Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

असे असले तरी

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने सध्या सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. व्याख्यानमाला हे नाशिकचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. शहराच्या विविध भागात सध्या व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याने श्रोत्यांना चांगलीच संधी मिळाली आहे.

रोजगार हमीच्या कामांवर जळगावात मजुरांचा सुकाळ

$
0
0
रोजगार हमी योजनेत मजुरीचा दर कमी असतानाही मागील वर्षी कामांवरील मजुरांची संख्या लक्षणीरित्या वाढली होती. यंदा दुष्काळ नाही की, मजुरी देखील वाढलेली नाही तरीही मागच्या एवढेच सुमारे नऊ हजार मजूर अजूनही रोजगार हमी योजनेत काम करीत असल्याचा धक्कादायक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.

सिन्नरचा फरार कैदी पुन्हा गजाआड

$
0
0
सिन्नर पोलिस ठाण्याचे कारागृहाचे कौले तोडून गुरुवारी पहाटे पलायन करणारा अट्टल गुन्हेगार राजेश ठाकूरला (वय २५) जेरबंद करण्यात आले आहे. मुंबई क्राइम ब्रँच व सिन्नर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत हा अट्टल गुन्हेगार जेरबंद झाला.

आगीमुळे सव्वाशे हेक्टरवरील वनसंपत्ती खाक

$
0
0
बागलाण तालुक्यातील भंडारपाडा शिवारातील कपाळ्या डोंगरावरील राखीव वनक्षेत्रात रविवारी सायंकाळी अचानक लागलेल्या आगीत सुमारे सव्वाशे हेक्टरवरील जंगल संपत्ती जळून खाक झाली.

सोनी दाम्पत्य अजूनही फरार

$
0
0
कष्टकरी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून चुकवतीचे पैसे देण्यास नकार देत शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोनी दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर लासलगाव पोलिस या दांपत्याच्या शोध घेत आहेत.

गारपिटीचा कहर सुरूच; शेतकऱ्याचा बळी

$
0
0
गारपीट आणि अवकाळी पाऊस अजूनही बागलाणचा पिच्छा सोडायला तयार नाही. सोमवारी या अस्मानी संकटाने कहर केला असून पिकांच्या हानीसह राजापूरच्या शेतकऱ्याचाही बळी घेतला. दसवेल येथील शॉर्टसर्किटमुळे कांदा चाळीसह ट्रॅक्टरला जाग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खेळाडूंच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप

$
0
0
राष्ट्रभक्तीचे मूल्य व‌िद्यार्थ्यांमध्ये रुजव‌िणारे दिवंगत रामचंद्र कुलकर्णी तथा राम मास्तर या आदर्श व्यायाम श‌िक्षकाच्या स्मृतिप्र‌ित्यर्थ नाश‌िक श‌िक्षण प्रसारक मंडळाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैन‌िक सीताराम. ह. अकोलकर यांनी ५१ हजारांची देणगी जाहीर केली आहे.

नाचले नाहीत म्हणून दोघांना मारहाण

$
0
0
हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना देवळाली गावात घडली. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातून फूटपाथच गायब!

$
0
0
शहरातून फूटपाथच गायब!नाशिक शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रस्त्यांवर नावाला फूटपाथ राहिले असून अनेक ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांनीच अतिक्रमण केल्याने नागरिकांना फूटपाथवरून चालणे मुश्कील झाले आहे.

जेईई मेन मध्ये घवघवीत यश

$
0
0
आयआयटी इंजिनीअरिंगसाठी राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन ही परीक्षा महत्त्वाची असल्याने देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेत शहरातील आयआयटी पेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

बस स्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट

$
0
0
सार्वजनिक प्रवासी वाहतूक म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला नागरिकांची सदासर्वदा पसंती असली तरी आता अशा बसेसमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानके असोत अथवा शहर बसेस तेथून महिलांच्या पर्स चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांत शहरात असे दोन प्रकार घडले आहेत.

बाजारातून चिल्लर पुन्हा गायब

$
0
0
काही महिन्यांपासून चिल्लरच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. चलनातून पन्नास पैसे, एक रुपयासह दोन व पाच रुपयांची नाणी गायब झाल्याने व्यापारी, ग्राहकांत वादाचे प्रसंग उद्‌भवू लागले आहेत.

पत्नीनेच केला पतीचा खून

$
0
0
निलगिरी बाग झोपडपट्टीतील संजय निंबा शार्दुल (४०) याचा मृत्यू अकस्मात मृत्यू नसून, तो खून असल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे. संशयित म्हणून त्याच्या पत्नीलाच पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मतदान यंत्रांना त्रिस्तरीय सुरक्षा

$
0
0
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठीची मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेरेही तेथे सज्ज आहेत. त्यामुळे मतदान यंत्रांच्या असुरक्षेविषयीचा आरोप निराधार असल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पाह‌िले रे पत्थरातून...डोलणारे फुल मी!

$
0
0
जो वर्तमानाला वळण देतो तो प्रतिभावंत असतो आणि त्याला आनंद सापडविण्याची गरज नसते. आनंद आपल्या आजुबाजुला नाचत असतो; तो ओळखता आला पाहीजे, असे कधी संवादातून तर ‘पाहीले रे पत्थरातून, डोलणारे फुल मी...

लाचखोरीत ‘सरकारी बाबू’ अव्वल

$
0
0
सरकारी नोकरी हे सेवाव्रताऐवजी अडल्या नडलेल्यांना लुबाडण्याचा सरकारी अड्डा झाला आहे. म्हणूनच सरकारी विभागांमध्ये स्व‌िकारणाऱ्यांचे पेव फूटले असून त्याचे प्रमाण वाढतच आहे.

जपान एअरवेजची ओझरहून सेवा?

$
0
0
ऑल निप्पॉन एअरवेज या जपानी विमान सेवा देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ओझर येथील विमानतळाला नुकतीच भेट दिली. येत्या काळात ओझरहून टोकियोसाठीची सेवा सुरू होण्याचे संकेत त्यांनी या भेटीदरम्यान दिले आहेत.

वीज कोसळून शेतकरी ठार

$
0
0
गारपीट आणि अवकाळी पावसाचा बागलाण तालुक्यात कहर सुरूच आहे. सोमवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट झाली. राजापूर येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या

$
0
0
दुकान मालकाने केलेला अपमान सहन न झाल्याने दोन अल्पवयीन मुलांनी चक्क आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. देवळाली कॅम्पमधील एकाच दुकानात कामाला असलेल्या या दोघांनी नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसखाली उडी मारून आपले जीवन संपवले.

दररोज दीड लाखाचा फटका!

$
0
0
नाशिक-पुणे हायवेच्या रुंदीकरणाअंतर्गत प्रस्तावित असलेल्या नाशिकरोड ते सिन्नर या हायवेचे काम रखडल्याने सरकारला प्रति दिन दीड लाख रुपयांचा फटका बसत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images