Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाश‌िककरांना गवसणार प्रेरणेचा स्त्रोत

$
0
0
केवळ प्रबळ इच्छाशक्ती आण‌ि तीव्र च‌िकाटीच्या जोरावर डोळसांनाही लाजवेल, अशी प्रगती साधणारे उद्योजक भावेश भाटिया यांच्या संवादाचा उपक्रम उद्या (द‌ि. १५) पार पडणार आहे.

पंचवटी ‘लेट’, प्रवाशांचा उद्रेक

$
0
0
सर्वसामान्यांची आणि चाकरमान्यांची रेल्वेगाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला सातत्याने उशिर होत आहे. आजही त्याची पुनरावृत्ती झाल्याने संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांनाच घेराव घातला.

मुक्त विद्यापीठाचे उद्या पदवीदान

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व‌िसाव्या पदवीदान समारंभाचे आयोजन उद्या (द‌ि. १५) दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे.

मोफत डाउनलोडिंगचा ‘अॅपअड्डा’!

$
0
0
स्मार्टफोनसाठी लागणारे विविध प्रकारचे अॅप्स इंटरनेटशिवाय प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता आले तर? हे आता अशक्य नाही. कारण, त्यासाठी भारतासह जगाच्या बाजारात लवकरच येत आहे ‘अॅपअड्डा’.

थैमान सुरूच

$
0
0
गेल्या दोन आठवड्यांपासून बेमोसमी पाऊस व गारपिटीच्या माऱ्याने हवालदिल झालेल्या नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला गुरुवारी पुन्हा वादळी वारे, पाऊस व गारपीट या तिहेरी आपत्तीने तडाखा दिला.

तुम्ही बोला, आम्ही ऐकतोय

$
0
0
म्हणतात वक्ता दशसहस्त्रेषु परंतु तो त्या तोडीचा असेल तर या उपमेला अर्थ आहे. एखाद्याला मात्र व्यासपीठ मिळालं व तो जरासा अविचारी असला तर तो काय बोलेल ते सांगता येत नाही बरं त्याच्या हेदेखील लक्षात येत नाही की तो समोरच्याचा अपमान आहे.

ऑनलाइन शॉपिंगकडे वाढला कल

$
0
0
सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढलेला दिसतो. याचं मुख्य कारण म्हणजे डिस्काउंट, ऑफर्स, वेळेची बचत, नवे ब्रँड आणि घरपोच वस्तू मिळण्याची हमी. मात्र, अशा प्रकारची शॉपिंग करताना फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

शिवजयंतीवर आचारसंहितेचे सावट

$
0
0
शिवजयंतीचा उत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला असला तरी आचारसंहितेमुळे यंदा हा उत्सव जल्लोषात साजरा करता येऊ शकेल की नाही याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रम आहे. शिवजयंतीवर आचारसंहितेचे सावट असल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता असून साधेपणानेच हा उत्सव साजरा होण्याची शक्यता बळावली आहे.

बंद सोनोग्राफी केंद्रामुळे रुग्णांची हेळसांड

$
0
0
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र कित्येक दिवसांपासून बंद असून यासाठी उपलब्ध असणारा निधीही पडून आहे. सर्व आधुनिक साधनसामग्री धूळखात पडून असताना जिल्हा प्रशासनाला कुणी सोनोग्राफी तज्ज्ञ मिळालेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

जोरण फाट्याजवळ आढळले बछडे

$
0
0
सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील जोरण फाट्याजवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले. ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना आढळलेले हे बछडे वनविभागाच्या अधिका-याकंडे सुपूर्द करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या घेरावामुळे उडाला गोंधळ

$
0
0
गारपीटग्रस्त भागाची पाहणी आणि पीडित शेतक-यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा तीन शेतक-यांची भेट वगळता बंद काचेच्या कार मधूनच झाल्याने केवळ फार्स ठरला. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागाकडे पथक फिरकलेच नसल्यामुळे त्या भागातील शेतक-यांनी पथकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ उडाला होता.

हत्याप्रकरणी तिघांना कोठडी

$
0
0
पंचवटीत प्रवीण उर्फ समीर सुरेश हांडे (२४, रा. शिवनगर, कोठारवाडी) या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अमोल चांगले, विनोद उर्फ पप्पू खैरे (रा. गणेशवाडी) आणि प्रवीण कुमावत (रा. क्रांतीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

कॅरीबॅग विरोधात कारवाईचा बडगा

$
0
0
पर्यावरणास घातक ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग बाळगणाऱ्या दोघा व्यवसायिकांविरोधात महापालिकेने कारवाई करीत दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. गुरूवारी रविवार कारंजा भागात ही कारवाई करण्यात आली.

... अन् ‘आप’ झाले परके

$
0
0
आगामी न‌िवडणुकीच्या पार्श्वभूम‌ीवर न‌िवडणूक अध‌िकाऱ्यांनी पक्ष प्रत‌िन‌िधींना बोलावून आचारसंह‌ितेचे धडे द‌िले. मात्र, यातून या अध‌िकाऱ्यांना आम आदमी पार्टीचा व‌िसर पडल्याने ‘आप’च परके ठरले आहे.

पवार, मुख्यमंत्र्यांचाही दौरा रद्द

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पदाधिकारी मेळावा रद्द करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ आलेली असताना शेतकऱ्यांच्या टिकेला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी मेळावे, दौरे रद्द करत आहेत.

होर्डिंग्ज विरोधात कारवाई सुरूच

$
0
0
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुरू केलेली होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई आणखी काही काळ कायम राहणार आहे. शहराचे बकालीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे होर्डिंग्ज पूर्णतः हटविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

७८६ नळ कनेक्शन सील

$
0
0
नोटिसा बजावूनही पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ७८६ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले आहेत. आतापर्यंत ५, ८६३ थकबाकीदारांना नोटीसा महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत.

पेस्ट कंट्रोलला मुदतवाढीचा डोस

$
0
0
मागील सहा महिन्यांपासून पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येत आहे. नवीन ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनाने तीनदा निविदा प्रकिया राबविली. तिसऱ्या निविदा प्रक्रियेची मुदत १९ मार्चपर्यंत आहे. मात्र यावेळेसही काही निर्णय होण्याची शक्यता नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

देवळाली कॅम्पच्या रस्त्याचे तीनतेरा

$
0
0
नाशिकरोड ते देवळाली कॅम्प रस्त्याचे तीनतेरा वाजले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पडून अनेक वाहनचालक जखमी होत असून नाशिक महापालिकेने व कंन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आयुक्तालय स्वागत कक्ष वाऱ्यावर

$
0
0
पाच जिल्ह्यांचा कारभार ज्या विभागीय कार्यालयातून होतो त्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कधीकाळी आयएसओ ९००० मानांकन असलेल्या कार्यालयाची सध्या मात्र दुरवस्था झाली आहे. पाचही जिल्ह्यांतून प्रशासकीय कामासाठी येथे नागरिक येतात परंतु या कार्यालयाचे ओंगाळवाणे रूप पाहून आपली ग्रामपंचायत यापेक्षा चांगली, अशी मनोधारणा नागरिकांची होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images