Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिलिंडरचा अवैध साठा जप्त

0
0
खुटवडनगर भागातील साळुंखे नगरमध्ये सातपूर पोलिसांनी छापा टाकून अनधिकृत वापराचा सिलिंनडरचा साठा जप्त केला. या प्रकरणी सुरेश जैन (वय ५०) याला अटक करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांमध्ये अनधिकृतपणे गॅस भरण्याचे काम तो करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परदेशी संपत्ती येणार उघडकीस

0
0
केवळ भारतातील संपत्तीचा उल्लेख करून काही उमेदवार त्यांच्या परदेशी संपत्तीबाबत मतदारांसह निवडणूक आयोगालाही अंधारात ठेवत असल्याचे लक्षात घेत यंदा उमेदवारांना परदेशी संपत्ती उजेडात आणावी लागणार आहे.

कांदा भावात घसरण

0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावात घसरण होत असून सोमवारी साधारणपणे ९०० ‌क्विंटल आवक झाली. ऊन्हाळ कांद्यास ४०० ते ९७२ रुपये क्विंटल तर सरासरी ७५१ रुपये भाव मिळाली.

राज ठाकरेंच्या सहा सभा

0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या जिल्ह्यात सहा सभा होणार आहेत. जिल्ह्यासाठी राज ठाकरेंचा तीन दिवसांचा दौरा मनसेने जाहीर केला आहे.

​शिर्डीचा निर्णय आज?

0
0
शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले आणि गेले. त्यांच्या दौऱ्यामध्ये शिर्डी मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा असताना ठाकरे यांनी हा निर्णय पुढे ढकलल्याने शिर्डीचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

दिंडोरीत रंगणार चौरंगी लढत

0
0
अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाने अखेर उमेदवार जाहीर केला आहे. येवल्याचे प्रा. ज्ञानेश्वर माळी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरी मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

हिरे उद्या घेणार समर्थनाचा निर्णय

0
0
उमेदवारीच्या आशेने माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे वारसदार अद्वय हिरे भाजपात गेले. मात्र, उमेदवारीने हुलकावणी दिल्याने नाराज हिरे आणि त्यांच्या समर्थकांनी धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला समर्थन द्यावयाचे यासाठी २७ मार्चला मालेगावात निर्धार मेळावा होणार आहे.

माकपच्या उमेदवारांना भाकपचा पाठिंबा

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील माकपच्या उमेदवारांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अखेर पाठिंबा जाहीर केला आहे. भाकपच्या जिल्हा काउन्सिलची बैठक आयटकच्या कार्यालयात मंगळवारी पार पडली. या बैठकीतच हा ‌नियर्णय जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यात ६४ संवेदनशील मतदान केंद्र?

0
0
जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करण्याबाबत निवडणूक शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून, त्यात ६४ केंद्रांचा समावेश आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त बैठकीत घेतला जाणार आहे.

राजकीय पक्षांना परवानगीची अडचण

0
0
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना लागणाऱ्या सर्व परवानग्या एका ठिकाणी दिल्या जातील, अशी घोषणा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात ही व्यवस्था सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांना परवानग्या मिळविण्यात अडचणी येत आहेत.

सेटिंग अन् गेटिंग

0
0
उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा कितपत फलद्रुप झाला, याबाबत मतमतांतरे असली तरी ‘मातोश्री व भुजबळांचे कथित सेटिंग’ या जुन्याच चर्चेने या दौऱ्याला एक वेगळाच कंगोरा मिळाला. सेटिंगचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावला असला तरी शिवसैनि्कांपासून ते सामान्य नाशिककरांपर्यंत विश्वास ठेवणे अवघड झाले आहे.

रंगतदार प्रचारासाठी विविधरंगी मॅस्कॉट

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली नसली तरी यंदाच्या प्रचारात नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा पक्ष व उमेदवारांचा प्रयत्न आहे. पक्ष व उमेदवारांची गरज लक्षात घेत व प्रचाराची रंगत वाढविण्यासाठी बाजारात प्रचार साहित्य विक्रेत्यांनी विविधरंगी मॅस्कॉट(बाहुला) बाजारात आणले आहेत.

निरीक्षक येताच लागले कामाला

0
0
जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेले जागरूकता निरीक्षक नाशकात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व निवडणूक यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. त्यामुळेच मतदारांसाठी हेल्पलाईन, मदत केंद्र यासह विविध बाबी सहज दिसून येत आहेत.

जातीच्या बनावट कागदपत्रांसह दलाल ताब्यात

0
0
सटाण्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर दलालाने थाटलेल्या दुकानावर मंगळवारी महसूल पथकाने छापा टाकून बनावट प्रमाणपत्र हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे. दलालाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून बोगस जातीचे दाखल्यांचे बनविणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

किस्सा ‘आप्पां’चा

0
0
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख महिनाभरावर आल्याने सर्वच उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. यात निवडणूक प्रचारासंबंधीची माहिती विविध परवानग्यांसदर्भात उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना निवडणूक अधिकाऱ्यांकडे जावं लागतंय.

आंदोलनानंतर कांदा भावात सुधारणा

0
0
सटाणा बाजार समितीत सोमवारच्या कांदा २५ पैसे किलोने लिलाव पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर मंगळवारी कांद्याच्या भावात सुधारणा होऊन कमीत कमी सत्तर पैसे किलोने लिलाव पुकारण्यात आला.

वाळूचे सहा ट्रॅक्टर जप्त

0
0
अभोणा शिवारातील गोसराने येथील वाळू लिलावावर बेकायदेशीर वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर कळवणचे पोलिस उपअधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पकडून अभोणा पोलिसात जमा केल्याने वाळू चोरामध्ये खळबळ उडाली आहे. महसूल यंत्रणेचे काम आता कायदा सुव्यवस्था पाहणारे करू लागल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

भरदिवसा शेतकऱ्याचे दीड लाख लुटले

0
0
पिंपळगाव बसवंत येथील रानमळा परिसरात दोन पल्सर मोटरसायकलवर आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने भर दुपारी दावचवाडी (ता. निफाड) येथील एका शेतकऱ्याची सुमारे एक लाख साठ हजार रुपयांची लूट केल्याने शेतकरी, व्यापारी यांच्यासह परिसरात घबराट पसरली आहे.

बॅच बनविण्याचा छंदच बनला व्यवसाय

0
0
येवला शहरातील उत्साही व होतकरू तरूण मुकेश लचके यास प्रारंभपासून चित्रकलेची आवड होती. कलादृष्टी असलेल्या मुकेशला रंगीबेरंगी बॅचेस (बिल्ले) तयार करण्याचा छंद जडला. हा छंद बघता बघता व्यवसाय कधी बनला हे त्यालाही कळाले नाही.

द्वारका चौक घेणार मोकळा श्वास!

0
0
चुकीच्या नियोजनामुळे अपघातप्रवण झालेला द्वारका चौक काही प्रमाणात मोकळा श्वास घेणार आहे. या चौकातील वादग्रस्त वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images