Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक-पुणे रस्त्याची दुरुस्ती नावालाच

$
0
0
किरकोळ दुरुस्ती करून नाशिकरोडचे रस्त्याचे काम आटोपते घेण्यात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्त करण्याची तसेच डांबरीकरणाची गरज आहे.

रुंदीकरणात अतिक्रमणाचा अडथळा

$
0
0
महापालिकेने गंगापूररोडचे काम वेगाने सुरू केले आहे. परंतु, या रस्त्यांच्या कामात अतिक्रमण धारकांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. रुंदीकरणात अतिक्रमण अडथळा ठरत आहे. यासाठी रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

अंबड एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक पथदीप बंद असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य पसरले असून याचा शेकडो कामगारांना फटका बसत आहे. रात्रीच्या सुमारास घरी जाणाऱ्या कामगारांना औद्योगिक वसाहतीतून जाताना जीव मुठीत घेऊनच वाहतूक करावी लागत आहे.

मताधिक्य महायुतीला की आघाडीला?

$
0
0
राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात या वेळी सर्वाधिक मतदानाचा टप्पा गाठल्याने वाढीव मतदान कोणाला फायद्याचे ठरणार याबाबत उत्कंठा वाढली आहे. महायुतीला डोक्यावर घेतले जाते की आघाडीची पाठराखण केली जाते याबाबत तर्कविर्तक मांडले जात आहेत.

श‌िवशक्त‌ी आश्रम पुरविणार वैद्यकीय सुविधा

$
0
0
अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) वेदांत अध्ययनाचे उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेल्या श‌िवशक्ती आश्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (द‌ि. २) होणार आहे. या आश्रमाच्या माध्यमातून सामाज‌िक योगदान म्हणून त्र्यंबकेश्वर परिसरात शैक्षण‌िक आण‌ि वैद्यकीय सुव‌िधा पुरव‌िण्यात येणार आहेत.

बलात्काराच्या गुन्ह्यात ७ वर्ष सक्तमजुरी

$
0
0
नात्यातील अल्पवयीन मुलीला नवीन कपडे घेण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना २०१२ मध्ये दिंडोरी तालुक्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शनिवारी सात वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पाणीटंचाईची वाढती झळ

$
0
0
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेबरोबरच टँकरच्या फेऱ्यांची संख्याही जिल्ह्यात लक्षणीयरित्या वाढत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने आजघडीला जिल्ह्यात ७० टँकर सुरू असून मेच्या प्रारंभी ही संख्या १०० वर जाण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन चोरटे पकडले

$
0
0
भुरट्या चोऱ्या करून नागरिकांना जेरीस आणणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना शनिवारी पकडण्यात आले. भुरट्या चोऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या उपनगर प‌रिसरातील नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

कार्यकर्त्यांचा भर आकडेमोडीवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार असल्याने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते आपापली समीकरणे मांडण्यात व्यस्त आहेत.

कुलगुरुंच्या न‌िवडीला सहीचा अडसर

$
0
0
द‌िवंगत कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या जागी नवीन कुलगुरुंच्या नेमणुकी‌साठीची प्रक्र‌िया पुन्हा एकदा रखडली आहे. दोन मह‌िन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त व‌िद्यापीठात या प्रक्र‌ियेला सुरुवात करण्यात आली होती.

पाणीसाठा ३८ टक्के!

$
0
0
वैशाख सुरू होण्याआधीच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने पाणीटंचाईचाही प्रश्न निर्माण होत आहे. यंदा एप्रिल अखेरीस उत्तर महाराष्ट्रातील १७ धरणांमध्ये एकूण ३८ टक्के पाणीसाठा आहे.

बागलाणमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर येथे एका माजी सैनिकाच्‍या बंगल्यावर आठ ते दहा दरोडेखोरांनी टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांनी बनवलं `वायरलेस विमान`

$
0
0
त्याला केवळ एकच पंखा... इलेक्ट्रीक मोटरला वेग देवून हवेत घेणारी त्याची उंच भरारी... अगदी सहाशे मीटर उंच अन् हजार ते दीड हजार मीटर लांबवर त्याचे उड्डाण... अगदी संपूर्ण ' वायरलेस विमान '... हा अविष्कार करून दाखवलाय तो येवला येथील 'एसएनडी' तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विध्यार्थ्यांनी. हवेत इकडून तिकडे अन तिकडून इकडे भरारी घेताना, `लाइव्ह व्हिडीओ` दाखविणारी प्रणाली ही या वायरलेस विमानाची खासियत आहे.

‘मतदारयादीतील गोंधळाची चौकशी करा’

$
0
0
शहरातील मध्यवस्तीतील तसेच सुशिक्षित नागरवस्ती असलेल्या भागातील हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

नामपूरला दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोघांवर हल्ला

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर येथे एका माजी सैनिकाच्या बंगल्यावर आठ ते दहा दरोडेखोरांनी टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याने खळबळ उडाली आहे.

कांद्याचे दर वाढूनही नुकसान भरून निघेना

$
0
0
गेल्या महिनाभरापूर्वी गारपिटीच्या तडाख्याने केलेला कहर व त्यातून नगदी पिकांवर फिरलेला वरवंटा याची दाहकता सोसत-सोसत बळीराजा बेजार झाला असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याच्या भावाने काहिसा दिलासा दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

$
0
0
इगतपुरी तालुक्यात अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याची क्षमता असूनही हा पाण्याचा तालुका आज तहानलेला आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक गावांत पाणीटंचाईच्या तीव्र झळा लागल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे होतील काय?

$
0
0
शहरात सुरू असलेली रस्ता रुंदीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी होतील काय, असा सवाल वाहनचालक रहिवाशी उपस्थित करत आहेत. शहराच्या सर्वच भागात सुरू असलेली रस्ते रुंदीकरणाची कामे संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक व प्रवाशांना आधीच मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागत आहे.

‘त्या’ बांधकामांबाबत अहवाल सादर करा

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील बेकायदा बांधकामांची गंभीर दखल मुंबई हाय कोर्टाने घेतली आहे. या प्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर, नॅशनल हायवे अथॉरिटीलाही जाग आली असून, त्यांनी एका मोठ्या बांधकामाला दिलेला ना हरकत दाखला रद्द केला आहे.

वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का!

$
0
0
दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी गतवेळीपेक्षा सुमारे १६ टक्के मतदानात वाढ होऊन सुमारे ६४ टक्के विक्रम मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात जरी दहा उमेदवार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व माकप अशी तिरंगी असलेली लढत शेवटच्याक्षणी सुरगाणा तालुका वगळता राष्ट्रवादी व भाजपमध्येच चुरशीची झाली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images