Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सप्तरंगात रंगले नाशिककर

$
0
0
कुठे पारंपरिक रहाडीत एकमेकांना डुबविण्यासाठी सुरू असलेली चढाओढ तर कुठे डीजेच्या तालावर थिरकत अंगावर रंगीत पाण्याचे फवारे झेलणारे अबालवृध्द अशा जल्लोषमय वातावरणात शहरात शुक्रवारी रंगपंचमीचा सण उत्सवात साजरा झाला.

सभांची रणधुमाळी

$
0
0
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, आम आदमी पक्षाच्या समन्वयक अंजली दमानिया, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल अशा मातब्बरांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचवेळी मराठवाडा, अहमदनगर येथे शरद पवार, मेधा पाटकर यांच्या प्रचारसभांची रणधुमाळी सुरू होती.

घोलपांना आणखी एक धक्का

$
0
0
माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांना शुक्रवारी सेशन्स कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे नेते प्रेमानंद रुपवते यांच्यात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी स्पर्धा लागली आहे.

​नाशकात मनसेचे कार्यालय झाकले

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सत्ताधारी व विरोधक अशा सुंदोपसुंदीलाही सुरुवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता सर्व पक्षांना लागू असताना केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन मनसेला टार्गेट करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

बुरा ना मानो...

$
0
0
काही लोकांना रंगांची फारच अॅलर्जी असते. पण कधीतरी त्यांचा चांगलाच पोपट होतो. असेच किस्सा परवा रंगपंचमीला झाला. शहरात विविध मंडळांकडून रंग खेळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धक्के पे धक्का

$
0
0
आजपासून बरोबर महिन्याने नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. नाशकात षटकोणी, दिंडोरीत त्रिकोणी तर धुळ्यात कदाचित चौरंगी लढत होईल. आगामी तीस दिवसांत भारताचे राजकीय भवितव्य घडविणाऱ्या मुद्यांची घुसळण होईल. या मंथनातून जे काही बाहेर येईल, त्याचा फैसला पावणेदोन महिन्यांत होईल.

‘वसंतस्मृती’ला मिळणार झळाळी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कार्यालय सज्ज होत असताना एनडी पटेल रोडलगतचे ‘वसंतस्मृती’ हे भाजप मध्यवर्ती कार्यालयही कात टाकत आहे. काळानुरुप बदलानुसार कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेत भाजपतर्फे या मध्यवर्ती कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

आयुक्तांविरोधात आणखी तीन तक्रारी

$
0
0
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याविरोधात आणखी तीन तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.

बारा हजार नव्या मालमत्ताधारकांची नोंद

$
0
0
मालमत्ता कराला इमारत पूर्णत्व दाखल्याशी संलग्न केल्यापासून महापालिकेकडे नवीन १२ हजार ३८४ मालमत्ताधारकांची नोंद झाली आहे. यंदाच्या (२०१३-१४) आर्थिक वर्षापासून इमारत पूर्णत्व दाखला आणि मालमत्ता कराची सांगड घालण्यात आली असून, याचा महसूल वाढीला कितपत फायदा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युवतीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

$
0
0
कॉलेजरोड येथील एका हॉटेलमध्ये युवतीचा विनयभंग करण्यात आला. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. एका १७ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार वत्सल भरत कोटेचा व त्याच्या मैत्रिणीवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाडा कोसळल्याने मुलगा जखमी

$
0
0
सराफ बाजार येथील एका पडक्या वाड्याचा काही भाग रविवारी सायंकाळी कोसळला. त्यामध्ये एक मुलगा जखमी झाला असून तो खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी

$
0
0
वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आरोपी आडगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

निकृष्ट कोळशाने एकलहरेत बिघाड

$
0
0
एकलहऱ्याच्या औष्णिक वीज केंद्रातील दोन संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने नॅशनल ग्रीडला होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. राज्यातील औष्णिक केंद्रांना होत असलेला निकृष्ट दर्जाच्या कोळश्यामुळे ही परिस्थिनती उद्भवत असून संपूर्ण राज्यात ८ संच बंद पडले आहेत.

पिंपळगाव बसवंतमध्ये कर वसुलीची धडक मोहीम

$
0
0
मार्च महिना संपत आला तरी नागरिकांकडून कर भरण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने शनिवारपासून (दि. २२) धडक वुसली मोहीम हाती घेतली आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे.

‘जीपीआरएस’मुळे इनोव्हासह चोर ताब्यात

$
0
0
पुण्यातून शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवलेली इनोव्हा कार अवघ्या पावणे पाच तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. येवला पोलिसांनी इनोव्हासह आरोपीला ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या हवाली केले. इनोव्हामध्ये बसविलेल्या 'जीपीआरएस' प्रणालीमुळेच वाहन अन चोरट्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले.

हुतात्मा चौक रस्त्याची चौकशी करा

$
0
0
सिन्नर शहरात नगरपालिकेकडून सुरू असलेल्या कॉँक्रिटीकरण काम निकृष्ट होत असल्याची तक्रार नगरपालिकेतील विरोधी गट असलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या रत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही विरोधी गटाने केली आहे.

कन्टेनरच्या धडकेने टँकर पेटला

$
0
0
विमानाचे इंधन घेऊन जाणारे टँकर आणि कन्टेनर यांच्यात झालेल्या अपघातात टँकरने पेट घेतला. यामुळे राज्य महामार्गावर चार तास अग्नितांडव सुरू होते. या भीषण आगीत दोन वाहनांसह चार मोटसायकली जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

हम साथ साथ है!

$
0
0
धुळे मतदारसंघात हिंदू् व मुस्लिम समाजाची मोठी व्होट बँक आहे. यामुळे दोन्ही समाजांना बरोबर घेऊन चालणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चितच होतो. मात्र, प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही समाज कधीही एका उमेदवाराच्या पाठिशी उभे राहिले नाहीत.

देवळाली मतदारसंघात अस्वस्थता अन् उत्सुकताही!

$
0
0
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री व देवळाली मतदारसंघाचे आमदार बबन घोलप यांना एक लाखाच्या दंडासह तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आल्याने घोलप यांच्या राजकीय कारकीर्दीपुढे संकट निर्माण झाले आहे.

अल्पसंख्यांक ठरविणार नंदुरबारचा खासदार

$
0
0
काँग्रेससाठी राज्यातच नव्हे, तर देशात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नंदुरबार मतदारसंघात सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्यासमोर डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images