Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...अन् तक्रारदाराला मृत्यूने गाठले

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यास आलेल्या शरदचंद्र धोडपकर (७०) या व्यक्त‌िचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मान्सूनपूर्वचा पुन्हा तडाखा

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी धुमाकूळ घातला. सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला तर निफाड तालुक्यात गारप‌िटीसह पाऊस झाला.

केरू चुंभळे यांचा अपघाती मृत्यू

$
0
0
सप्तशृंग गडावरील धार्मिक कार्यक्रम आटोपून नाशिककडे परतणाऱ्या चुंभळे कुटुंबीयांच्या स्विफ्ट कारला भरधाव म‌हिन्द्रा युट‌िलिटी व्हॅनने समोरून जोरदार धडक दिली.

टक्का वाढला; स्थान घसरले

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यम‌िक आण‌ि उच्च माध्यम‌िक श‌िक्षण मंडळाच्या व‌तीने फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाश‌िक व‌िभागाचा निकाल ८८.७१ टक्के लागला.

फोनचा रुबाब

$
0
0
एखाद्या वस्तुच्या वापराचा खर्च परवडत नसला तरी काही लोक बडेजावासाठी त्याचा वापर करतात. गाड्या परवडत नसल्या तरी दिखाव्यासाठी त्या वापरतात. असेच एक महाशय कोर्टात वकिली करतात त्यांची वकिली म्हणावी तशी चालत नाही परंतु त्यांचा रुबाब मात्र फार मोठा आहे.

टायरच्या उजेडात होतात अंत्यसंस्कार

$
0
0
आगरटाकळी येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत. येथील स्मशानभूमीत विद्युतदिव्यांची सोय नसल्याने टायर पेटवून त्याच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

अतिक्रमणधारकांचा पालिकेवर मोर्चा

$
0
0
रस्ते विकास करताना गोरगरीबांवर अन्याय होत असून, महापालिकेने याविरोधात ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पिपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे.

रतन घोडके पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
येथील मळे विभागातील दादोबा रस्त्याला राहणारे शाम भंदुरे यांच्या सफारी गाडीला आग लावल्याप्रकरणी फरार असलेला रतन घोडके व त्याचा मुलगा माँटी घोडके याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा शिताफिने अटक केली.

सर्व्हिसरोड पडताहेत अपुरे

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्ग महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील सर्व्हिस रोड अपुरे पडत असल्याने वाहतुकीला खोळंबा होत आहे. पाथर्डी फाटा, राणे नगर, स्टेट बँक, इंदिरा नगर, गोविंद नगर, मुंबईनाका, द्वारका, आडगाव नाका या भागात रोजच सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

$
0
0
असाह्य होणारा उकाडा, जीवाची होणारी घालमेल, खंडित झालेला वीजपुरवठा असा प्रसंग नागरिकांवर मंगळवारी पुन्हा ओढावला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केले आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे नाशिककर पुरते हवालदिल झाले आहेत.

मोबाइल डिझेल व्हॅन उद्योगांसाठी कार्यरत

$
0
0
औद्यगिक वसाहतीतील उद्योगांना जनरेटर व अवजड मशिनरींना लागणारे डिझेल उद्योगांपर्यंत पोहोच करणाऱ्या मोबाइल डिझेल डिस्पेंसरीज युनिट अर्थात मोबाइल डिझेल व्हॅन कार्यरत झाली आहे. या व्हॅनमुळे उद्योगांना दिलासा मिळाला आहे.

सहा नगराध्यक्षांची १७ जूनला निवड

$
0
0
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नवीन नगराध्यक्षाची निवड करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे. येत्या १७ जूनला ही निवड होणार असून अध्यक्षपदासाठी निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सिन्नर तालुक्यावर शोककळा

$
0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच भाजप कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर सिन्नर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन श्रदांजली वाहिली. मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली होती.

...अन् आरोग्य व‌िद्यापीठाची म‌िळाली भेट

$
0
0
सुमारे दीड दशकांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या न‌िर्म‌ितीचा न‌िर्णय झाला. पण पुढच्याच टप्प्यात नागपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांकडून नागपुरात हे व‌िद्यापीठ साकारण्यासाठी दबाव वाढीस लागला.

सोशल मीडियावरही हळहळ

$
0
0
सोशल मीडियावरही मुंडे यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त होत राहिला. केवळ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करणारे संदेश पहायला मिळत होते.

राजापूरला दीड तास रास्तारोको

$
0
0
भाजप नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी येवला तालुक्यातील राजापूर येथे ग्रामस्थांनी येवला-नांदगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन करून गावात बंद पाळला.

कुटुंबवत्सल माणसाची एग्झिट

$
0
0
राजकारणात अत्यंत कुशाग्र तसेच मुत्सदी असलेले मुंडे हे माणूस म्हणून प्रचंड महान होते, अशा आशयाचे शोकसंदेश शरणपूर रोड, रामदास कॉलनी येथील पुष्कर अपार्टमेंटमध्ये घेऊन येणाऱ्यांची गर्दी दिवसभर वाढतच होती.

वणव्यांच्या दाहात पर्यावरणाची होरपळ!

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केवळ थातूरमातूर कार्यक्रमांच्या आयोजनात धन्यता मानणाऱ्या नाशिकच्या वनविभागाने खरे तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यात तब्बल २५ ठिकाणी वणवे लागले आहेत.

भूतबाधा झाली म्हणून मारहाण

$
0
0
भूतबाधा झाल्याच्या कारणावरून सासू-सासऱ्यांनी आजारी पडलेल्या सुनेला भगताकडे नेत लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार निफाड तालुक्यातील वनसगाव येथे उघडकीस आला आहे.

अखेर ‘डीएमओ’ मिळाला

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (डीएमओ) हे पद रिक्त होते. ‘मटा’मध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने डीएमओ म्हणून प्रशांत वाघमारे यांची नियुक्ती केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images