Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उद्यानांतील हिरवाई जळू लागली...

0
0
वाढत्या तापमानाबरोबरच पुरेसे पाणी मिळत नसल्याने आधीच कोमजलेल्या उद्यानांमधील झाडे, लॉन आता जळू लागली आहेत. महापालिकेने वेळीच लक्ष न दिल्यास उद्यानांतील उरलीसुरली हिरवाई नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

तलाठी, ग्रामसेविकेला कोंडले

0
0
गारपीट होऊनही पंचनामे केले नाही, परिणामी नुकसान भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथील संतप्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी पी. एस. चोपडे, मंडल कृषी अधिकारी ए. पी. जाधव, ग्रामसेविका एस. यू. गौतम यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.

मनमाडमध्ये १८ दिवसाआड पाणीपुरवठा

0
0
शहरात सध्या अठरा ते वीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असून या पुढील काळात पाणीटंचाईचा प्रश्न आधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पालखेड धरणातून मिळणारे आवर्तन दिलासा देणारे असले तरी शहरातील विहिरींचे पाणी आटत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

आश्वासनानंतर अधिकाऱ्यांची केली सुटका

0
0
गारपीट होऊनही पंचनामे केले नाही, परिणामी नुकसान भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथील संतप्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी पी. एस. चोपडे, मंडल कृषी अधिकारी ए. पी. जाधव, ग्रामसेविका एस. यू. गौतम यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. अधिकाऱ्यांच्या आश्वसनानंतर तिघांची सुटका करण्यात आली.

तीस क्विंटलचे मिळाले पन्नास रुपये

0
0
कांद्याला भाव मिळण्याची मोठी स्वप्न पाहून तीस क्विंटल कांदा मनमाड बाजार समितीत विक्रीस आणणाऱ्या भालूर (ता. नांदगांव) येथील शेतकऱ्यास खर्च जाऊन अवघे पन्नास रुपये हातात पडल्याने हसावं की रडावं अशी त्याची स्थिती झाली.

कांद्यावरून पुन्हा राडा; शेतकरी रस्त्यावर

0
0
नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सटाणा बाजार समितीत मंगळवारी कांद्याचे भाव प्रतिक्विंटल साडेसहाशे रुपयांनी घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर हल्लाबेाल करत तब्बल दीड तास सटाणा-मालेगाव रस्त्यावर चक्काजाम केला. यावेळी कांद्याचे भाव पाडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा निषेध केला.

शहरात बालकामगारांचे पेव

0
0
नाशिक शहर, उपनगरे तसेच परिसरातील उपनगरांमध्ये बालकामगारांचे पेव फुटले आहे. कमी पैशात त्यांची पिळवणूक करुन अत्याचार केले जात आहे. देवळाली कॅम्पमधील दोन अल्पवयीन मुलांनी नुकत्याच केलेल्या आत्महत्येच्या घटनेवरुन हे स्पष्ट झाले आहे.

मुलांच्या आत्महत्याप्रकरणी दुकानदार पुत्रास अटक

0
0
देवळाली कॅम्प येथील दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अमितशेठ रोहेरा याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. तो संबंधित दुकान मालक देवेनशेठ रोहेरा यांचा मुलगा आहे.

निवडणुकीत राजकारण की औद्योगिकरण!

0
0
आयमा आणि निमा या दोन औद्योगिक संघटनांमधील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आगामी तीन महिने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी या दोन्ही संस्था सर्वतोपरी योगदान देवू शकतात.

फूटपाथ टपरीधारकांच्या सोयीसाठी

0
0
शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या शरणपूर रोड, गंगापूर रोड परिसरातील फुटपाथ वाहन वाहनधारकांनी व व्यावसायिकांनी ताब्यात घेतले आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर दुतर्फा असलेले फुटपाथ हॉकर्सनी व्यापल्याने पादचाऱ्यांसाठी केलेला खर्च व्यर्थ गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

शाळेच्या चौकशीचे बालहक्क आयोगाचे आदेश

0
0
फी न भरल्याच्या मुद्द्याहून व‌िद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याच्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश केंद्रीय बालहक्क आयोगाने द‌िले आहेत. या चौकशीचा अहवाल १० द‌िवसांच्या कालावधीत सादर करावा, असेही आयोगाने म्हटले आहे.

दुर्गंधीने औदुंबरनगरवासीय त्रस्त

0
0
सिडकोतील महाराणा प्रताप चौक भागातील औदुंबर नगरवासिय मोकळ्या भूखंडावरील दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे लक्ष घालण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

७५०० विद्यार्थी देणार सीईटी

0
0
आरोग्य व‌िज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणारी एमएच-सीईटी परीक्षा उद्या (द‌ि. ८ मे रोजी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाश‌‌िक ज‌िल्ह्यातून सुमारे साडेसात हजार व‌िद्यार्थी बसले आहेत.

पोलिसांत तक्रार दिली म्हणून मारहाण

0
0
पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भद्रकालीतील नानावली परिसरात घडली.

येत्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन

0
0
विभागीय महसूल कार्यालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार दिनांक १२ मे रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

वीजेच्या लपंडावाने नाशिककर त्रस्त

0
0
वाढत्या तापमानाबरोबरच शहरातील अनेक भागात सातत्याने वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज जात असल्याने उकाड्याने नागरिकांचे हाल होत आहे. सोमवारी सकाळी नाशिकरोडसह शहरातील काही भागात वीज गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे महावितरणवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.

सावरकरांचे विचारच देशाला तारतील

0
0
‘सध्याच्या जगात सत्य, अहिंसेचा ढोल पिटून उपयोग नाही. सावरकर अंमलात आणल्याशिवाय देशाला पर्याय नाही. देशापुढील सर्व समस्यांना सावरकर हेच उत्तर आहे. त्यांचे विचारच देशाला तारतील,’ असे स्पष्ट मत प्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज केले.

शिपाई भरतीचा सर्व्हर डाऊन

0
0
पोल‌िस श‌िपाई पदाच्या भरतीसाठी राबव‌िण्यात येणाऱ्या ऑनलाइन पद्धतीला तांत्र‌िक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा राज्यभरात मोठ्या संख्येने ही पदे उपलब्ध झाल्याने बहुसंख्य युवावर्गाच्या आशा या भरतीवर केंद्रीत झाल्या आहेत.

L&Tफायनान्सची नाशकात शाखा सुरू

0
0
उत्तर महाराष्ट्रातील कृषीसह अन्य क्षेत्रांच्या वाढीचा विचार करुन एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीने नाशकात शाखा सुरू केली आहे. येत्या काळात या शाखेद्वारे मोठ्या प्रमाणात अनेकांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कंपनीचे एमडी दिनानाथ दुभाषी यांनी सांगितले आहे.

एम. कॉमची परीक्षा १० मे पासून

0
0
पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी एम. कॉमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अगोदर ५ मे पासून सुरू होणारी ही परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार १० मे पासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images