Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

म्हणे, आचारसंहिता सुरू आहे!

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने राजकीय पदाधिकारी आणि पक्षांचे झेंडे, बॅनर्स, फलक काढण्याचे काम केले जात असले तरी वाहनांवरील वेगवेगळ्या स्टिकर्सचा प्रशासनाला सर्रास विसर पडला आहे.

CCTVची ‘तळीरामां’कडे नजर

$
0
0
निवडणुकीचा काळ म्हटला की मतदारांना उमेदवारांकडून विवि‌ध प्रकारची प्रलोभने दाखविली जातात. यात पैश्यांबरोबरच मद्याचाही वापर होतो. तोच रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मद्यनिर्माते आणि विक्रेत्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली आहे.

मतदानाचा टक्का वाढणार?

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघे ५० टक्के मतदान झाले असल्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढणार की तेवढाच राहणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यातही निवडणुकीसाठी काम करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्ष मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काय मदत करतात, हा ही महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

नाशिकरोडला ६ वाहने जाळली

$
0
0
नाशिकरोड परिसरात अज्ञात समाजकंटकांनी धुमाकूळ घालत सहा वाहनांची जाळपोळ केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, शहरात गुन्हेगारांचे वर्चस्व असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

गणेश भंडारेचे असेही कारनामे

$
0
0
घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेला गणेश भंडारे अखेर गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून सुमारे सात लाख रुपये किमतीचे चोरीचे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पंचवटी एक्सप्रेस पुन्हा लेट

$
0
0
पंचवटी एक्सप्रेसला उशीर होण्याचा सिलसिला अजूनही जारीच आहे. मालगाडीचे इंजिन बिघडल्याने नाशिकरोड स्थानकावर आज, बुधवारी पंचवटी तब्बल एक तास उशिरा आली. त्यामुळे नोकरदारांचे व अन्य प्रवाशांचे मोठे हाल झाले.

उड्डाणपुलाखाली मिळते आहे अपघाताला निमंत्रण

$
0
0
नाशिकरोडच्या वीर सावरकर उड्डाण पुलाखालील संरक्षक जाळ्या अनेक ठिकाणी काढण्यात आल्याने महामार्गावर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्याही जीवाला धोका संभावत आहे. पुलाखालील बेकायदा छोटे मार्ग बंद करण्याची मागणी होत आहे.

बालउद्यान नव्हे, मद्यपींचा अड्डा

$
0
0
सिडकोत गणेश चौकात असलेले स्टेट बँक बालउद्यान मद्यपींचा अड्डाच बनले आहे. उद्यानात बसविण्यात आलेली खेळणीही तुटली असून, मद्यपी तसेच टवाळखोरांनी उद्यानाच्या संरक्षक जाळ्या चोरून नेल्या आहेत. महापालिकेची यंत्रणा व संबंधित ठेकेदारही उद्यानाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

वहिवाट बंद झाल्याने नागरिक अडचणीत

$
0
0
जेलरोड, कॅनॉलरोड परिसरात असलेल्या शाहूल पॉईंट कॉलनीतील नागरिकांचा रस्ता शेजारील बिल्डरने बंद केल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

दोन दिवसांत अहवाल द्या!

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असतानाही खत प्रकल्पाचे टेंडर प्रसिद्ध झाल्याप्रकरणी दोन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांना दिले आहेत. त्यामुळे या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अभ्यास पक्षांचा

$
0
0
निवडणुका जाहीर झाल्यापासून कोण निवडून येणार यावर चौकाचौकात चर्चा रंगू लागल्या आहे. कोणाचे पारडे जड, कोण वेळेवर बाजी मारणार यावर गटागटाने चर्चा होत आहे. काहींच्या मते इंजिन जोरात धावेल, काहींच्या मते घड्याळाच्या काट्याला कुणी थांबवू शकणार नाही.

धान्याच्या दरात विक्रमी वाढ

$
0
0
बेमोसमी पावसाचा फटका उभ्या पिकांना बसला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत धान्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या धान्यांचे दर चढ झालेले दिसून येत आहेत. तर आगामी काळात ते दर चढे असतील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

‘राष्ट्रवादी’वर गुन्हा दाखल होणार

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसांनीच राष्ट्रवादी काँग्रेसने त्रिमूर्ती चौकात काढलेली रॅली विनापरवाना असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे रॅली काढणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

‘उडनखटोल्या’चा वधारला भाव!

$
0
0
उडनखटोला अर्थात हेलिकॉप्टर व इलेक्शनचे गेल्या काही वर्षांत घनिष्ठ संबंध बनला आहे. किंबहुना हेलिकॉप्टरच्या वापराशिवाय सध्या इलेक्शनचे दौरेच पूर्ण होत नाही. इलेक्शनचा फड रंगात येवू लागल्यानं अर्थातच स्टार प्रचारकांना घेवून येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या घिरट्याही वाढणार आहेत.

चित्ररथातून धावणार पक्षांचा प्रचार

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली प्रचार यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला असून, नाशिकरोड परिसरातील संदिप सोनार (रंगलहरी) यांच्याकडे सर्व पक्षांचे चित्ररथ तयार झाले आहेत.

सटाण्यात बंद ‘वार’ वरून व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष

$
0
0
सटाणा शहरातील बाजारपेठ आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या वरून व्यापारी असोशिएशन आणि महासंघ विरुध्द व्यापारी असा संघर्ष पेटला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय हाणून पाडत बाजारपेठ सुरूच ठेवली होती.

गारपिटीच्या भीतीमुळे कमी भावात द्राक्ष विक्री

$
0
0
मुसळधार पाऊस व गारपिटीनंतर पिंपळगाव बसवंत परिसरात द्राक्ष तोडणी जोमाने सुरू झाली असली तरी गारपिटीनंतर द्राक्ष भावात मोठी घसरण झाली होत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सिन्नरफाटा जाळपोळ : तिघांना अटक

$
0
0
सिन्नरफाटा येथील वाहनांच्या जाळपोळप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली आहे. नेहे मळा, जुना ओढा रोड या ठिकाणी सोमवारी रात्री दीडच्या सुमारास दोन ट्रक, रिक्षा, दोन अपे व मोटारसायकल पेटविण्यात आल्या होत्या.

वाहन जाळपोळीद्वारे बदनामीचा कट

$
0
0
नाशिकरोड परिसरात झालेल्या वाहन जाळपोळद्वारे सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा कट रचण्यात येत असल्याचा आरोप करत खासदार समीर भुजबळ यांनी जाळपोळ प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मतांसाठी होतेय जातीचे राजकारण

$
0
0
छत्रपती शिवरायांनी समाजातील जातीय मतभेद संपुष्टात आणण्यासाठी सर्व जाती, धर्मांना एकत्र आणून स्वराज्य साकारले. मात्र, हल्लीच्या राज्यकर्त्यांनी मतांच्या राजकारणासाठी समाजात जातीचे विष पेरले असल्याची टीका छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांनी केली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images