Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रीय लॉन टेनिसचे उपविजेतेपद

$
0
0
पिंपरी चिंचवड लॉन टेनिस अॅकडमीमध्ये झालेल्या अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सीरिज लॉन टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तेजल कुलकर्णीने १८ वर्ष मुलांच्या गटात उपविजेतेपद मिळवले. अंतिम फेरीच्या सामन्यात तिने पुण्याची अग्रमानांकीत खेळाडू सुप्रभा पुजारीवर ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय संपादन केला. तेजल ही नाशिक जिमखाना येथे राकेश पाटील यांच्याकडे सराव करते.

चौकातील केबल आता रस्त्यावर

$
0
0
खासगी कंपनीच्या दूरध्वनी केबल टाकण्याचे काम दोन महिन्यांपासून कासव गतीने होत असल्याने नाशिकरोड परिसरात अपघात होत आहेत. महापालिकेने ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, तसेच केबल टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

बिटको चौक बनला अनधिकृत थांबा!

$
0
0
बिटको चौकात पुणे व अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसचा अनधिकृत थांबा तयार झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या बस नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या पुढे उभ्या करण्याची आवश्यकता आहे.

‘इलेक्शन फिव्हर’ कायम

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टप्पा गुरुवारी पार पडला असला तरी शहरातील इलेक्शन फिव्हर कमी झालेला नाही. महापालिकाही त्यास अपवाद नसून, शुक्रवारी महापालिकेत दुपारनंतर एकदम सामसूम निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

बीएलओंनी केला निषेध

$
0
0
निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अपार मेहनत घेऊनही जिल्हाधिकारी प्रशासन आणि पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा बीएलओ म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षक संघटनांच्या सदस्यांनी निषेध केला आहे. त्यामुळे अशा स्वरुपाचे काम शिक्षकांना देऊ नये, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

थेट प्रक्षेपणात तांत्रिक अडचणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्याच्या निर्णयाला ​​​जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारचा फटका बसला. ४६ पैकी तब्बल ११ मतदान केंद्रावरील वेब कास्टिंग इंटरनेट सेवेमुळे किंवा इतर तांत्रिक कारणामुळे सुरूच झाले नाही.

मतदान वाढीत इगतपुरी अव्वल

$
0
0
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीत गतवेळच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. नाशकात १३.६१ टक्के, तर दिंडोरीत १५.९० टक्के एवढा मतदानाचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

निवडणुकीनंतर नेते देवदर्शनाला!

$
0
0
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची धामधूम गुरूवारी मतदानानंतर संपली. यातून सततचे दौरे व प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परिणामी बहुतांश उमेदवारांनी मतदानानंतरचा पहिला दिवस आराम करण्यात घालविला, तर काहींनी स्वतःला रूटीन कामात गुंतवून घेतले.

बलात्काऱ्याला ७ वर्ष सक्तमजुरी

$
0
0
नात्यातील अल्पवयीन मुलीला नवीन कपडे घेण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना २०१२ मध्ये दिंडोरी तालुक्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शनिवारी सात वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तरुणावर कोयत्याने वार

$
0
0
मागील भांडणाची कुरापत काढून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना गंगापूररोडवरील मल्हारखान झोपडपट्टीजवळ गुरुवारी, निवडणुकीच्या दिवशी रात्री सव्वादहा वाजता घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दाम्पत्य आत्महत्या : कारण अद्याप गुलदस्त्यात

$
0
0
लष्करी जवान किशोर पोपट आरोटे (२७) याने पत्नीसह केलेल्या आत्महत्येचे गूढ कायम असल्याने तपास करणारे रेल्वे पोलिसही गोंधळात पडले आहेत. शिंगवेबहुला येथे राहणारा किशोर आरोटे हा दिल्लीत लष्करी सेवेत होता. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह मोनिकाशी झाला होता.

पैशांसाठी कामगारांनी केला मालकाचा खून

$
0
0
रोकड लुटण्याच्या उद्देशाने तिघा कामगारांनी मिळून मालकाचा खून करून त्याच्या वृद्ध आईलाही जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी निफाडजवळील कोठुरे फाट्यावर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात निफाड तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी सुनील जयराम चांदोरे यांचा मृत्यू झाला.

नाशिक स्थायी समितीवर ठाण्याची छाप?

$
0
0
निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत एकमेकांच्या विरोधात गळा काढून ओरडणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांनी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी ‘महायुती’ करीत शुक्रवारी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले.

‘त्यांनी’ फिरवली मतदानाकडे पाठ

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशभरातील तृतीयपंथीयांसाठी ‘इतर’ हा रकाना तयार करण्यात आला. निवडणूक आयोगाने देखील तृतीयपंथीय मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट केली. मात्र, सरकारी पातळीवर दखल घेऊनसुद्धा तृतीयपंथीय उमेदवारांनी मतदानाकडे सपशेल पाठ फिरवली.

मतदान यंत्रे कडक सुरक्षेत

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात वापरण्यात आलेली सर्व मतदान यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे अत्यंत कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी सीसीटीव्हीचाही कडक पहारा असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तेथे तैनात करण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर नेत्यांची पर्यटनवारी

$
0
0
एरवी राजकारणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणाऱ्या, दावे-प्रतिदावे करणाऱ्या राजकीय नेतेमंडळींचे यंदाच्या उन्हाळ्यात एका गोष्टीवर मात्र एकमत झाल्याचे दिसून येते. ते म्हणजे थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देण्याचे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फॅमिली टूर्स लांबल्या.

वीटभट्टी पडून एक जखमी

$
0
0
निवडणुकीची वीटभट्टी अंगावर पडल्याने एकजण जबर जखमी झाला. राजूर बहुला येथे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. नानासाहेब मोरे (४०, रा. दिंडोरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची कसोटी

$
0
0
लोकसभा निवडणुकीअंतर्गत नाशिक मतदारसंघातील मतदानात वाढलेला टक्का पाहता विधानसभा निवडणुकीतील इच्छुक सतर्क झाले असून, निवडणुकीची व्यूहरचना बदलण्यात ते भिडले आहेत. लोकसभा मतदानात वाढलेल्या एकूण टक्क्यांत सर्वच विधानसभा मतदारसंघातील वाढीव मतदानाचा समावेश आहे.

भंगार वाहनांपासून मिळणार लाखो रुपये

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत अडकलेली भंगार वाहनाची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यात राबवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेला प्रतीक्षा पूर्णवेळ आयुक्तांची

$
0
0
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे महापालिका आयुक्त संजय खंदारे यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे महापालिकेची सूत्रे सोपवण्यात आली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images