Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

द्राक्षे उगवत्या सूर्याच्या देशात!

$
0
0
आजवर भारतासह युरोपियन देशांच्या जीभेवर राज्य करणारी नाशिकची द्राक्षे आता उगवत्या सूर्याच्या देशातही (जपान) पोहोचली आहेत. दरवर्षी बहुतांश युरोपियन देशांसह आखाती व पूर्वेकडील काही देशांमध्ये मागणी असलेल्या नाशिकच्या द्राक्षांना यंदा प्रथमच जपानहून मागणी आली.

राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पंचवटीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला मदत केल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, अशी टीका पंचवटीतील मनसेचे नगरसेवक अॅड. राहुल ढिकले यांनी केली आहे.

‘ड‌िक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये

$
0
0
‘मह‌िरावणीसारख्या छोट्या गावातून नाश‌िकमध्ये पह‌िल्यांदाच आलो त्यावेळी भांबावलो होतो. आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. उरातली तळमळ अन् धडपड म‌िटू देऊ नका. उद्या तुम्हीही येथे असाल,’ अशा शब्दांत ‘ड‌िक्शनरी मॅन’ सुनील खांडबहाले यांनी तरुणांना आवाहन केले.

मराठी तरूणाची अमेरिकेत भरारी

$
0
0
ग्रामीण भागातील युवकांसाठी शिक्षणासाठी मोठ्या शहरात येणे हे देखील मोठे आव्हान असते. त्यावेळी धुळे जिल्ह्यातील निजामपूरसारख्या लहान गावातून आलेल्या अक्षय बाविस्करने उच्च शिक्षणासाठी नुसते वॉशिंग्टन गाठले नाही तर गाजवलेही. वॉशिंग्टनमधील हॅकेथॉन ही स्पर्धा तर त्याने जिंकलीच पण सोबतच एक अभिनव संकल्पना असलेली अॅडव्हर्टायझिंग कंपनी तिथेच स्थापन करून संपूर्ण मराठी तरूणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करा

$
0
0
आपल्या कृषीमालाला अधिक भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत जाणे गरजेचे असून, त्यासाठी आंबा महोत्सवसारखे मार्केंटिंग तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक अनिल चव्हाण यांनी केले. नाशिकच्या कोकण उद्योग पर्यटन विकास संस्थेमार्फत आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण प्रमुख अतिथी होते.

पशुवैद्यकीय रुग्णालयांना सौरऊर्जेवरील डीफ्रीज

$
0
0
जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ खूरखूत आजाराचे राज्यातून निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या व्हॅक्सिनचा स्टॉक करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे डीफ्रीज पशुवैद्यकीय रुग्णालयांना देण्यात आले आहे.

सासरच्या मंडळींकडून मारहाण

$
0
0
सासरच्या मंडळींनी केलेल्या गंभीर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे हा प्रकार घडला. कल्पना विश्वास जाधव हिने माहेरून एक लाख रुपये पैसे आणावे यासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. यातूनच कल्पना गंभीर मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौन बनेगा सरपंच!

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या व नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झालेल्या २९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शेणवड बुग व मांजरगाव या दोन ग्रामपंचायती वगळता उर्वरित २७ सरपंचपदाच्या निवडणुका पाच ते सात मे दरम्यान होत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

वैशाख वणव्याची चाहूल

$
0
0
उन्हाच्या झळांनी ग्रामीण भागाला हैराण केले असून, वाढत्या उष्णतेबरोबरच ग्रामीण भागावर पिण्याच्या पाण्याचे संकटही घोंघावू लागले आहे. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील अडीचशे गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

वोक्हार्टमध्ये हर्निया क्लिनिकचा शुभारंभ

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील एन. ए. बी. एच. प्रमाणित सुपरस्पेशालिटी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हर्निया क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला असून हार्नियाचे पेशंट दर बुधवारी संध्याकाळी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत तपासणी करू शकतात, अशी माहिती वोक्हार्टचे लॅप्रस्कोपिक सर्जन डॉ. जी. बी. सिंग यांनी दिली.

