Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...म्हणून मराठा आरक्षण लांबले

0
0
‘मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले असताना केवळ सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या दबावामुळे राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले नाही’ असा आरोप करत आमदार विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे.

पालिकेकडून आचारसंहितेचा भंग

0
0
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने खतप्रकल्पाचे खासगीकरण तसेच पे अॅण्ड पार्कसंबंधी ठेका देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असून हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

किल्लारी भूकंपापेक्षा गंभीर स्थिती

0
0
गारप‌िटीने झालेली हानी ही किल्लारीच्या भूकंपापेक्षा जास्त भयानक आहे. त्यामुळे गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, असे मत सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. गारप‌िटीने जैवविविधतेचीही प्रचंड हानी झालेली आहे.

आता घरेही होणार चायनामेड

0
0
मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ काबीज केल्यानंतर चीनने भारतातील इतरही अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. दिवाळीतील आकाशकंदिलांपासून ते पतंगांपर्यंत आपले हात पोहचवतानाच चीनने आता ‘मॉड्युलर बिल्डिंग’साठीही भारतीयांना स्वस्त मटेरियल द्यायला सुरूवात केली आहे.

‘आम आदमी’च घालणार भ्रष्टाचाराला आळा

0
0
‘आपल्या देशात जी घराणेशाही चालते त्यामुळे आपल्याकडील तरूणांना राजकारणात संधी मिळत नाही. ही संधी तुम्हाला आम आदमी पक्ष मिळवून देईल. आपला देश हा भ्रष्ट व्यवस्थेत अडकला आहे, त्याला त्यातून मुक्त करण्याचे काम आपल्याला करायचे आहे’, असे मत ‘आप’चे उमेद्वार विजय पांढरे यांनी व्यक्त केले.

पोलिसांची वेबसाइट आळसावलेली

0
0
बदलून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून तीन आठवडे उलटले. परंतु अजूनही पोलिसांच्या वेबसाइटवर जुन्याच अधिकाऱ्यांची छबी आणि नावे झळकत आहेत.

आनंदयात्री होण्याचं समाधान

0
0
‘मी माझं यापलीकडे जाऊन बाबा आमटेंचं पवित्र कार्य समजून घेण्याची संधी ‌मला मिळाली. त्यात थोडं बहुत काम करायला मिळालं हेच माझ्यासाठी खूप आहे. या कामामुळे स्वत:च एक आनंदयात्री होण्याचं समाधान मिळालं’ असं मत समाजसेविका भावना विसपुते यांनी व्यक्त केलं.

अखेर रेल्वे पोलिसांचा फोन सुरू

0
0
चार वर्षापासून बंद असलेला नाशिकरोड रेल्वे पोलिस स्टेशनचा फोन सुरू करण्यात आला असून नागरिकांना रेल्वे पोलिसांशी संपर्क साधणे आता सोयीचे होणार आहे. नाशिकरोड रेल्वे पोलिसांचा फोन चार वर्षापासून बंद असल्याने पोलिसांना माहिती द्यायची झाल्यास किंवा माहिती विचारायची झाल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा लागत होता.

संस्कृतीचे जीर्ण सेतू...

0
0
ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये असे म्हणतात. खरे तर कोणाचेच कूळ विचारू नये. पण नदीचे मूळ मात्र नक्कीच विचारावे, शोधावे व त्याची अवस्था पाहावी अशी परिस्थिती आज विकासाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये झाली आहे.

रेल्वे तिकिटांची दलाली करणारा अटकेत

0
0
नाशिकरोड रेल्वे तिकीट बुकींग ऑफिस परिसरात रेल्वे पोलिसांनी सापळा रचून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून प्रवासाची तिकिटे, बुकींग फॉर्म व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केला आहे.

