Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरात अवैध शस्त्रांचा सुळसुळाट

0
0
शहरात अवैध शस्त्रांचा सुळसुळाट झाला आहे. परप्रांतियांकडून बेकायदा पिस्तुलांची विक्री केली जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, तीन महिन्यांत तब्बल नऊ पिस्तुल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उमेदवारांची अर्जवारी सुरू

0
0
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवारपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. दिंडोरीतून भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी तर बसपाचे उमेदवार दिनकर पाटील यांनी नाशिक मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

किराणाचा भडका

0
0
राज्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असतानाच किराणा वस्तूंनीही महागाईचा कळस गाठला असून बहुतांश वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. साधारण ३० रुपये प्रति किलो मिळणारी साखर ३५ रुपयांवर गेली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

दिनकर पाटलांकडे ७ कोटींची मालमत्ता

0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अंदाजे ७ कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.

हम किसीसे कम नही

0
0
परीक्षेतील गुण म्हणजे आयुष्याचे सर्वस्व हे समजण्याचा काळ आता नाहीसा झाला आहे. आपल्या योग्य दृष्टिकोनातून आपण अधिक यश कमवू शकतो हे नवीन पिढी दाखवून देत आहे. तरूण पिढीला आता स्वत:च्या पदव्यांपेक्षा स्वत:कडील कौशल्यांवर अधिक विश्वास वाटत आहे.

कार्यकर्ते म्हणे, ‘रंगीत तालीम झाली’

0
0
न‌िवडणूका अन् राजकारण या शब्दांपासून चार हात दूरच राहण्यात आजवर धन्यता मानणाऱ्या, समस्यांनी गांजलेल्या ‘जाम’ आदमीला ‘आम’ आदमीचा सहारा म‌िळाला. अन् जागोजागी आतून धुमसणाऱ्या कार्यकर्त्यांची फौजच ‘आम’ आदमीच्या वारुळात सामिल झाली.

एक्सरसाईज म्हणून तरी...

0
0
लेखनाला सुरूवात करण्यापूर्वी मी ज्याला जुनं म्हणतो ते पुरेसं जुनं झालेलं नसतं आणि ज्याला नवं म्हणतो तेही पुरेसं नवं नसतं. मी स्वतःला याच संक्रमण अवस्थेत पहात आहे असाच याचा अर्थ समजावा आणि नाशिकची रंगभूमीही याच संक्रमण अवस्थेतून जात आहे असे मानले तरच नाशिकच्या रंगभूमीची वाट आशादायी वाटायला लागेल.

डॉक्टरांविना हॉस्पिटल!

0
0
महापालिकेने गेल्या कुंभमेळ्यात गंगापूर गाव व पंचक्रोशीतील पेशंटसाठी सुविधायुक्त हॉस्पिटलची उभारणी केली. परंतु, या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसल्याने ते अक्षरशः ओस पडले आहे.

नाशिकरोड परिसरात मद्यपींचा धुमाकूळ

0
0
जेलरोड, नाशिकरोड परिसरातील बेकायदा तसेच काही कायदेशीर दारुविक्री दुकानांमुळे इतर व्यावसायिक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसाढवळ्या महिलांचा विनयभंग करून त्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

0
0
महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिलीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नाशिकरोड व्यापारी बँकेत लवकरच एटीएम

0
0
नाशिकरोड येथील अग्रगण्य नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँकेस संपूर्ण अर्थिक वर्षात आठ कोटींचा ढोबळ नफा झाला असून येत्या काही दिवसांत शहरातील विविध शाखांमध्ये एटीएम सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी दिली.

भारुड, पोवाड्यातून मतदार जागरुकतेचा गजर

0
0
पोवाड्याचे खणखणीत स्वर आता जळगाव जिल्ह्यासह खान्देशातही घुमू लागले आहेत. जिल्हा प्रशासनकडून मतदार जागरुकता अभियान राबविले जात आहे. यासाठी विविध मार्गांनी आणि लोककलांच्या मदतीने मतदारांना मतदाराने महत्त्व, त्याची देशाच्या आणि समाजाच्या भवितव्यासाठी असलेली निकड पटवून दिली जात आहे.

तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडविणार

0
0
माजी सरपंच व माकपच्या राज्य समितीचे सदस्य असलेल्या वाघेरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मतदारसंघातील समस्यांसह विविध प्रश्नांवर आपली भ‌ूमिका मांडली.

चर्चा स्टंटबाजीची

0
0
अलीकडे निवडणुकीलाही युद्धाचेच स्वरूप प्राप्त झाल्याने या काळात जो काही हैदोस चालतो तो क्षम्य मानावा, अशा अपेक्षेनेच राजकारणी मंडळी कार्यरत राहतात. या हैदोसाचीच सभ्य आवृत्ती म्हणून प्रसिध्दीच्या अनोख्या फंडांकडे पहावे लागेल. प्रसिध्दीच्या या स्टंटमुळे उमेदवार वा त्याचा पक्ष सतत चर्चेत राहतात व जनसामान्यांचीही घडीभर करमणूक होते. काही वेळा हेच स्टंट महागही पडतात.

राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत एसएनडीचे उपकरण तृतीय

0
0
येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कापूस वेचणी यंत्र’ या उपकरणाला मुंबई येथे झालेल्या ‘तंत्रज्ञान १४’ या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत तृतीय क्रमांकासह रोख पाच हजार रुपयांचे बक्षिस मिळाले.

मंदिरांमध्ये लागतेय ‘त्यांचे’ चित्त

0
0
मार्च संपला की विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षांना सुरुवात होते. विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी निवांत जागा शोधू लागतात. काही लायब्ररीत जातात तर काही समाज मंदिर, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणाचा आसरा घेऊ लागतो.

२० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण

0
0
सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील जोगेश्वरी प्राथमिक आश्रम शाळेतील २० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी मंगळवारी रात्री सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कांद्याने हसवले अन् रडवलेही

0
0
अस्मानी संकटानंतर कांद्याचे भावही गडगडले. मात्र, गेल्या आठवड्यापासून काही कांद्याला हजार रुपये क्विंटल भाव मिळत असताना काही बाजार समित्यांमध्ये मात्र, भावात कमालीची घसरण पहावयास मिळत आहे.

दहा महिन्यांचा मुलगा सापडला मंदिरात

0
0
विंचून - प्रकाशा राज्य मार्गावरील आसरा मातेच्या मंदिराजवळ दहा महिन्याचे अनोळखी बालक आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री मंदिरात सापडलेले हे बालक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची चर्चा आहे.

विजय पांढरेंचा रखडला अर्ज

0
0
मुर्हूताच्या मुद्यावरून इतर पक्षांना लक्ष्य करणा-या ‘आप’वर मुहूर्तवाल्यांच्याच रांगेतच उभे राहण्याची वेळ आली आहे. उमेदवारी अर्जात तांत्र‌िक अडचणी न‌िघाल्या असल्याचे कारण देत ‘आप’चे बहुचर्च‌ित उमेदवार व‌िजय पांढरे यांचा अर्ज गुरुवारी दाखल होऊ शकला नाही. अशुभ मुहूर्तावरच ‘आप’ चा अर्ज रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images