Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदा, गव्हाचे उत्पादन घटणार

0
0
नैसर्गिक आपत्तीने सलग दोन वर्षे संकटाशी मुकाबला करणारा तालुक्यातील बळीराजा यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फटक्याने उद्ध्वस्त झाला आहे. वातावरणातील बदलामुळे राहिला साहिला कांदाही करप्याचा बळी ठरल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

टँकरची वाटचाल पन्नाशीकडे

0
0
गारपीटीनंतर तापमानाचा पारा चढू लागल्याने पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही निर्माण होतो आहे. ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा केला जात असून, टँकरची संख्याही पन्नाशीकडे झेपावत असल्याचे दिसून येत आहे.

जगातील सर्वांत छोटी सायकल नाशिकमध्ये

0
0
अवघ्या दहा इंचाची अन् तब्बल ८० क‌िलोंचे वजन वाहून नेणारी सायकल केवळ हॉलिवूडपटांमध्ये बघण्यास म‌िळेल, असे वाटतेय ना! पण नाही, औरंगाबादच्या इंज‌िनीअरिंग शाखेतील व‌िद्यार्थ्याने अशी सायकल अस्त‌ित्वात आणली आहे. ही सायकल जगातील सर्वात छोटी सायकल असल्याचाही त्याचा दावा आहे.

माजी क्रिकेटपटू आघारकर यांचे निधन

0
0
नाशिक जिमखान्याचे ८० च्या दशकातील मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आणि लेग स्पिन गोलंदाज अविनाश आघारकर (५७) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास निधन झाले. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकी गोलंदाज सलिल आघारकर याचे ते वडील होत.

येवल्यातील रंगोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा

0
0
ऐतिहासिक, सांस्कृतीक व धार्मिक परंपरा असणाऱ्या येवला शहरातील रंगोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. रंगपंचमी निमित्ताने रंगांची उधळण करत रंगणारे रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट! रंगपंचमीला अगदी सकाळपासूनच शहरात रंग खेळण्याला सुरुवात होते.

नैसर्गिक रंग वापरण्यावर भर

0
0
होळीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याबाबत जागरूकता वाढत असून, तरुणांना रासायनिक रंगांचे दुष्परिणाम आणि नैसर्गिक रंगांचे महत्त्व समजू लागले आहे.

खलनायक हूं मै

0
0
आपल्या नेत्यांचे वाढदिवस आणि समारंभ हे डीजेच्या तालाशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात ही गाणी जोरजोरात सुरू असतातच. पण अनेकदा ही गाणी प्रचाराऐवजी अपप्रचारही करु शकतात.

रंगपंचमी खेळा दणक्यात

0
0
रंगांचा उत्सवाचा आनंद सर्वांनीच घ्यावा. परंतु हा आनंद लुटताना इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले.

राज्यातील न्यायाधीश दोन दिवस नाशकात

0
0
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शनिवारी 'ज्युडीशियल सर्व्हिस अॅज अ करीयर' या मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी राज्यभरातील न्यायाधीश नाशिकमध्ये दाखल होत असून रविवारपर्यंत त्यांची विशेष परिषद येथे होणार आहे.

उद्धव ठाकरे १८ एप्रिलला शहरात

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठकारे १८ एप्रिल रोजी शहरात दाखल होणार आहेत. ठाकरे यांच्या सभेनंतर अवघ्या पाच दिवसानंतर मतदान प्रक्रीया पार पडणार असून शिवसैनिकांनी या सभेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.

​धुळे मतदारसंघात जनतेला हवा आहे बदल

0
0
जनता प्रस्थापित राजकारण्यांना वैतागली आहे. जनतेला बदल हवा असून या निवडणुकीत हा बदल निश्चितच होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार निश्चितच विजयी होईल, असा विश्वास `आप`चे समन्वयक राहुल भारती यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे संसार सावरण्यासाठी पुढाकार

0
0
गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांचे संसार उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

​भाजपचा मेळावा विनापरवानगी?

0
0
भाजपच्या जिल्ह्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा नुकताच पार पडला असला तरी या मेळाव्याला आचारसंहिता कक्षाकडून कुठलीही परवानगी घेण्यात न आल्याने तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भाजप शहराध्यक्षांना पत्र पाठविले आहे.

​मनसे कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

0
0
आचारसंहिता लागू असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मुंबईनाका येथे युवक मित्र मंडळाचा अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

​मायावतींची पुढील आठवड्यात सभा

0
0
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची सभा नाशिकमध्ये पुढील आठवड्यात होत आहे. राष्ट्रीय नेत्याची या निवडणुकीतील पहिलीच सभा नाशकात होत असल्याने निवडणुकीचा धुराळा या सभेपासून उडण्याची चिन्हे आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस

0
0
लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत गोंधळ निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी माकपचा मोर्चा

0
0
जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी माकपाने शहरातून मोर्चा काढला होता. गोल्फ क्लब येथून मोर्चाला गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमाराला सुरुवात करण्यात आली.

खडसे-महाजन ठिणगीचा विद्यमान खासदारांनाच ‘चटका’!

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या भाजप प्रवेशावरून विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेश उपाध्यक्ष गिरीष महाजन या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलेले आहे.

गोरक्षणासाठी ‘उज्ज्वल’चा पुढाकार

0
0
दरवर्षी कमी होणारा पाऊस, सातत्याने दुष्काळाचे सावट, चारा व पाणी टंचाई यामुळे शेतकऱ्यांना आता पशुधन सांभाळणे कसोटीचे ठरत असून ग्रामीण भागात आता पशुधन कमी होत आहे.

‘मोहन’साठी कृतज्ञता दिन

0
0
अस्मानी संकटाला सामोऱ्या जाणाऱ्या बळीराजाने कृषीधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली असून अर्जून देवराम जाधव या शेतकऱ्याने चक्क आपल्या घोड्याचे श्राध्द करण्याचे निश्चित केले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images