Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वरचा मजला

$
0
0
सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचं मोठे दिव्य पार पाडणारा माणूस. त्याला प्रमुख पाहुणे येईपर्यंत वेळ मारून न्यायची असते. त्याला अध्यक्षांचे भाषण होईपर्यंत श्रोत्यांना बसवून ठेवायचे असते. त्याला आणखी बऱ्याच गोष्टींचे शिवधनुष्य उचलायचे असते तर सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचा दुवा.

पैसे न मिळाल्याने उडाला गोंधळ

$
0
0
येथील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस आणि प्रशायकीय अधिकारी यांच्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भत्याच्या पैशावरून चांगलीच बाचाबाची झाली. गुरुवारी शहरातील तापमान 45 अंशाच्या वर असतांना उभे राहणाऱ्या गोवा पोलिस, गडचिरोली पोलिस व इतर जिल्ह्यातील पोलिसांना पैसे देण्यावरून वाद झाला.

सरकारी कार्यालयांना इलेक्शन फिव्हर

$
0
0
लोकसभा निडवणूक यंत्रणेत सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक कार्यालयात शांततेचे चित्र होते. गुरुवारी निवडणूक पार पडल्यानंतर शुक्रवारी देखील सरकारी कार्यालयातील शांतता कायम असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

स्कॉर्पिओ उलटून साईभक्त ठार

$
0
0
​दिंडोरी - नाशिक-पेठ महामार्गावरील आशेवाडी शिवारातील बारासाखळी शिवारात अपघातात दमन येथील साईभक्त ठार झाला, तर सहा जण जखमी झाले. बारासाखळी शिवारात स्कॉर्पिओ उलटल्याने होऊन राजेश मोहन पटेल (वय ४०) हा जागीच ठार झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत.

टक्का वाढूनही महिलांमध्ये निरुत्साह

$
0
0
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र, निवडणुकीत महिला मतदान करण्यात पुरुषांपेक्षा पिछाडीवर असल्याचे दिसून आले. असे असले तरी या वेळी महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला.

दोघांची आरपीआयमधून हकालपट्टी

$
0
0
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरुध्द प्रचार केला म्हणून कैलास खरे, राजेंद्र जगताप या देान्ही पदाधिकाऱ्यांची आरपीआय आठवले गटामधून हकालपट्टी केली आहे.

डाळिंबासाठी हेक्टरी ८५ हजार कर्ज

$
0
0
यंदाच्या आर्थिक वर्षासाठी खरीप व रब्बी हंगामातील पिकासह फळे, भाजीपाला पिकांसाठी पीक कर्जाची हेक्टरी मर्यादा राज्य सहकार खात्याने जाहीर केली आहे. या मर्यादेत सरासरी प्रतिहेक्टरी एक ते पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून डाळिंब पिकासाठी आता हेक्टर ८५ हजार रुपये कर्ज मिळणार आहे.

पाण्यासाठी वणवण

$
0
0
लासलगाव जवळील पिंपळगाव-नजीक परिसरातील विहिरी कोरड्याठाक पडल्याने येथील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तीव्र उन्हामुळे येथील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांची मोठी दमछाक होत आहे. मिळेल तेथून दूरवरून पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

अभिषेक शुक्लचे यश

$
0
0
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे संपन्न झालेल्या आशिया मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत १४ वर्ष मुलांच्या गटात नाशिकच्या अभिषेक अमित शुक्लने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम चार मध्ये स्थान मिळवले आहे. यापूर्वी अभिषेकने अनेक राष्ट्रीय मानांकन स्पर्धा जिंकल्या आहेत.

श‌िक्षण हक्क कायद्याव‌िषयी प्रबोधन

$
0
0
प्रत्येक व‌िद्यार्थ्याला श‌िक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वच घटकांचे योगदान महत्वाचे आहे. समाज आण‌ि पालकांच्या बरोबरीने प्रशासन आण‌ि श‌िक्षकांच्या बरोबरीनेच श‌िक्षण संस्थाचालकांचा सहभाग श‌िक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला गती देईल, असा व‌िश्वास श‌िक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

$
0
0
कर्नाटक टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने बेंगळुरू येथे वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिला गटाच्या १५ व्या टेनिस व्हॉलिबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी विजेतेपद पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व सिध्द केले.

निवडणूक संपल्या चो-या वाढल्या

$
0
0
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच चोरटे आणि लुटारू पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. मतदानाची प्रक्रिया आटोपते न आटोपते तोच गुरूवारी सायंकाळी चोरट्यांनी एका विवाहितेजवळील सुमारे दीड लाखांचा ऐवज हिसकावून पोबारा केला. वडाळारोड येथील रहेनुमा स्कुलसमोर ही घटना घडली.

आचारसंहितेच्या ५७ तक्रारींचा निपटारा

$
0
0
लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग झाल्याच्या ५७ तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. मात्र, या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी शुक्रवारी दिली.

वाढीव मतदानावर चर्चेचे गुऱ्हाळ

$
0
0
वाढीव मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, याबाबत राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. चर्चेचे हे गुऱ्हाळ निकालाच्या दिवशी म्हणजेच १६ मे रोजी संपण्याची चिन्हे आहेत.

पंचवटी विभागात आज पाणीपुरवठा बंद

$
0
0
लुंगे जलकुंभापासून औरंगाबादरोडवरील परिसरात पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, यामुळे शनिवारी पंचवटी तसेच पूर्व विभागातील अनेक भागात संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. रविवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सहायकपदासाठी २७ एप्रिलला परीक्षा

$
0
0
महावितरणने दोन हजार उपकेंद्र सहायकपदांची भरती प्रक्रिया सुरू केली असून, उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २७ एप्रिल रोजी राज्यातील विविध ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या पदांसाठी २४ हजार ६९४ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार करण्यात येणार असून, या पदासाठी तोंडी परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे.

छोट्या पक्षांचा फायदा राष्ट्रवादीला?

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या पक्षांचे उमेदवार निवडून येण्यात अथवा पराभूत होण्यात लहान पक्षांची भूमिका मोलाची ठरणार आहे. बहुजन बसपाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या उमेदवारीचा फायदा भुजबळांनाच होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

विवरणपत्र भरण्यास थंड प्रतिसाद

$
0
0
एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्स रद्द होऊन गुजरातच्या धर्तीवर व्हॅट आकारणीचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते, अशी अपेक्षा व्यावसायिकांना वाटते आहे. यामुळे विवरणपत्र सादर करण्यास थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत फक्त एका व्यवसायिकाने आपले विवरणपत्र सादर केले आहे.

आता वाढलाय उत्सुकतेचा ताण!

$
0
0
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मतदारांनी अनपेक्षितरित्या प्रतिसाद देत मतांचा टक्का अनुक्रमे १४ आ​णि १६ ने वाढवला. यापूर्वी ४० ते ४५ टक्क्यांभोवती गुरफटणाऱ्या आकड्यांनी जादुई मजल गाठल्याने निकालाचा सस्पेन्स चांगला ताणला असून वाढीव मतदानाचा आपल्यालाच कसा फायदा होईल, याबाबत राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. चर्चेचे हे गुऱ्हाळ निकालाच्या दिवशी म्हणजेच १६ मे रोजी संपण्याची चिन्हे आहेत.

१ किलो सोन्याची बिस्किटे

$
0
0
दहा लाखांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी ‌देवीदास शिंदीकर याच्याकडे तब्बल १ किलो १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सापडली आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images