Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जलसंपदाच्या आडमुठेपणाचा कॅम्पवासियांना फटका

$
0
0
देवळाली कॅटोन्मेंट बोर्डाने प्रत्यक्ष वापरलेल्या पाण्याचे पैसे अदा केल्यानंतरही जलसंपदा विभाग पाणी सोडत नसल्याने देवळाली कॅम्पचे ५४ हजार नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. लष्करासारख्या महत्त्वाच्या घटकालाही याची झळ बसलेली आहे.

हॉटेलमध्ये हाणामारी, ३ ठार

$
0
0
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे आरती हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि हॉटेल मालकासह तीनजणांचा मृत्यू झाला.

सावधान ! बायपोलर फोफावतोय

$
0
0
अचानक झालेला वागण्या-बोलण्यातील बदल, सतत खाली मान घालून शांत बसणे, निश्चल व अवती-भोवती काय चालू आहे याचे काहीच देणे-घेणे नसणे, तीन-चारदा विचारूनही प्रतिसाद न देणे, अतिउत्साह किंवा औदासिन्य हे दोन्ही लक्षणे दिसणे, म्लान आणि डोळयांभोवती काळी वर्तुळे तयार होणे ही लक्षणे दिसायला लागली की माणूस डिप्रेशनचा बळी पडतो अन् बायपोलर डिसॉर्डरच्या दिशेने जाऊ लागतो.

भाववाढीमुळे मसाला झाला अधिक तिखट

$
0
0
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे खोळंबलेले शेवया, कुरडई, मसाला, वडे बनविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. मात्र, गारपिटीची फटका बसल्याने ग्रामीण भागात या पदार्थांच्या कच्चा मालाच्या खरेदीवर काटकसर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

नुकसानभरपाई द्या

$
0
0
शासनाने नुकसानग्रस्त सर्वच शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून लागवड क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारित नुकसान भरपाई द्यावी, सर्व शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळावी, अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे.

तळवाडे येथील शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

$
0
0
तालुक्यातील तळवाडे परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे कृषी विभागाकडून पंचनामे होऊनही तळवाडे गाव गारपिटीतून वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

पाणीटंचाई आराखड्यात ७८ गावे अन् ३७ वाड्या

$
0
0
मार्चच्या प्रारंभपासूनच येवला तालुक्यातील चिचोंडी गावाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे चिचोंडी गावचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होवून वीस दिवस उलटले तरी अद्याप गावाला टँकर सुरू झालेला नाही.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा

$
0
0
कारसूळ (ता. निफाड) येथील परिसरात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीन वेळेस अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, महसूल विभागाने या भागातील नुकसानग्रस्त सुमारे पाचशे ते सातशे शेतकऱ्यांच्या पिकांचे अद्यापही पंचनामे केलेले नाहीत.

दारूने घेतला तिघांचा बळी

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्याजवळ नाशिक-बलसाड मार्गावरील हॉटेल आरती येथे बुधवारी रात्री ग्राहक व हॉटेल कामगारांची किरकोळ कारणावरून हाणामारीचे वादात रुपांतर झाल्याने तिघांना प्राण गमवावे लागले.

नाशिकला स्मार्ट सिटी बनवणार

$
0
0
सुशिक्षित लोकांनी केवळ राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट राजकारणात येऊन बदल घडवला पाहिजे या राज ठाकरेंच्या विचाराला साद देत आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले.

परिवर्तनाची लाट नाशिकमध्येही आणा

$
0
0
देशात परिवर्तनाची लाट आहे. नाशिकमध्येही ती आणा. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केले. नाशिकरोड येथील पाटीदार भवनमध्ये महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

सत्य‌जितराजेंची बंडखोरी, भामरेंसाठी डोकेदुखी

$
0
0
काँग्रेसचे सत्यजितसिंहराजे गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली असली तरी मराठा फॅक्टरमुळे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनाच मारक ठरणार असल्याचे चित्र आहे.

गर्दीत दर्दी नाही

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर प्रचार सभांनी नाशिकच्या निवडणूक वातावरणाचा दणक्यात शुभारंभ झाला.

गारपिटीने केले हेक्टरावर नुकसान

$
0
0
जिल्ह्यात २४ फेब्रुवारी ते १६ मार्च या काळात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर शेतपिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तराखंड सरकारकडून नवाल कुटुंबियांना मदत

$
0
0
गेल्या वर्षी केदारनाथ येथील प्रलयात बेपत्ता झालेल्या नवाल दांपत्याच्या कुटुंबियांना उत्तराखंड सरकारने आर्थिक मदत दिली आहे. उत्तराखंड सरकारकडून साडेतीन लाख रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. हा धनादेश नवाल कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला आहे.

देवळालीचा पाणीप्रश्न तूर्तास मिटला

$
0
0
जनक्षोभाची दखल घेत जलसंपदा विभाग देवळाली कॅम्पला पाणीपुरवठा करण्यास राजी झाले आहे. गुरुवारी (ता. २७) दुपारी पाण्याचे एक आवर्तनही सोडण्यात आले. मात्र, हे पाणी कॅम्पमध्ये पोहचण्यास शनिवार उजाडणार असल्याने नागरिकांना तोपर्यंत पाणी टंचाईला तोंड द्यावेच लागणार आहे.

प्रभाग समितीत चुरस कायम

$
0
0
महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या १८ उमेदवारांनी गुरूवारी आपले अर्ज सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी झाली असली तरी निवडणुकीत चुरस कायम आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सहा प्रभाग समिती सभापती निवडणूका बिनविरोध करता येतील का? याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू आहे.

टेंडर पास, वर्कऑर्डर नापास

$
0
0
प्राकलन दरापेक्षा २७ टक्के कमी दराच्या निविीदा ४ महिन्यांपासून मंजूर असताना यासंबंधीचे वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने वर्कऑर्डर देण्याचे सोपास्कार आणखी लांबले आहेत. प्रशासनाचा या ढिसाळ कारभाराचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे.

किरकोळ वादातून ‌दिंडोरीत तिघांची हत्या

$
0
0
बारमध्ये झालेल्या वादातून तीन हत्या झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यात घडली. या प्रकरणात बारमध्ये आलेला एक ग्राहक, हॉटेलमालक आणि त्याचा आचारी ​यांचा खून झाला असून दोनशे ग्रामस्थांनी हॉटेलवर हल्ला चढवल्यामुळे या प्रकरणाने तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images