Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पन्नास हजार भाविक नतमस्तक

$
0
0
साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू आद्यशक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवाला राम नवमीच्या शुभदिनी उत्साहात प्रारंभ झाला. सप्तशृंगी मातेचा जय जयकार करीत गड परिसर गजबजून गेल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

सर्वच कांदा खरेदीचा व्यापाऱ्यांचा निर्णय

$
0
0
येवला बाजार समितीत विक्रीसाठी येणारा सर्वच कांदा खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळ व व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा विक्रीला आणण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

नसलेले व‌िषय मार्कशीटवर

$
0
0
पुणे व‌िद्यापीठांतर्गत येणाऱ्या शहरातील महाव‌िद्यालयात श‌िक्षण घेणाऱ्या बॅचलर ऑफ इंज‌िनीअरिंग इन कम्प्युटर या अभ्यासक्रमातील तीन व‌िद्यार्थ्यांना व‌िद्यापीठाच्या गोंधळाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे.

मुक्तीधाम परिसरात पुन्हा ट्रॅफीकजॅम

$
0
0
नाशिकरोडच्या मुक्तीधाम शेजारील सोमाणी गार्डनच्या रस्त्यावर वाहतूक समस्येने पुन्हा डोके वर काढले असून प्रवाशांच्या अस्ताव्यस्त पार्कींगमुळे व्यावसायिक व नागरीक त्रस्त झाले आहे.

गोदावरी परिचय उद्यानाला लागेना मुहूर्त

$
0
0
महापालिकेने पर्यटकांना गोदावरी नदीचा परिचय व्हावा यासाठी सोमेश्वर धबधब्यावर बनविलेले गोदावरी परिचय उद्यान केवळ सुरक्षारक्षक सुरू होऊ शकलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प सध्या धूळखात पडून आहे.

निवडणूक कार्यशाळेला दोनशे कर्मचाऱ्यांनी दांडी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाण्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस बागलाण तालुक्यातील दोन हजार बेचाळीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार होते.

अनेक शाळांच्या उभारणीत पुढाकार

$
0
0
नाश‌िकमध्ये फ्रावशी, स‌िल्व्हर ओक आण‌ि रासब‌िहारी स्कूल या शाळाही प्राचार्य बेजन देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या होत्या. वेद मंद‌िराची उभारणी, वेद वेदांग पुरस्कार आण‌ि वेद प्रदीप या मास‌िकामागे त्यांचा स‌िंहाचा वाटा होता.

व्हिजिलन्सची पथके जोमाने सक्रीय

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असताना निवडणूक आयोगातर्फे नेमण्यात आलेल्या तपासणी पथकांकडून जागोजागी वाहनांची तपासणी होत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात पैसा किंवा इतर वस्तुंची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडतात.

सक्षम उमेदवार हवा

$
0
0
‘मतदान कराण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. पण त्यासाठी सक्षम उमेदवार गरजेचा आहे. अन्यथा मतदान तरी काय कामाचं?’, असा सवाल श्रीरंग महिला मंडळातील महिलांनी उपस्थित केला.

मनसेची पंचवटीतील सभा अखेर रद्द

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ मनसेअध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये अर्धा डझन सभा घेणार असल्याचा दावा करणा-या मनसेकडून आता सभांची संख्या घटविण्यात येत आहे.

हिंमत असेल तर निवडणूक लढवा

$
0
0
निवडणूक लढवणे सोपे नाही, काम केले नाही तर जनता जाब विचारते. आम्ही काम करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणूक लढवा, असे खुले आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब वाघ शिवसेनेत दाखल

$
0
0
मैत्री आणि छगन भुजबळांना विरोध अशा समीकरणातून सिन्नरमध्ये आघाडीला भगदाड पाडून काँग्रेसचे पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ महायुतीत दाखल झाले आहेत.

‘आप’चा भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर भर

$
0
0
स्थान‌िक स्तरावरही भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा वायदाच आम आदमी पार्टीने जाहीरनाम्यात केला आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासह गोदेची प्रदूषण मुक्ती, सुलभ शैक्षण‌िक धोरणासह शेती आण‌ि उद्योग ह‌िताला प्राधान्य द‌िले आहे.

नाशिकरोडला वाहनांची पुन्हा तोडफोड

$
0
0
सिन्नरफाटा येथे काल (ता.७) पहाटे गॅरेजमधील वाहनांचे तोडफोड करीत नुकसान केले. या घटनेमुळे पुन्हा या परिसरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.

बलात्कार प्रकरणी संशयित ताब्यात

$
0
0
वडाळा गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी याच भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.

‘संसार क्षणभंगूर’

$
0
0
मनुष्य जन्म हा फार दुर्लभ असून या जन्मात माणसाला परमार्थ करण्याची संधी असते. मात्र मनुष्य संसारात अडकून पडतो. संसार हा क्षणभंगूर असून, त्याचा काहीच भरवसा नाही, असे प्रतिपादन मुकूंदराज महाराज यांनी केले.

इस्त्राइल कौन्स्युलेट जनरल आज नाशकात

$
0
0
इस्त्राइल कौन्सुलेट जनरल जोनाथन मीलर व त्यांचे शिष्टमंडळ नाशकातील औद्योगिक क्षेत्राची माहिती घेण्यासाठी बुधवारी नाशकात येत आहेत.

सटाण्यात मनसेची भूमिका १३ एप्रिलला ठरणार

$
0
0
मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांचा जाहीर सभांमध्ये नमो नमोचा जागर सुरू असताना धुळे लोकसभा मतदारसंघात तटस्थ असलेल्या मनसेला काँग्रेसकडून ऑफर आल्याची जोरदार चर्चा आहे.

राम जन्मला गं सखे राम जन्मला

$
0
0
ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात काळाराम मंदिरात मंगळवारी दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ या जयघोषांने शहरातील मंदिरे दुमदुमली होती. हजारो भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.

आज चित्र स्पष्ट होणार

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट होणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images