व्यवसायात भावनेच्या आहारी निर्णय घेणे चुकीचे

$
0
0
कुठल्याही व्यवसायात चढ-उतार, यश-अपयश असेलच, पण अशा प्रसंगी बुद्धीच्या जोरावर निर्णय घेणे गरजेचे असून भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे चुकीचे ठरते, असे प्रतिपादन राहुल शिलेदार अॅण्ड असोसिएटस् व मोना अॅडचे संचालक डॉ. राहुल शिलेदार यांनी केले. नावातर्फे आयोजित थिंक प्रॉस्पॅरिटी विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

सेटच्या निकालाला रेकॉर्डब्रेक विलंब

$
0
0
सगळ्याच परीक्षांमध्ये गोंधळ आणि उशीर लावणाऱ्या पुणे विद्यापीठाने आता सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेच्या निकालालाही रेकार्डब्रेक विलंब लावल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या परीक्षेचा निकाल यापूर्वीही अनेकदा उशीर लागला आहे. यंदाही पाच महिने उलटल्यानंतरही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

व‌िचारवंताला महाराष्ट्र मुकला

$
0
0
‘एकाच वेळी अनेक आघाड्यांवर व‌िव‌िधांगी भूम‌िका साकारणारे आण‌ि बहुजनांमधील आत्मव‌िश्वास जागव‌िणारे डाव्या चळवळीचे मार्गदर्शक शरद पाटील यांचे व्यक्त‌िमत्व होते. त्यांच्या न‌िधनाने महाराष्ट्रात डाव्या चळवळीचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या रुपाने आपण जागत‌िक व‌िचारवंताला मुकलो आहोत,’ अशा शब्दांत ज्येष्ठ साह‌ित्यिक उत्तम कांबळे यांनी पाटील यांना श्रध्दांजली वाह‌िली.

तूर्तास पाणीकपात नाही

$
0
0
उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत असून, आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिककरांनी घाबरण्याचे कारण नसून, सध्या तरी शहरात पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे आश्वासन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिले.

मान्सूनपूर्व बैठकीला वरिष्ठांची दांडी

$
0
0
मान्सून पूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीला विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारत केवळ कर्मचाऱ्यांना पाठविले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

बसपानेही घेतली उडी!

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत हेतूपुरस्सर घोळ केला असल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेऊन दोषींवर करावाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘आप’ला हवी मतदारांची साथ

$
0
0
यापूर्वी वेळोवेळी मतदान करूनही लोकसभा निवडणुकीतील मतदारयादीतून नाव गायब झाल्याने अडीच लाखाहून अधिक मतदारांना फटका बसला. यावर राजकीय पक्षही आक्रमक झाले असून, आम आदमी पार्टीने (आप) या मतदारांनी पक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याबाबतच्या मुंबईतील प्रकारावरून आपतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याला जोड देण्यासाठी नाशिकच्या मतदारांनी आपल्या तक्रारी द्याव्या, असे आपतर्फे सांगण्यात आले आहे.

मैत्रेय रिअल्टर्सचे ‘संकुल फेज २’ लाँच

$
0
0
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीजच्या निर्माण शाखा अंतर्गत रिअॅल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नाशिक शहरातील पाथर्डी येथील मैत्रेय संकुल फेज २ चे औपचारिक लाँच करण्यात आले आहे. यात सर्वसामान्य कामगार वर्गाच्या बजेटमध्ये असतील असेच घरकुल तयार करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे सीओ पंकज श्रीवास्तव यांनी दिली. हॉटेल एमराल्ड पार्क येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरातून चार मोटारसायकलची चोरी

$
0
0
निवडणूक संपताच पुन्हा एकदा दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून शहरात सोमवारी चार मोटार सायकली चोरीला गेल्या.

माजी मुख्याध्याप‌िकेचा उपोषणाचा इशारा

$
0
0
श‌िक्षण उपसंचालकांच्या आदेशांनंतरही स्वेच्छा न‌िवृत्ती वेतन आण‌ि इतर फायदे नाकारल्याचा आरोप करीत माजी मुख्याध्याप‌िका श्रध्दा लेले द‌ी न्यू एज्युकेशन इन्स्ट‌िट्यूटच्या व्यवस्थापनाव‌िरोधात उद्या (द‌ि.१ मे) पासून ज‌िल्हा श‌िक्षणाध‌िकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images