Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ऑटो परम‌िट हवंय ? दलाली द्या !

0
0
ऑटो परम‌िट वाटप प्रक्रीयेत दलालांचा हस्तक्षेप वाढला असून त्यांना रोखण्यासाठी आरटीओचे अधिकारी सरसावले आहेत. रिक्षांचा तुटवडा, अर्ज छाननीची जवळ आलेली अंतिम मुदत या पार्श्वभुमीवर त्वरीत काम करून देण्यासाठी लाभार्थीकंडून अधिक पैसे उकळण्याचा ‘उद्योग’ दलालांनी उघडला आहे.

लाखाचे झाले बारा हजार

0
0
उराशी बाळगलेले स्वप्न डोळ्यांसमोर उदध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची आता चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. कर्ज फेडण्याचे आव्हान, कुटुंबाचा रहाटगाडा चालण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि नुकसान झालेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

नुकसानभरपाईसाठी निवेदनांचा खच

0
0
दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटनंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षीय संघटनांनी भरपाईच्या मागणीसाठी तहसीलवर अक्षरश: निवेदनाचा पाऊस पाडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्मानी संकट कोसळल्यामुळे अनेक राजकीय पुढारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करुन बळीराजाच्या भावनेला हात घालत आहेत.

साड्या चोरणारी टोळी गजाआड

0
0
नाशिकरोडला साड्यांची दुकान फोडणारी टोळी व या टोळीकडून स्वस्तात साड्या घेणारी महिला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतली. जेलरोडच्या डावखरवाडीतील प्रकाश वसंत डावखर यांचे डॉ. आंबेडकर रोडवर दुर्गा टेक्सटाईल हे साड्यांचे दुकान आहे.

काही मिनिटांतच संपलं सारं…

0
0
पेरेल ते उगवेल का, अन् उगवेल ते विकेल का? अशा परिस्थितीत शेतकरी म्हणून जगत असतानाच निसर्ग कोपला. वर्षभर कष्ट करून जोपासलेली द्राक्षबाग गारपिटीने भुईसपाट झाली आणि त्याचा धक्का सहन न होऊन करंजगाव येथील माधव कोंडाजी गोरडे (६२) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

भुजबळांना घातली टोपी

0
0
निवडणुकांचा फ‌िव्हर जसजसा वाढू लागलाय, तसतशी प्रत्येकाच्या तोंडी केवळ पक्ष अन् उमेदवारांचीच चर्चा रंगते आहे.

क्रिकेट के ल‌िए कुछ भी !

0
0
क्रिकेट म्हणजे तरुणाईचा जीव की प्राण. पण, यंदा टी-२० वर्ल्डकप दरम्यान विद्यार्थ्यांना नेमक्या परीक्षा, प्रॅक्ट‌िकल्स यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच धामधूम असणार आहे ती लोकसभा निवडणुकीची.

तहसिलदारांकडून आयुक्तांची चौकशी

0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे नाशिक महापालिका आयुक्तांनी उल्लंघन केल्याप्रकरणाची नाशिक तहसिलदारांकडून चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणाची चौकशी करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.

पालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन?

0
0
घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांची वसुली करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण जोर लावला असून सातपूर विभागातील १८ कर्मचाऱ्यांचे वेतन कामचुकारपणा केल्याच्या आरोपावरून दोन महिन्यांपासून रोखण्यात आले आहे.

ठाकरेंचे नाशिककडे विशेष लक्ष

0
0
नाशिककडे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष असून शिवसेनेने एकजुटीने काम करून माझगावची पुनरावृत्ती करावी, असे आदेश शिवसेनेचे संपर्कनेते रविंद मिर्लेकर यांनी दिलेत.

सिव्ह‌िलच्या ओझ्यामुळे ‘सुपर’चा विक्रम

0
0
सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमधील सिटी स्कॅन मशीन गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद आहे. यामुळे येथील पेशंटना सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमधून सिटी स्कॅन करावे लागते. ही जबाबदारी आणि कामाचे ओझे पेलत ‘सुपर’च्या रेडिओलॉजी विभागाने अकरा हजार ‌सिटीस्कॅन व सोनोग्राफी विभागाने आतापर्यंत साडेनऊ हजार सोनोग्राफी पूर्ण केल्याने शासकीय आरोग्य सेवेतील हा विक्रम मानला जात आहे.

भाजलेल्या दोघींचा मृत्यू

0
0
वेगवेगळ्या घटनांमध्ये भाजलेल्या महिलेसह दोघांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. भादर रामचंद्र निकम (३८, रा. संसारी गाव) हे बुधवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी ४० टक्के भाजले.

केंद्रीय पथकाचा आज गारपीट पाहणी दौरा

0
0
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक शुक्रवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या पथकाने गुरुवारी धुळ्याचा दौरा केला असून शुक्रवारी नाशकात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही होणार आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री उद्या नाशिक दौऱ्यावर

0
0
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर शनिवारी येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

सहा जणींची सुटका

0
0
ठाणे येथील डान्सबारवर कारवाई करण्यात आल्यानंतर वात्सल्य शासकीय महिला वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या महिलांपैकी ६ जणींची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित १७ महिलांना सोडण्यासंदर्भातील आदेश २० मार्चपर्यंत होणे अपेक्षित असून त्यानंतर या महिलांनाही सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॉम्बिंगमध्ये सापडले ४० आरोपी

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस स्टेशन्सच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मोबाइल विकणारी टोळी जेरबंद

0
0
हरवलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणजे आयएमईआय क्रमांक. परंतु, हा क्रमांकच बदलून मोबाइल विकणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने बुधवारी जेरबंद केले.

मनसे नगरसेवक कोंबडेंवर गुन्हा दाखल

0
0
घरांवर बेकायदेशीररित्या जेसीबी ‌फिरवून काही लोकांना बेघर करण्यात आल्याचा प्रकार पाथर्डी गावात गुरूवारी (ता.१३) सकाळी घडला. या प्रकरणी मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्यासह १२ जणांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काश्मीरमधील हिमवृष्टीत नाशिकचा जवान सुरक्षित

0
0
काश्मीरमध्ये विविध ठिकाणी जोरदार हिमवृष्टी... दोन जवानांसह ११ जणांचा मृत्यू, कुँपवाडात अतिरेक्यांचा हल्ला... अशा दोन `ब्रेकींग न्यूज` जवान नवनाथ दत्तात्रय फापळे यांच्या कुटुंबियांनी पाहिल्या आणि त्यांच्या छातीत धस्स झाले.

काका, आमचे गार्डन दुरुस्त करून द्या!

0
0
सिडकोतील रायगड चौकातील शिवनेरी गार्डन दुरुस्त करून सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी परिसरातील बच्चे कंपनीने थेट महापालिकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांना साकडे घातले. बच्चे मंडळीने गोसावी साहेबांना घेराव घालून आपली कैफियत मांडली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images