Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जनतेची द‌िशाभूल थांबवा

0
0
ज्या सम‌ितीकडे मंत्र्यांच्या उलटतपासणीचे अध‌िकारच नाही, त‌िचा संदर्भ देऊन आपण धुतल्या तांदळाचे आहोत, असे दाखव‌िण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अज‌ित पवार करीत आहेत. ही जनतेची सारासार द‌िशाभूल आहे.

प्राचार्य बेजन देसाई यांचे न‌िधन

0
0
श‌िक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य, व‌िव‌िध धर्मांचे तौलन‌िक अभ्यासक आण‌ि ज्येष्ठ व‌िचारवंत प्राचार्य बेजन देसाई (९१) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे न‌िधन झाले. त्यांच्या पश्चात‌कन्या माहरुख खरास आण‌ि व‌िख्यात वास्तुव‌िशारद बेहजाद खरास असा परिवार आहे.

जिल्हाधिकारी नाराज

0
0
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्षाच्या कामकाजावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तीव्र नाराज झाले आहेत.

२ लाख शेतकऱ्यांना फटका

0
0
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तांडवामुळे जिल्ह्यातील २ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाने तयार केला असून, जिल्ह्यात शेतपिकांचे तब्बल १८२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भुजबळांचे राजना आव्हान

0
0
निवडणूक लढवणे सोपे नाही, काम केले नाही तर जनता जाब विचारते. आम्ही काम करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणूक लढवा, असे खुले आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हीना गावितांचा अर्ज वैध

0
0
नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप पी यांनी बुधवारी वैध ठरविला.

विकासाचा अमृतबिंदू

0
0
अजून सव्वा वर्षानंतर, १४ जुलै २०१५ रोजी नाशिकच्या सिंहस्थाला प्रारंभ होईल. सुमारे तेरा महिने चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाचे वेध साधूंना, भाविकांना, माध्यमांना आणि सरकार-प्रशासनालाही लागले आहेत.

लायन्स क्लब प्रांतपालपदी वैद्य व‌िक्रांत जाधव

0
0
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रांतपालपदी येथील वैद्य व‌िक्रांत जाधव यांच्या न‌िवडीची घोषणा नुकतीच करण्यात आली. महाबळेश्वर येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत डी २ ची दोन द‌िवसीय परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

नूर अबूजीवाला यांना पुरस्कार

0
0
‘विद्यावर्धन्स इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन एनव्हायरनमेन्ट अँड आर्किटेक्चर’चे (IDEA) ‘डिझाईन’ विषयाचे प्राध्यापक व आर्किटेक्ट नूर अबूजीवाला यांना ‘आर्किटेक्चरल डिझाईन’ या विषयामध्ये ‘बेस्ट डिझाईन टिचर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्रंथपालाचे काम देतेय समाधान

0
0
वाचनालय, पुस्तके आणि तिथले वातावरण या सगळ्या गोष्टी वेगळ्याच विश्वात नेणाऱ्या असतात. पण हा सगळा माहोल टिकवून ठेवण्यासाठी एक व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असते ती म्हणजे ग्रंथपाल.

ग्रंथपालांचा गांभीर्याने व‌िचार व्हावा

0
0
राज्यभरातील ग्रंथपालांचा प्रात‌िन‌िधीक सूर श‌ैक्षण‌िक क्षेत्रात श‌िक्षक या घटकाच्या बरोबरीने योगदान देणारा ग्रंथपाल हा घटक कायम पडद्याआड राहतो. प्राथम‌िक स्तरावरील समस्यांपासून तर प्रशासकीय स्तरावरील मोठ्या समस्यांपर्यंत वर्षानुवर्षे या घटकाच्या समस्या ‘जैसे थे’ च आहेत.

आजारपणाची आयडिया

0
0
सध्या निवडणुकीची धूम असल्याने पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला जीव लावून सांभाळले जात आहेत. कुणाला दुखवू नये असे वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना काय हवे, काय नको याची सातत्याने विचारपूस केली जात असून कार्यकर्त्यांच्या दिमतीसाठी दुसऱ्या कार्यकर्त्यांची फौज तैनात केली आहे.

होय, आम्हाला ग्रंथपाल व्हायचयं!

0
0
ग्रंथपाल व्हायचं असेल तर कष्ट आहेतच. पण, कमी जागा, वाढलेली स्पर्धा यावर मात करीत तरुणाई बी. लिब व एम. लिब करीत ग्रंथपाल होण्यासाठी धडपडत आहेत. या तरुणाईला ग्रंथपालच का व्हावसं वाटलं या विषयी त्यांच्याच शब्दात...

जागतिक विशेष ग्रंथपाल दिन

0
0
पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणारा ग्रंथपाल सरकारच्या विचित्र धोरणांमुळे आज कोर्टाचे उंबरे झिजविताना दिसतो आहे.

वोक्हार्टतर्फे घरपोच फिजीओथेरपी

0
0
नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वोक्हार्टतर्फे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने घरपोच फिजिओथेरपी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

पंचवटीतील वाहतूक मार्गात उद्या बदल

0
0
कामदा एकादशीनिमित्त शुक्रवार (दि. ११) शहरातून रामरथ व गरूडरथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटी, मेनरोड परिसरातील वाहतुकीच्या मार्गात दुपारी तीनपासून बदल करण्यात येणार असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

नाशिकरोडच्या प्रवाशांना प्रतीक्षा शेडची

0
0
नाशिकरोडसह परिसरात बस प्रवाशांना निवारा शेडची गरज तीव्रतेने भासत आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या जागेवर बसशेड उभारण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी त्या वापराविना पडून आहेत.

कौन्सुलेट जनरलची उद्योजकांशी चर्चा

0
0
नाशिक दौऱ्यावर आलेल्या इस्रायल कौन्सुलेट जनरल जोनाथन मिलर आणि त्यांच्या सहकार्यांनी नाशकात येऊन उद्योगासाठी चाचपणी केली आहे. त्यानंतर नाशकात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दाखविली आहे.

रस्त्याच्या कामांना अडथळ्यांची शर्यत

0
0
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची कामे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे या कामांमध्ये अनेक ठिकाणी अडथळे येत आहेत.

आता वेळ सत्ताबदलाची

0
0
गेल्या काही वर्षापासून एकच सत्तापक्ष आपल्यासमोर असल्याने वेगळा विचार किंवा बदल झालेला नाही. आज सत्तेत बदल होऊन ज्या क्षेत्रांचा विकास झालेला नाही, त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images