Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ दलालावर कारवाईची टाळाटाळ

$
0
0
वाढत्या राजकीय दबाबाबरोबरच महसूल खात्याचे कर्मचारीही बोगस जातीच्या दाखल्यांच्या रॅकेटमध्ये अडकत असल्यामुळे त्या दलालाचे प्रकरण दडपण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या त्या दलालावर कुठलीही कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गारपिटीमुळे १४ कोटींचे नुकसान

$
0
0
गेल्या वीस दिवसांपूर्वी गारपीट व अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने नुकसानीची पाहणी करून तयार केलेला अहवाल प्राप्त झाला आहे.

शौचालयांच्या दुरवस्थेमुळे महिलांचा ठिय्या

$
0
0
शहराच्या वावी वेस भागातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली या शौचालयांची देखभाल नगरपरिषद करीत नसल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ओझरखेडमधून शनिवारपासून आवर्तन

$
0
0
ओझरखेड कालव्यास शनिवार (दि. २९) पासून किमान पंधरा दिवस आवर्तन देण्याचा निर्णय झाल्याने दिंडोरी, निफाड तालुक्यातील ओझरखेड कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

खरा विकास करून दाखवू

$
0
0
नाशिक शहर जागतिक स्तरावर पोहचले असले तरीही दुसऱ्या बाजू लक्षात घेता इथला विकास अपूर्ण आहे. त्यामुळे काही लोकांनी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अशा लोकांना आपण निवडणुकीत उघड करणार असल्याची भूमिका बसपाचे उमेदवार दिनकर पाटील यांनी मांडली आहे.

मायावतींची आज सभा

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची गोल्फ क्लब मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,१९१ मतदान केंद्र असून, अतिसंवेदनशील असलेल्या १० ते १५ मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.

अन्सारींची वाट बिकट!

$
0
0
धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे एकगठ्ठा मतदानच उमेदवाराचा विजय निश्चित करत असते. मात्र, मुस्लिम व्होटबँकचे विभाजन काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत असते. यावेळी आम आदमी पाटीतर्फे निहाल हारूण अन्सारी हे उमेदवारी करीत आहेत.

बड्या नेत्यांसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

$
0
0
शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचे बडे नेते दाखल होत असल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. या नेत्यांच्या सभा सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क रहावे अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.

भिशीवरून तरुणाची आत्महत्या

$
0
0
भिशीचे ३८ हजार रुपये मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हसीना रज्जाक शेख (४१, रा. गायकवाड चाळ, देवळाली कॅम्प) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा आज संयुक्त मेळावा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत प्रथमच उमेदवारी करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा नारळ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार आहे.

मनसेच्याही प्रचाराचा आज श्रीगणेशा

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील मनसेचा प्रचाराचा नारळ आज सैय्यदपिंप्री येथे फुटणार आहे. मनसेतर्फे नाशिकमधून डॉ. प्रदीप पवार यांना संधी देण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजता सैय्यद पिंप्री येथून डॉ. पवार यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.

मुदलीयार प्रकरणाने वाढली भुजबळांची डोकेदुखी

$
0
0
भुजबळ फार्मच्या गेटजवळच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचीद धमकी देणारा कैलास मुदलीयार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

‘खाविआ’च्या भूमिकेसाठी पवारांची भेट निर्णायक

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मदत करावी की राष्ट्रवादी काँग्रेसला, याबाबत खान्देश विकास आघाडीची (खाविआ)ची भूमिका अद्याप तळ्यात-मळ्यातच आहे. मात्र ‘खाविआ’च्या नगरसेवकांची ‘राष्ट्रवादी’चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत होणारी भेट या दृष्टीने निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

कोण होतास तू, काय झालास तू!

$
0
0
इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. शिवसेनेचे आमदार बबन घोलप हे एका वेगळ्या अर्थाने इतिहास घडविण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने लोकसभेची उमेदवारी तसेच आमदारकीही गमवावी लागल्याने सैरभैर झालेल्या घोलपांनी १९९९ चा फंडा वापरायचा ठरविलेला दिसतो.

आणखी दोन विमान कंपन्या इच्छूक?

$
0
0
जेट एअरवेज या कंपनीने नाशिक विमानतळाची चाचपणी केल्यानंतर अन्य दोन कंपन्यांनीही रस दाखविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एचएएलने हैदराबादच्या एअर शोमध्ये दिलेल्या माहितीनुसारच विमान कंपन्या नाशिककडे आकृष्ट झाल्या आहेत.

ब्रॉडबँडची समस्या संपणार?

$
0
0
शहरातील १४ ठिकाणी ब्रॉडबँडसाठी नकार घंटा वाजविणाऱ्या बीएसएनएलला अखेर केबल प्राप्त होत असून यातील ७ ठिकाणी ब्रॉडबँड देण्यासाठी बीएसएनएलने होकार दर्शविला आहे.

उमेदवारांचे ‘ओह माय गॉड’!

$
0
0
राजसत्ता आणि धर्मसत्ता नेहमी हातात हात घालून चालतात, हा इतिहास आणि वर्तमानही आहे. त्यामुळे बहुतांश बाबा, महाराज, बापूंचा राजकारणी लोकांवर पगडा असतो. आजकाल प्रत्येक महाराजांचा स्वतंत्र संप्रदाय निर्माण झाला असून, त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

बीएसएनएलचे ४ जी २०१५ अखेरीस

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडद्वारे (बीएसएनएल) संपूर्ण महाराष्ट्रात पुढील वर्षा अखेरीपर्यंत मोबाइलवर ४ जीची सेवा दिली जाईल, अशी माहिती मुख्य महाप्रबंधक आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी ते नाशिक दौऱ्यावर होते.

शांतता, इलेक्शन चालू आहे!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख महिनाभरावर आल्याने मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या पक्षांची संपर्क कार्यालये कार्यकर्त्यांनी गजबजू लागली आहेत. मात्र, उमेदवारी करणाऱ्या पक्षांच्या मित्रपक्षात अद्यापही शांतता असल्याचे दिसते. खासकरून काँग्रेससह भाजपच्या संपर्क कार्यालयात तुरळक गर्दी आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images