Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वृत्तपत्र विक्रेत्यांनी घेतले दत्तक

$
0
0
सामाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेने नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेच्या वतीने गतीमंद शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यास दत्तक घेऊन पालकत्व स्विकारले.

पर्यटन विकास आराखडा तयार

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, याकरिता ८०० कोटींचा आराखडा मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. या आराखड्यात जिल्हयातील ३४ पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

एसटी उलटली, ३० जखमी

$
0
0
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर उमाळघाटाजवळ एक एसटी उलटली.

शिक्षण मंडळच गणितात 'कच्चे'

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळाकडून खरेदी करण्यात आलेले गणवेश, बुट आणि सॉक्स यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असताना, आता विद्यार्थ्यांच्या आहार भत्त्यावर देखील डल्ला मारण्यात आल्याचा पुरावा समोर आला आहे.

आंब्याची अमेरिकावारी व्हाया नाशिक

$
0
0
महाराष्ट्रासह परराज्यातील आंबा अमेरिकेला नाशिक मार्गेच जातो. भाभा अणुसंशोधन केंद्राने उभारलेल्या लासलगाव येथील विकीरण (रेडीएशन) प्रकल्प हे त्यामागचे कारण आहे. दरवर्षी आंब्याची निर्यात वाढतच असून 'केसर'ने 'हापूस'ला कधीच मागे टाकले आहे.

प्रेस कामगारांनी जमा केली उत्तराखंडसाठी ४८ लाखांची मदत

$
0
0
उत्तराखंडवर कोसळलेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांच्या मदतीसाठी नाशिकरोडच्या 'सीएनपी', 'आयएसपी' मधील सर्व कामगारांनी पुढाकार घेतला असून प्रत्येकाने एक दिवसांचा पगार मदतीसाठी दिला आहे.

रेल्वे वसाहतीला समस्यांची रांग

$
0
0
नाशिकरोड येथील सुभाषरोडवर असलेल्या रेल्वे वसाहतीला समस्यांनी ग्रासले आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा १० टक्क्यांवर

$
0
0
नाशिक जिल्ह्यात जून महिन्यामध्ये झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. मे अखेरीस सहा टक्क्यांवर असलेला जलसाठा आता दहा टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

जप्त मालमत्तांचे लिलाव करा

$
0
0
अडचणीतील बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी जप्त मालमत्तांचे लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. सरकारी जिल्हा कृती समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

३.५ वर्षांच्या मुलाचा कुपोषणाने मृत्यू

$
0
0
साडेतीन वर्षांच्या एका मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री निफाड येथे घडली. या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हर्षल दीपक जाधव असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून तो निफाडच्या जोशीवाडा परिसरात राहत होता.

गुन्हेगाराच्या शोधासाठी क्राइम ब्रँच सक्रिय

$
0
0
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून बेपत्ता झालेल्या १ हजार २०८ आरोपींच्या शोधासाठी क्राइम ब्रँचने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांना सापडत नसलेल्या आरोपींच्या संख्येबाबत 'मटा'ने ८ जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

हॉटेल मालककडून पोलिसास धक्काबुक्की

$
0
0
रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास हॉटेल मालकाने आरेरावी करीत धक्काबुक्की करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

बेघरांना मिळणार घरकूल योजनेचा लाभ

$
0
0
तालुक्यातील अनुसुचित जमाती व इतर संवर्गातील जनता मोठ्या प्रमाणात बेघर असून टप्प्याटप्प्याने सगळ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही आमदार उमाजी बोरसे यांनी दिली.

आठवडाभरात पदोन्नती ऑर्डर द्या

$
0
0
नोव्हेंबर २०१२मध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्याच्या ऑर्डर अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. यावर गेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती.

सातपूर, नाशिकरोड बसस्थानकाचे आधुनिकीकरण करावे

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक विभागातील प्रवाशांच्या अडचणी त्वरित सोडवून नाशिककरांना सुखद प्रवासाचा दिलासा द्यावा तसेच सातपूर व नाशिकरोड बसस्थानकाचे आगारासह त्वरित आधुनिकीकरण करावे, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

सप जळगाव महापालिका निवडणूक लढवणार

$
0
0
समाजवादी पार्टी आपल्या स्वबळावर जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. याचबरोबर विधानसभेच्या जिल्ह्यातील काही जागा देखील लढवणार असल्याचे सांगितले.

हॉस्टेल प्रवेश : स्टॅम्प पेपरची सक्ती

$
0
0
हॉस्टेलमधील असुविधांची वाच्यता कुठेही करणार नाही, तसेच कोणत्याही हॉस्टेलविरोधी आंदोलनांना साथ देणार, अशी हमीपत्रे आदिवासी विकास विभागाकडून दीडशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भरून घेतली जात आहेत.

करमणूक कराचे घोडे अडले

$
0
0
शहरातील चार केबल चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे अद्याप करमणूक कर भरलेला नसून जिल्हा प्रशासनाच्या नोटीसीलाही या केबल चालकांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे या करवसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत हतबलता व्यक्त केली.

पैशांसाठी पत्नीला पेटवले

$
0
0
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला पेटवून देण्याची धक्कादायक घटना ओढा रेल्वेस्टेशनजवळील हमालवाडी येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी पतीला अटक केली असून महिलेवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुलीला मारा किंवा आत्महत्या करा!

$
0
0
हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील खाप पंचायतींना लाजवेल असा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असून आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीने ‘मुलीला विष पाज किंवा तू आत्महत्या कर,’ असा भयंकर सल्ला दिल्याची तक्रार एका पित्याने पोलिसांकडे केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images