Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील धरणसाठा २० टक्क्यांवर

$
0
0
जिल्ह्यातील धरणसाठा २० टक्क्यांवर आला असून, वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढत आहे. यंदा पावसाळा उशिरा सुरू होण्यासह सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याने जुलै अखेरीपर्यंत हा साठा टिकवावा लागणार आहे.

अपघातात तरुण ठार

$
0
0
कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट परिसरात इनोव्हा आणि मोटारसायकल यांच्यात मंगळवारी झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

ग्रामसेविकेला कोंडले

$
0
0
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस अन् गारपिटीने सुमारे ११०० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, महसूल व कृषी विभागाने गावात येऊन प्रत्यक्ष पंचनामे केले नाहीत.

कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

$
0
0
सटाणा बाजार समितीत मंगळवारी कांद्याचे भाव प्रतिक्विंटल साडेसहाशे रुपयांनी घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर हल्लाबोल करत तब्बल दीड तास सटाणा-मालेगाव रस्त्यावर चक्काजाम केला.

नाशिकला आणखी एक विद्यापीठ

$
0
0
नाश‌िक परिसरात अगोदरची दोन व‌िद्यापीठे आण‌ि नव्याने होऊ घातलेले पुणे व‌िद्यापीठाचे कॅम्पस या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्राच्या पारड्यात आणखी एका व‌िद्यापीठाचे दान पडणार आहे.

विमानसेवेचे टेकऑफ १५ ऑगस्टला!

$
0
0
राज्यातील अनेक शहरांना जोडणारी विमानसेवा येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगाने विकसीत होणाऱ्या शहरांची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

हवी समतोल प्रगती

$
0
0
विकासाची सरकारी आकडेवारी नियमित जाहीर होत असते. मात्र त्यातून आपल्याला नेमके काहीच लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, गेल्या पाच वर्षांत नाशिक जिल्ह्याचे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे वीस हजार कोटी रुपयांवरून साठ हजार कोटी रुपयांच्या आसपास पोहोचले, दरडोई उत्पन्न सुमारे तीस हजारांवरून एक लाखाच्या जवळ पोहोचले आणि जिल्ह्याची वार्षिक योजना गेल्या दहा वर्षांत सुमारे आठपट वाढून सातशे कोटी रुपयांवर पोहोचली! हे ऐकायला छान वाटत असले, तरी नेमके काय झाले ते समजत नाही.

ओरडण्याचा त्रास

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात अनेक ठिकाणी व्य़ाख्याने सुरू आहेत. सर्वच ठिकाणच्या व्याख्यानांना आलटून-पालटून तेच वक्ते असल्याने प्रेक्षकही कंटाळले आहेत. यावर व्याख्यानमाला आयोजकांनी नामी संधी शोधली.

शाळांमध्ये तिसरा डोळा

$
0
0
सुरक्षिततेच्या कारणास्तव क्लोज सर्किट कॅमेरे अर्थात सीसीटीव्ही बसविण्याकडे नाशकातील शाळांचाही कल वाढला आहे. काही शाळांमध्ये सीसीटीव्ही तैनात झाले आहे तर काहींचे सध्या नियोजन सुरु आहे. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे काही शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे.

उन्हाळा ठरतोय ‘ताप’दायक!

$
0
0
दिवसेंदिवस ऊन वाढू लागले आहे. सकाळचे कोवळे ऊनही नकोसे वाटू लागले आहे. उन्हाळ्याची तीव्रता घरबसल्याही जाणवू लागल्याने तहानेने घसा कोरडा पडतोय.

तीन तासांत कळणार खासदार

$
0
0
येत्या १६ मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन तासांतच नाशिक आणि दिंडोरीतील विजयी उमेदवाराचे (खासदार) चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदारांसह उमेदवारांनाही गेल्या २४ एप्रिलपासून लागलेली उत्कंठा जास्त वेळ ताणून धरावी लागणार नाही.

मालेगाव, मनमाडकर त्रस्त

$
0
0
वीज वितरण कंपनीकडून शहरातील वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून मालेगावची बत्ती गूल झाल्याने शहरातील नागरिक व कामगारांचे चांगलेच हाल होत आहेत.

हरियाली योजनेचा अपहार भोवणार

$
0
0
बागलाण तालुक्यातील तिळवण येथील शासनाच्या हरियाली योजनेत सुमारे सतरा लाख रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह विस्तार अधिकाऱ्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंगळवारी झेडपीचे सीईओ सुकदेव बनकर यांनी बागलाणच्या बिडीओंना दिले.

साडेपाच हजार गारपीटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

$
0
0
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या तालुक्यातील ३६ गावांमध्ये ८ हजार ४६१ शेतकऱ्यांपैकी १७ गावातील २ हजार ९६२ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली असली तरी अद्याप १९ गावांतील ५ हजार ४९९ शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कानडी कलाकारांची भुरळ

$
0
0
परंपरा म्हणून गावोगाव पारंपरिक भजन, भावगीते, नाट्यसंगीत सादर करून कला जोपासणाऱ्या कानडी कलाकारांच्या सुरेल व तालबध्द शास्त्रीय भजनांनी येवलेकरांना भुरळ घातली आहे.

दुकानफोडीचे सत्र सिन्नरमध्ये सुरूच

$
0
0
सिन्नर शहर परिसरात दुकानफोडी करण्याचे सत्र सुरूच असून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेतील मद्य विक्रीचे दुकान फोडले. तसेच स्वामी सर्मथ मंदिरासमोरील सद्गुरू गारमेंट्स या रेडिमेड कापड दुकानाचे शटर वाकवून चोरी केली.

सिन्नरची तहान वाढतेय दिवसागणिक

$
0
0
जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

‘त्यांच्या’ मदतीला मोबाइल दवाखाना

$
0
0
वाढत्या महागाईत आरोग्यावर खर्च करणे जिथे सर्वसामान्यांच्याही आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे तिथे गोरगरीबांच्या अवस्थेचर विचारही करवला जात नाही. पण हा विचार करुनच नाशिकच्या ‘नवजीवन वर्ल्ड पीस फाऊंडेशन’ने ‘मोबाइल हेल्थ युनिट’ची संकल्पना अंमलात आणली आहे.

सिडको, सातपूरचे फूटपाथ गिळंकृत

$
0
0
शहराप्रमाणेच उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फुटपाथची समस्या भेडसावत असून सिडको, सातपूर परिसरातील फूटपाथ स्थानिक व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांची बघ्याची भूम‌िका

$
0
0
टिप्पर गँगचे आरोपी पीएसआय सचिन सावंत यांना मारहाण करीत असताना कैदी पार्टीसोबत आलेले पोलिस मुख्यालयातील अन्य कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून येण्याऐवजी केवळ बघत राह‌िले. ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images