्य) भरमसाठ वाढलेले दर ‘जैसे थे’च राहणार आहेत. मात्र, मार्गदर्शक नियमावलीला (फूट नोटस) कायमस्वरुपी स्थगिती देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

वेबसाइटवरही अतिक्रमण!

$
0
0
वनविभागाच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे असताना, आता चक्क नाशिक वनविभागाच्या वेबसाइटवरही अतिक्रमण झाल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, वनविभागाचे अधिकारीही याबाबत अनभिज्ञच आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images