रेडिएशन मशीन आठवड्याभरापासून बंद

0
0
डळमळीत झालेले प्रशासन अन् शिस्तीचा अभाव यांची प्रचिती पुन्हा नाशिकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलच्या कारभारात आली आहे. गेल्या आठवड्यापासून कॅन्सर पेशंटला रेडिओथेरपी देणारे आठ कोटींचे मशीन बंद पडल्याने दररोज पन्नासहून अधिक पेशंटला मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

सत्काराचे रहस्य

0
0
दोन दिवसापूर्वी शहरात एक अमृत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. सोहळ्याला नेहमीप्रमाणे उशीर झाल्याने एका वक्त्याने श्रध्दा व अंधश्रध्दा यांची माहिती देत वेळ मारून नेली.

नाशिक विमानतळाचा हैदराबादमध्ये डंका

0
0
हैदराबाद येथे होत असलेल्या राष्ट्रीय एअर शोमध्ये नाशिक विमानतळाचा डंका वाजणार आहे. तसा निर्णय हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने घेतला आहे. विमान कंपन्यांनी या विमानतळाचा लाभ घ्यावा, या हेतूने एचएएल या शोमध्ये नाशिक विमानतळाची माहिती विशेषत्वाने देणार आहे.

‘चार चाकां’वरचा फळबाजार!

0
0
नाशिकमध्ये मखमलाबाद रोडवरच्या चौधरी मळ्यात पांढरा गणवेश परिधान केलेली व्यक्ती व पांढऱ्या रंगाची फोर्ड फिएस्टा गाडी दिसली की तेथे नागरिकांचा आपोआप गराडा होतो. ही व्यक्ती कुणी राजकीय पदाधिकारी किंवा कुणी बडी असामी नव्हे, तर ते आहेत शेतकरी दत्तू खोडे. चार चाकांवरच्या सेंद्रिय फळबाजाराचे चालक, मालक अन् सर्व काही.

पहिल्या फेरीत उमेदवारांचा भेटीगाठींवरच भर

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असले तरी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह थेट प्रचारासाठी काही दिवसांचा अवधी असला तरी सध्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून उमेदवार भेटीगाठींद्वारे आपला `मेसेज` पोहोचवित आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमिलन ठरले औटघटकेचे

0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन होऊन २४ तास होत नाही, तोच आदळापट सुरू होऊन राष्ट्रवादीने अक्षरश: काँग्रेसला धुडकारल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले. काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांच्यासमोर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमनेसामने आल्यानंतर जोरदार खडाजंगी होऊन बैठकीत एकच गोंधळ उडाला.

‘नमो चाय’वरून भाजपमध्ये वादळ

0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो चाय’ संकल्पनेचा आधार घेत भारतीय जनता पक्षामध्ये नाशिकचे स्थानिक राजकारणही रंगत असल्याचे दिसून येत आहे. हे राजकारण एकप्रकारचे वादळच असल्याचे भासत असून, ते प्रत्यक्षात पेल्यातील वादळ ठरते का, याबाबत भाजपमध्ये चर्चा झडत आहे.

नंदुरबारमध्ये गावित द्वयींची प्रतिष्ठा पणाला

0
0
नंदुरबार ‌लोकसभा मतदारसंघातील माणिकराव गावितांची सद्दी संपुष्टात आणण्यासाठी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी कन्या डॉ. हीना यांना पुढे करीत राजकीय खेळी केल्याचे दिसत आहे.

पाडळी शिवारात बछडा जेरबंद

0
0
सिन्नर तालुक्यातील पाडळी शिवारात समशेरपूर रस्त्यावरील चिंचखेड येथे सहा ते सात महिन्याचा मादी जातीचा बछडा आढळून आला आहे. यर बछड्याला सिन्नरच्या वन विभागाने मोहदरी येथील वन उद्यानात ठेवले आहे.

कोनांबेच्या बेपत्ता मुलीचा कुजलेला मृतदेह आढळला

0
0
गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या कोनांबे येथील आठ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा मृतदेह कोनांबे शिवारातील मोडदरा रोडवरील कावळी मळ्यातील उसाच्या शेतात आढळून आला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images