Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुत्र्यांमुळे हरणांचा जीव धोक्यात

0
0
पाण्याच्या शोधार्थ मानवी वाड्यावस्त्यांकडे भरकटणाऱ्या हरणांच्या पाठीमागे लागलेली मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची साडेसाती कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही. येवला तालुक्यातील पूर्व भागातील रेंडाळे परिसरात गेल्या आठवड्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन हरणांचा बळी गेल्याने वन्यजीवांवरील संकट वाढतच असल्याचे चित्र समोर आले आहे.

दूध उत्पादनाला टंचाईची झळ

0
0
सातत्याने दुष्काळी असणाऱ्या येवला तालुक्याला शेतीपुरक व्यवसाय म्हणून वरदान ठरलेला दुग्ध व्यवसाय टंचाईच्या झळांनी सध्या धोक्यात आला आहे. दुग्ध उत्पादनात तीनपट घट झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

नवरदेवासह तिघांनी केली वधूपित्याची फसवणूक

0
0
मुलीचे लग्न ठरले, लग्नपत्रिका छापतानाच मंगल कार्यालय, बँड, वाजंत्री ठरवले. मुलीचा बस्ता बांधताना मोठा खर्च केला. मात्र, लग्नाच्या तारखेच्या चार दिवस अगोदर नवरदेवाने पाच लाख ५१ हजारांची मागणी केल्याने लग्नच लागले नाही, असा आरोप करत वधूपित्याने पोलिस ठाण्याची पायरी चढून नवरदेवासह तिघांविरुद्ध फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली.

वाहतूक शाखेच्या कारवाईला खाकीचाही ‘हात’

0
0
चेन स्नॅचिंग, वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन्समधील खाकी वर्दीतील कर्मचारीही रस्त्यावर उतरविले जात आहेत. ते देखील वाहनचालकांची तपासणी करताना बेशिस्तांवर कारवाईचा दंडुका उगारत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीसंदर्भातील मोहिमेला बळ मिळाले आहे.

देना बँकेची ९३ लाखांची फसवणूक

0
0
जमिनीचे बनावट अभिलेख आणि दस्तऐवजांच्या आधारे ९३ लाखांचे कर्ज मंजूर करुन देना बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह १८ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

विकासवारी नव्हे; फसवीवारी

0
0
‘नाशिक शहराचा विकास केला’ असे सांगणारे छगन भुजबळांची ही विकास वारी नाही तर ती फसवीवारी आहे, असा घाणाघाती आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी भुजबळांना घरचा आहेर दिला. शेलार यांनी रविवारी समर्थकांचा मेळावा घेत शक्तीप्रदर्शन केले.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कचाट्यात

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी १ हजार ७०० जणांविरोधात प्रतिबंधकात्मक कारवाई केली. यात नगरसेवकासह इतर लोकप्रतिनिधींचा सहभाग मोठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एसीपी कार्यालयात सर्वच पक्षाचे नेते तसेच कार्यकर्त्यांचा वावर वाढल्याचे चित्र होते.

पथनाट्यावर सेनेच्या प्रचाराची भिस्त

0
0
लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या जातात. प्रचाराची एकही संधी वाया न घालवता जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी असे प्रयोग उपयोगी पडतात. शिवसेनेकडूनही लवकरच सहा मतदारसंघांत मोठे बलून सोडले जाणार आहेत. याबरोबर डिजिटल रथ, वासूदेव आणि पथनाट्याद्वारेही प्रचाराचे नियोजन शिवसेनेने केले आहे.

आयुक्तालय कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांपासून फारकत

0
0
शिक्षकांपासून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच निवडणुकीच्या कामाची सक्ती केली जात असताना नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मात्र या राष्ट्रीय कार्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

साडेसहाशे विद्यार्थी मुकले एमसीए एन्ट्रान्सला

0
0
मास्टर इन कम्प्युटर अॅप्ल‌िकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये रविवारी (३० मार्च) नाशिकमधील संदीप फाउंडेशन केंद्रावर गोंधळ झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कागदपत्रातील त्रुटीवरून सुरू झालेल्या या गोंधळाचा शेवट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) परीक्षा बंद पाडून केला.

