Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाथर्डी शिवारात बिबट्यासाठी पिंजरा

$
0
0
पाथर्डी व वडनेर रस्त्यावर बिबट्यांची दहशत असल्याने नागरिक भयभीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याने ते बिबट्यानेच केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून या भागात एक वनपाल आणि एका गार्ड नियुक्त करण्यात आला आहे.

जो सांस्कृतिक, त्यालाच अमूल्य मत

$
0
0
आजची अराजकाची परिस्थिती बदलायची असेल तर आता सुसंस्कृत उमेदवाराला निवडून देण्याची गरज आहे. उमेदवार कोणताही असो, कलेच्या दृष्टीकोनातून पाहता हातात येणारी पाचही वर्षे कोणताच उमेदवार सांस्कृतिक क्षेत्राकडे गांभिर्याने पहात नाही, अशावेळी विश्वास ठेवायचा कोणावर असा सवाल शहरातील साहित्यिकांनी केला आहे.

‘आघाडी’च्या प्रचाराला नकारघंटा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत उमेदवार छगन भुजबळ यांचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अनेक ठिकाणी परवानगी नाकारली जात आहे. वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक ठिकाणचा ना हरकत दाखला अशा विविध कारणांद्वारे ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

हेल्पलाइनला नको, ऑफिसला फोन करा

$
0
0
मतदारांसाठीच विशेष हेल्पलाइन सुरू करणाऱ्या निवडणूक यंत्रणेने सपशेल माघार घेत चक्क ’हेल्पलाइनला नको, ऑफिसला फोन करा’ असा अजब सल्ला देत मतदारांच्या संयमाची परीक्षा पाहण्याचे काम सुरू केले आहे.

काँग्रेसचा विचारच थांबला

$
0
0
‘काँग्रेस हा विचार असल्याची भावना राहूल गांधी व्यक्त करीत आहेत. मात्र, काही काळापासून काँग्रेसच्या विचाराचा काटा एकाच जागी अडकला असून त्यामुळे देशाचा विकास खुंटीत झाला आहे.’

‘आघाडी सरकारला सत्तेवरून हटवा’

$
0
0
भ्रष्टाचार आणि महागाईने देश वासियांच्या केंद्राकडून असलेल्या अपेक्षाना सुरुंग लावणारे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचा आणि एकदा संधी देऊन वैभवशाली परिवर्तनवादी देश घडविण्याची संधी द्या, असे आवाहन करून नरेंद्र मोदी यांनी मनमाडकरांना थ्री डी सभेव्दारे केले.

कोकाटेंचे समर्थक गोडसेंच्या पाठीशी

$
0
0
सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक असलेले मळहद्द मित्रमंडळासह अनेक मंडळांनी रविवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना आपला बिनशर्थ पाठिंबा व्यक्त केला.

महारॅलीसह ठाकरेंची सभा अडचणीत

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असलेल्या २२ एप्रिलला महारॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचा आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा घेण्याचा मनसुबा पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अडचणीत सापडला आहे.

जिजाऊ ब्रिगेडमध्ये फूट!

$
0
0
जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकरोड येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. जिल्हा कार्यकारिणीने मात्र अधिवेशनावर बहिष्कार घातला होता. महिलांनी कालबाह्य रुढी-परंपरा त्यागून आधुनिकतेची कास धरावी, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. छाया महाले यांनी यावेळी केले.

विकास दिसतो; सांगावा लागत नाही

$
0
0
‘नाशिककरांनी महापालिकेची सत्ता देऊनही त्यांनी काही काम केले नाही. त्यावर अजून आम्हाला पाच वर्ष झाली नाहीत, आम्ही विकास करू अशी उत्तरे दिली जात आहेत. परंतु, केलेला विकास हा दिसून येतो तो सांगावा लागत नाही’ असे म्हणत राज्याचे उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

बागलाणमध्ये पुन्हा गारपीट

$
0
0
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर अजूनही थांबलेला नाही. रविवारी मालेगाव, निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. बागलाण तालुक्यातील मोसम आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी पावसासह गारपिटीने पुन्हा थैमान घातले. तवळवाडे दिगर येथे वीज कोसळून बैलजोडी ठार झाली.

...तो आमचा काय होणार?

$
0
0
कधीकाळी भुजबळ काका म्हणणारे राज ठाकरे माझ्यावर भ्रष्टाचारासह विविध आरोप करतात. मात्र जो रक्ताच्या काकांचा (बाळासाहेब ठाकरे) नाही झाला तो आमचा काय होणार, असे म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका आणि आरोप केले.

अजित पवारांची चौफेर टोलेबाजी

$
0
0
नकला करायच्या असतील, तर राज ठाकरेंनी सर्कशीत जावे. मुंडेही उपमुख्यमंत्री होते पण, बीडचा विकास झाला नाही. तर उद्धव ठाकरेंनी कधी सोसायटीची निवडणूक तरी लढविली आहे का… मोदी गोध्रातील दंगलींबाबत का बोलत नाही…

राजकडे मॉल घेण्यासाठी पैसे कुठून आले?

$
0
0
राज ठाकरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत दुबईत मॉल घेण्यासाठी राज यांनी पैसा कुठून आणला होता, प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

कार्यकर्ते अडकले ल‌िफ्टमध्ये

$
0
0
नेत्याच्या लेखी कार्यकर्त्याची ‘धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं’ अशी अवस्था असते. कार्यकर्त्याच्या या महतीमुळेच न‌िवडणूकीसारख्या हंगामात त्याचे मन मोडून अज‌िबात चालत नाही. परिणामी, ‘वाट्टेल तसा वागू दे पण् पक्षासाठी राबू दे’ हेच धोरण अडलेल्या उमेदवाराला स्वीकारावे लागते.

''मातोश्री', 'कृष्णकुंज'वर सर्वाधिक टोल"

तुमच्या हक्काचे पाणी तुम्हालाच मिळणार

$
0
0
केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता येणारच असून उद्या जर महाराष्ट्राचे वाट्याला एकच मंत्रिपद आले तर माझ्याऐवजी हरिश्चंद्र चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिपद देईल. मोदी महाराष्ट्राला भरभरून देतील. तुमच्या वाट्याचे पाणी तुम्हालाच मिळेल.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ‍शहरात संचलन

$
0
0
लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत शहरातील काही पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत सोमवारी पोलिसांनी संचलन केले.

पटेलांचा शिरपूर पॅटर्न फसवा

$
0
0
शिरपूर पॅटर्न एक भूलभूलय्या असून स्वतःचे साम्राज्य सांभाळण्यासाठीच अमरीश पटेल यांचा खासदारकीचे कवच मिळविण्यासाठी आटापिटा सुरू असल्याची टीका बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी केली.

मनमाड शहरात सभांचाही दुष्काळ

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र शिगेला पोहचला पण मनमाडकर मात्र यावेळी निवडणुकीच्या त्या खुमारापासून, त्या शाब्दिक कोट्या आणि आरोप प्रत्यारोप यांच्या शाब्दिक फटकेबाजीपासून चक्क वंचित राहिले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images