Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मैत्रीचं बिझिनेस ‘अॅप’लिकेशन!

$
0
0
नाशकातल्या दोन मित्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले शिक्षण घेतल्यानंतरही एकत्र येत आय.टी. उद्योग सुरू केला. विशेष म्हणजे, त्यांच्या या उद्योगाचा आज एन्टरटेन्मेंट क्षेत्रातल्या जगातील पहिल्या ५० मध्ये समावेश होतो. असं लक्षणीय यश मिळवणारे अश्विन कंदोई आणि अभिजित जुनागडे यांच्याविषयी...

आगळ्या छंदाची हॉर्स पॉवर

$
0
0
छंद जोपासणे वरकरणी सोपी बाब असली तरी अवघड गोष्ट असते. त्यासाठी नियोजनाबरोबरच चिकाटी, मेहनत आणि दूरदृष्टी आवश्यकता असते. रणजित नगरकर यांनी जोपासलेला घोड्यांचा छंद हा थोडा हटकेच म्हटला पाहिजे!

नाशिक नगरी... बडी प्यारी

$
0
0
गेल्या पाच-सहा दशकांत नाशिक बरंच बदललं. पण इथल्या काही गोष्टी तसूभरही बदलल्या नाहीत.

मुंडेंच्या निधनाने राज्याची हानी

$
0
0
भारताचे ग्रामविकास मंत्री गोपीनाश मुंडे यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची हानी झाल्याचे मत मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केले. क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेतर्फे गुरुवारी सर्वपक्षीय शोकसभा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली.

इं‌ज‌िनीअरिंगचा पेपर पुढे ढकलला

$
0
0
तयारी करुन परीक्षेला गेल्यानंतर संबंध‌ित व‌िषयाचा पेपर पुढे ढककला असल्याचा अनुभव इंज‌िनीअरिंग शाखेतील पह‌िल्या वर्षाच्या एफपीएल या बॅकलॉग पेपर देणाऱ्या व‌िद्यार्थ्यांनी घेतला.

कांदा व्यापाऱ्यांना फटका

$
0
0
लासलगाव शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरवासीयांची चागलीच दैना उडाली.

विक्रीकर उपायुक्ताची आत्महत्या

$
0
0
पार्थडी फाटा येथील विक्रीकर भवनात विक्रीकर उपायुक्त म्हणून वर्षांभरापुर्वीच रुजू झालेले अविनाश जांगळे (वय५४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिकचा अनंत देशमुख एनडीएत

$
0
0
संरक्षण दलात सेवा करण्याचे भाग्य खूप निवडक जणांना मिळते. त्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए)मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. नाशिकचा अनंत देशमुख यात यशस्वी झाला आहे.

५ तालुक्यांत ऑनलाइन दाखले

$
0
0
इगतपुरी तालुक्यात ऑनलाइन दाखले वाटप करण्याच्या पद्धतीला उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर आता आणखी पाच तालुक्यांमध्ये ही सेवा या महिनाअखेरीपासून सुरू केली जाणार आहे. त्यात नाशिक ग्रामीण, दिंडोरी, चांदवड, देवळा आणि निफाड तालुक्यांचा समावेश आहे.

गोदाघाटाच्या कामाला मुहूर्त

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रस्तावित असलेले नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदाघाटाचे काम येत्या दहा दिवसांत सुरू होणार आहे. गोदाघाट कामाच्या प्रस्तावास जलसंपदामंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून घाटाच्या कामाची वर्कऑर्डर संबंधित कंत्राटदाराला दिली जाणार आहे.

बजेट लांबल्याने कामे खोळंबली

$
0
0
महापालिका प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठीचे १ हजार ८७५ कोटी ६९ लाख रूपयांचे अंदाजपत्रक १४ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केले. यानंतर स्थायी समितीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढ फेटाळत अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

सरंगलांच्या बदलीसाठी दबाव

$
0
0
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची बदली व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हातमिळवणी केल्याचे पाहावयास मिळते आहे.

सिंहस्थ निधीबाबत साशंकताच

$
0
0
अवघ्या वर्षभरावर येवून ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात तरतूद होण्याची मोठी आशा असताना अर्थमंत्र्यांनी सिंहस्थाचा उच्चारही न केल्याने निधीबाबत साशंकतेचे वातावरण आहे. सरकारी विभागही या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसले होते.

लासलगावातील कांदा भिजला!

$
0
0
गुरुवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने लासलगाव शहरासह परिसराची चांगलीच दैना उडाली. वादळाने शहरातील बहुतांशी व्यापाऱ्यांचे कांद्याचे शेड कोसळले.

मुंबई मनपाच्या परीक्षेसाठी जळगाव, नाशिकमध्ये केंद्र

$
0
0
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठी टंकलेखनाची १३ जूनपासून सलग तीन दिवस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या पदांसाठी राज्यभरातील उमेदवारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नाशिक व जळगावसह एकूण १४ ‌जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

मेडिकलसाठी सेवाभाव आणि मेहनत हवीच

$
0
0
म‌ेडिकलचं क्षेत्र अनेक विद्यार्थ्यांना खुणावत असतं. पण या क्षेत्राभोवतीचे वलय पाहून नव्हे तर सेवाभाव आणि मेहनत करण्याची तयारी ठेवून या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तर भविष्य उज्ज्वल आहे. मेडिकलमधील अनेक तांत्रिक मुद्द्यांवर पालक आणि विद्यार्थ्यांची नेहमी गल्लत होते. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:सोबत भोवतालही पारखून घ्यायला हवा. या मुद्द्यावर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी टाकलेला प्रकाश...

कोर्टाच्या ई-लायब्ररीला हवी प्रशस्त जागा

$
0
0
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी‌ चढू नये, असे कितीही म्हटले जात असले तरी कोर्टात फेरफटका मारताना अनेक त्रासलेले चेहरे भेटतात. त्यांना ना कोर्टाची क्लिष्ट भाषा समजते ना आपल्या केसची सद्यस्थिती. वकील बांधवांसह पक्षकांरांनाही आपल्या केसेसह हजारो केसेस अभ्यासता याव्यात, यासाठी ई-लायब्ररी हा समर्थ पर्याय ठरत आहे.

लिंगायत समाज संघर्ष समितीचे धरणे

$
0
0
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, समाजास धार्मिक व भाषीक अल्पसंख्यांक दर्जा देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्रातील लिंगायत समाज संघर्ष समितीच्यावतीने ९ जून रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

विभागीय, महिला लोकशाही दिन सोमवारी

$
0
0
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय व महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते त्यानुसार सोमवार दिनांक ९ जून रोजी विभागीय व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

अपहरण झालेली मुलगी सापडली नाशिकला

$
0
0
मनमाड येथील मनोरमा सदन या वसतिगृहातून अपहरण करण्यात आलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिस निरीक्षक भागवत सोनावणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवलेल्या सतर्कतेमुळे ती मुलगी नाशिक येथील कामटवाडे भागातून सुखरूपरित्या पोलिसांना मिळाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images