‘बॉश’ पदाधिकाऱ्याची रुग्णालयात रवानगी

0
0
बॉश कंपनीतील युनियन पदाधिकाऱ्यांचे वेतन करारासाठीचे बेमुदत उपोषण रविवारी (ता.३०) सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिले. पदाधिकारी संदीप दौंड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमृतवृक्षच अमृताच्या प्रतीक्षेत!

0
0
अारोग्यदायी मानला जाणारा अमृतवृक्ष अर्थात कडुलिंबाच्या झाडांची संख्या नाशिक परिसरात घटली आहे. अनेकांना केवळ गुढीपाडव्यालाच त्याची आठवण येते. मात्र, काळानुरूप कडुलिंबाच्या जुन्या वृक्षांचे जतन आणि नवीन रोपट्यांची लागवड आवश्यक बनली आहे.

चिल्ड्रेन पार्कच्या करारातच घोळ

0
0
मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अड‌ीच एकर जागेत साकरण्यात येणाऱ्या चिल्ड्रेन ट्रॅफ‌िक पार्कचा करार करताना प्रशासनाने महापालिकेच्या शाळेची जागा देखील खासगी संस्थेला आंदण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबर नाशिक फर्स्ट संस्थेचा उल्लेख करारात मालक म्हणून करण्यात आल्याने चिल्ड्रेन पार्कच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टर्मिनल दर्शनातून मतदारांना आमिष?

0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी नुकतेच सेवेत आलेले अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलचे दर्शन घडवून आणण्याचा उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. शेकडोंच्या संख्येने शहराच्या विविध भागातील नागरिक (मतदार) टर्मिनलच्या ठिकाणी जात असून, हा प्रकार आमिष देण्याचाच एक भाग असल्याचा आरोप केला जात आहे.

नाशिकचा विकास हाच ध्यास

0
0
याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे आपल्या राज्यात विधानसभेतून लोकसभेत जाण्याची परंपरा आहे. यात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेता येईल. मी गेली ३० वर्षे विधिमंडळात कार्यरत आहे.

महाराष्ट्र तापू लागला!

0
0
सकाळी दहा वाजल्यापासूनच अंगाला चटके देणारे ऊन आणि रात्रीही कायम राहणारा उकाडा यामुळे नाशिककर आता हैराण होऊ लागले आहेत. उन्हातून काही मिनिटे चालल्यासही अंग भाजून निघत आहे. गाडीवरून जातानाही गरम वाऱ्याच्या झळांमुळे घामाच्या धारा लागत आहेत.

पहिल्या मताचं मोल

0
0
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी धडाक्यात सुरू आहे. देशात आपले सरकार आणण्यासाठी काँग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांसह तिसरी आघाडी, आम आदमी पार्टीसारखे पक्ष जिवाचे रान करीत आहेत. पण यापैकी कोणाचेही सरकार आले, तरी यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल ती तरुणाईची आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची.

सीएटमध्ये कामगारांनी पाळला बंद

0
0
बॉश कंपनीपाठोपाठ सीएटमधील कामगारांनीही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पगारवाढीच्या मुद्यावरून गुढीपाडव्याच्या दिवशीच सीएटमधील कामगारांनी बंद पाळला. पगारवाढीचा करार लवकरात लवकर केला जावा, यासाठी कामगार उपायुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी युनियन पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नववर्ष स्वागताचा रंगला सोहळा

0
0
हिंदू पंचांगप्रमाणे सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर तालुका सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सोमवारी गुढीपाडव्यास भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक मराठमोळ्या वेषात सिन्नरकरांनी सहकुटुंब सामील होऊन नवीनवर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नववर्ष स्वागताचे हे तिसरे वर्ष आहे.

नाशकात तेजीची गुढी

0
0
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांत बाजारपेठेत असलेली मरगळ दूर झाली. शहर परिसरात तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक उलाढाल झाली असून यानिमित्ताने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images