Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ रेडगावकर कालवश

0
0
ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ त्र्यंबक रेडगावकर यांचे दीर्घ आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले,सुना,नातवंडे भाऊ असा परिवार आहे. नाशिकच्या साहित्य वर्तुळात नाना या नावाने प्रसिध्द असलेल्या रेडगावकर यांनी विविध नियतकालिकातून विपुल लेखन केले.

आवडेल तेथे प्रवासातून खिशाला आर्थिक झळ

0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेली आवडेल तेथे प्रवास ही योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली असली तरी सततच्या दरवाढीमुळे प्रवाशांमधून नाराजीच सूर उमटत आहेत.

मजुरांच्या पळवापळवीवरून वाद

0
0
बांधकाम साईटवरील कामगार अन्य साईटवर घेऊन गेल्याचे प्रकारामुळे आडगाव परिसरात दोघात वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांनी दाखल केल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रकाश दयाराम जगताप (२७) आणि रविंद्र नंदू जाधव (३३) यांनी या फिर्यादी दिल्या आहेत.

‘एलईडी’चा वाद लवकरच सुप्रीम कोर्टात

0
0
एलईडी फिटींग्जप्रकरणी ३ एप्रिल रोजी हायकोर्टाने विरोधकांच्या याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सहा आठवड्याचा कालावधी दिला होता. यामुळे विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.

पालिकेच्या वृक्ष धोरणाविरोधात ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका

0
0
महापालिकेच्या वृक्षविरोधी धोरणाविरोधात अखेर पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल झाली आहे. याप्रकरणी येत्या ७ मे रोजी सुनावणी होणार असून महापालिकेला आता वृक्षांबाबत योग्य ते धोरण स्विकारावे लागणार आहे.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लांबणीवर

0
0
ठाणे महापालिकेतील स्थायी समितीपाठोपाठ कल्याण-डोंबवली महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपासह मनसे काय भुमिका घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेने एकत्र येण्याची भुमिका घेतली.

नवे आर्थिक वर्ष मंदीच्या फेऱ्यात ?

0
0
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे २०१३-१४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नाला सुमारे ५० ते ६० कोटी रूपयांचा फटका बसला. आता २०१४-१५ हे आर्थिक सुरू झाले असून मंदीचा फेरा कायम राहणार का? याची भ्रांत महापालिकेला पडली आहे.

सोन्याच्या भावात स्थिरता

0
0
सोन्याच्या भावातील स्थिरता, लग्नाचा सिझन आणि अक्षय्यतृतीचा मुहूर्त अशा त्रिवेणी संगमामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची शक्यता असल्याने सराफ व्यावसायिक सज्ज झाले आहेत. मात्र, मंदी चाहुल लक्षात घेता ग्राहकांकडून सोन्याचे भाव आणखी कमी होतील का याकडे लक्ष लागले आहे.

खर्चात भुजबळ, भारती पवारांची आघाडी

0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांनी निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च सर्व उमेदवारांना निरीक्षकांना सादर केला आहे.

वगळलेल्या नावांच्या चौकशीला सुरुवात

0
0
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वगळण्यात आलेल्या २ लाख ४३ हजार नावांच्या चौकशीला सोमवारपासून प्रारंभ झाला. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्र्यंबकला लवकरच ३२ कोटी

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक शहर परिसरात प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांसाठी लवकरच ३२ कोटी रुपये देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तेथील कामांना वेग येईल, असेही त्यांनी सांगितले.

निकालानंतर १५० कोटींच्या कामांना सुरुवात

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली आचारसंहिता पूर्णतः मागे घेतल्यानंतर महापालिका प्रशासन सिंहस्थ कुंभमेळ्यासंबंधी नवीन १५० कोटी रूपयांची कामे सुरू करणार आहे. ही कामे मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यात सुरू होतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यालय सुरू झाले पण, कुणाच्या सोयीसाठी?

0
0
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात दोन नवे दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली असली तरी ती नक्की कुणाच्या सोयीसाठी आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गंगापूररोड, सातपूर, पंचवटी, मखमलाबाद, आडगाव, पाथर्डी या भागांतील सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी ही दोन्ही कार्यालये प्रस्तावित असताना प्रत्यक्षात ती द्वारका येथे कार्यन्वित करून मुद्रांक व नोंदणी विभागाने सर्वसामान्यांना त्रास देण्याचेच काम सुरू ठेवले आहे.

रस्त्याच्या कामात अनियमीतता

0
0
महापालिकेने महापालिका क्षेत्रात सुरू केलेल्या विविध रस्ते कामामध्ये अनियमितता असून यात मोठ्या प्रमाणार भ्रष्टाचार होत असल्याची टीका माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यापूर्वी पाटील यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे.

‘त्या’ मतदारांना मतदानाचा हक्क द्या

0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान समोर आलेल्या मतदारयादीत घोळामुळे नाशिकमधील अडीच लाख मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामुळे मतदारांकडून संताप व्यक्त झाला जात असून त्याला वाट करुन देण्यासाठी राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे.

ट्रिब्युनलच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

0
0
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या १०० किलोमीटर परिसरात फ्लाय अॅशच्या विटांचा वापर बंधनकारक असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. लाल विटांचा वापर करून ग्रीन ट्रिब्युनलच्या गेल्याच महिन्यातील आदेशाचाही यातून अवमान होत आहे.

कामटवाडे, खुटवडनगर भागात मैदानांची वानवा

0
0
सिडकोतील कामटवाडे व खुटवडनगर भागातील मुलांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या आरक्षित मोकळ्या भूखंडावर मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. या भागाचा दिवसेंदिवस विस्तार होत असून, त्यातुलनेत सुविधा मिळत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.

तरुणावर वार करणाऱ्यांना पोलिस कोठडी

0
0
काझी गढी येथील तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १ मे पर्यंत पोलिस कोठडी सूनावली आहे. अमर कृष्णकांत जंजाळ (२७), विवेक कृष्णकांत जंजाळ (२३) आणि योगेश भाऊसाहेब अमोलिक (२५) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

सावरकर तलावाचा गर्दीचा उच्चांक

0
0
बच्चे मंडळींना शाळेला सुट्या लागल्याने शहरातील स्विमिंग टँकवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावरील गर्दीने उच्चांक मोडला आहे. महापालिकेच्या मालकीचे ५ जलतरण तलाव असून सर्व ठिकाणी लहानमुले पोहण्याचा आनंद घेत आहे.

एक्स्प्रेस इन हॉटेलजवळ आग

0
0
नाशिक-मुंबई महामार्गावर अंबड परिसरातील एक्स्प्रेस इन हॉटेलला सोमवारी दुपारी आग लागल्याची वार्ता शहरभर पसरली. परंतु ही अफवा असल्याचे इंदिरानगर पोलिसांनी सांगितले. हॉटेलच्या बाजूला एका ठिकाणी किरकोळ आग लागली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images