Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सर्वांगीण विकास हाच ध्यास

0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे भाजपचे दिंडोरी मतदारसंघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राजकीय अफवांचे ‘एप्रिल फुल’

0
0
‘राष्ट्रवादी’तर्फे खासदार समीर भुजबळही अर्ज दाखल करणार… गजानन शेलार मनसेत दाखल… दिनकर पाटलांचे भुजबळांना समर्थन… राज व उध्दव यांचे मोबाईलद्वारे संभाषण… यासारख्या ‘ब्रेकिंग न्यूज’ने मंगळवारी दिवसभर अनेकांना भंडावून सोडले.

येवला येथून विद्यार्थी बेपत्ता

0
0
शहरातील देसाई ड्रीम सिटी वसाहतीत राहणारा सुमेध तुळशीराम पगारे (वय १७ ) हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. कोपरगाव येथील संजीवनी तंत्रनिकेतनमध्ये शिकत असलेला सुमेध घराबाहेर गेला तो पुन्हा परतलाच नाही.

नांदगावला लाच घेताना तलाठ्यास पकडले

0
0
सातबाराच्या उतारावर इतर अधिकारातली न्यायालयाने दिलेली मनाई हुकुमाची नोंद घेण्यासाठी लाच मागणाऱ्या वाखारी येथील तलाठ्यास मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

बाजारपट्टी बंदसाठी आंदोलनाचा इशारा

0
0
तालुक्यातील राजापूर येथे शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी बाजारपट्टी तत्काळ बंद करा या मागणीसाठी प्रा. ज्ञानेश्वर दराडे आणि सहकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

नाशिक-सिन्नर प्रवास ठरतोय त्रासदायक

0
0
सिन्नरच्या बस टर्मिनलवर हायटेक सुविधा उपलब्ध करून देत असताना दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक-सिन्नर प्रवास त्रासदायक आणि वेळखाऊ ठरत आहे. यामुळे बसेसची संख्या वाढवावी किंवा सिटी बस सिन्नरपर्यंत आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

उपाययोजनेअभावी वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई

0
0
तालुक्यातील ग्रामीण भागात शेती व्यवसायाच्या निमित्ताने सुमारे साठ ते सत्तर टक्के कुटुंब छोट्या वाड्या-वस्त्या करून राहतात. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच वाड्या-वस्त्यांपासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात.

मदतीचे चिन्ह दिसत नसल्याने भामरे निराश

0
0
पिंगळवाडे गावाचे रहिवासी असलेल्या छबू मोहन भामरे यांच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न अवघ्या दीड महिन्यांवर असताना आत्महत्या केली. छबू भामरे यांनी वडिलोपार्जित चार एकर माळरानावर दीड एकर द्राक्ष आणि दोन एकरमध्ये डाळिंब बाग फुलवली होती.

तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच

0
0
कारसूळ येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवण्याची ठाम भूमिका घेतली आहे.

जेईईची परीक्षा बौद्धिक पातळी वाढवणारी

0
0
दहावी झाल्यांनतर इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेशासाठी जेईई परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास आणि मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढवणारी असल्याचे मत आयआयटी अॅकॅडमीचे संचालक महेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले.

व्यावसाय‌िक श‌िक्षणासाठी मु‌लींना मिळणार श‌िष्यवृत्ती

0
0
व्यावसाय‌िक व तंत्रश‌िक्षण शाखेतील उच्च श‌िक्षणासाठी व‌िद्यार्थ‌िनींना तैनवाला फाउंडेशनतर्फे श‌िष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सामान्य आर्थ‌िक कुटुंबातील २५ मुलींना या श‌िष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

प्राध्यापकांना न‌िवडणुकांच्या कामांची सक्ती

0
0
उत्तरपत्र‌िकांचे मूल्यांकन आण‌ि न‌िवडणुकांची लादण्यात येणारी कामे एकाच कालावधीत येत असल्याने याचा थेट परिणाम न‌िकालांवर होण्याची भीती प्राध्यापकांकडून व्यक्त होत आहे. परिणामी, वेळेत न‌िकालाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या कामांची सक्ती करण्यात येऊ नये.

‘बॉश’मधील पगारवाढीचा तिढा कायम

0
0
नाशिक शहरातील मदर इंडस्ट्री असलेल्या बॉश कंपनीतील पगारवाढीचा तिढा अद्याप कामय आहे. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत निर्णय न झाल्याने कंपनीतील कामगारांना पगारवाढीच्या करारासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

​ग्रामीण परिसर अन् कामगारांच्या भेटीगाठींवर ‘आम आदमी’चा भर

0
0
सामान्य माणूस समजून घेण्याच्या भूम‌िकेत असलेल्या ‘आप’च्या प्रचाराचा या टप्प्यातील जोर ग्रामीण परिसर आण‌ि कामगार वर्गाच्या भेटीगाठींवर द‌िसून येत आहे. या टप्प्यात उपनगरातील मतदारांच्या बरोबरीनेच ग्राम‌ीण परिसरही ‘आप’चे उमेदवार आण‌ि कार्यकर्ते प‌िंजून काढत आहेत.

कर्मचारी प्रशिक्षण केंद्र धूळखात


उमेदवारांचा भर `पर्सोनॅलिटी डेव्हलपमेंट`वर!

0
0
निवडणूक म्हटलं की, डोक्यावर टोपी, अंगात खादीचे कपडे चढवून हात जोडून मतांचा जोगवा मागणारे उमेदवार असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. सध्याचे उमेदवार मात्र स्टायलिश पेहरावासह, ट्रेण्डी राहत मतदारांसमोर जाताना दिसत आहेत.

उमेदवारांच्या पत्रप्रपंचाला सुरुवात

0
0
लोकसभा निवडणुकीचा मोसम सध्या चांगलाच तापलेला असून, इच्छुकांचे मनोगत व हितगुज सोप्या शब्दात मांडणारी पत्र घरोघर वाटली जात आहे. यात प्रामुख्याने भाषा हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मराठी, अहिराणी, इंग्रजी, उर्दू तसेच मतदाराला जवळची वाटेल, अशा भाषेत ही पत्र लिहिली जात आहेत.

डाव्यांची भ‌िस्त आडम अन् येच्युरींवर

0
0
व‌िकासाचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या या संकल्पनांवरच हल्ला चढव‌िणाऱ्या डाव्या लोकशाही आघाडीच्या प्रचाराची भ‌िस्त पक्षाचे ज्येष्ठ नेते स‌ीताराम येच्युरी अन् माजी आमदार नरसैय्या आडम यांच्यावरच असणार आहे.

कान्हेरे मैदानात धडाडणार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

0
0
जाहिर सभांसाठी गर्दी जमावताना राजकीय पक्षांच्या नाकीनऊ येते. त्यातच ती जागा अनंत कान्हेरे मैदान असेल तर सभेच्या भाषणापेक्षा तेथील गर्दीच्या आकड्यांचीच अधिक चर्चा होते. गर्दी जमविण्यासाठी आव्हान ठरणाऱ्या अनंत कान्हेरे मैदानावर बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींची सभा पार पडली.

खान्देशातील सुंदोपसुंदीचे नाशिकमध्ये उमटणार पडसाद?

0
0
खान्देशात भाजपा-सेनेतील सुंदोपसुंदीचे चव्हाट्यावर आली असून, त्याबाबत थेट मातोश्रीवर तक्रारी करण्याची चढाओढ सुरू आहे. विशेषतः धुळे, चोपडा याठिकाणी युतीत सख्य निर्माण करण्यात पदाधिकाऱ्यांना अपयश येत असल्याने याचे पडसाद नाशिकमध्ये उमटतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images