Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भुसावळ-मुंबई वाहतूक विस्कळीत

0
0
नागपूरहून भुसावळला लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन येणाऱ्या मालगाडीचे पाच डबे रविवारी सकाळी बोदवड रेल्वेस्टेशनजवळ घसरल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नाशिकरोडची २ रेल्वे कॅन्टीन बंद

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या कॅन्टीनचा करार संपल्याने प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरचे दोन कॅन्टीन बंद केले आहेत. बंद कॅन्टीनची झळ प्रवाशांना बसत असून इगतपुरी ते मनमाड दरम्यान प्रवाशांना खाण्याचे चांगले पदार्थ मिळत नसल्याने हाल होत आहे.

लाखापेक्षा वाचविले लाख मोलाचे प्राण

0
0
पिंपळगाव बसवंतवळ पालखेड कॅनॉलमध्ये पडलेल्या लहान मुलास वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची व ‌खिशात असलेल्या एक लाख रुपयांची पर्वा न करता बेधडक कॅनॉलमध्ये उडी घेऊन मुलाचे प्राण वाचविणा-या एका पतसंस्थेच्या व्यवस्थापकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लैंगिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
0
लैंगिक छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या नांदगाव येथील विवाहितेचा उपचारादरम्यान नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दीपक घोलप (वडाळी ता.नांदगाव) यास अटक केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सटाण्यात मनोमिलन

0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी असताना बागलाणमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून विस्तव देखील न जाणा-या या पक्षांची मंगळवारी आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीनंतर मनोमिलन होऊन सुखी संसाराची शपथ देखील घेतली.

कांदा भावात घसरण

0
0
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात सुमारे शंभर रुपयांनी घसरण झाली. कांद्याचे निर्यातमूल्य रद्द केल्यानंतर कांद्याची निर्यात होत असताना व देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला चांगली मागणी असताना कांदा भावात होणारी घसरण शेतक-यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

डाळिंबाची मातीमोल भावाने विक्री

0
0
गारपीटनंतर मंगळवारी सटाणा बाजार समितीत डाळिंबाचा अक्षरश: पूर होता. उदरनिर्वाहासाठी दोन पौसे मिळतील या आशेने विक्रीसाठी आणलेले डाळिंब आवक वाढल्याने कवडीमोल भावाने विकावे लागले. त्यामुळे हताश होऊन बळीराजाला घरी परतावे लागल्याचे दृश्य बघायला मिळाले.

एलईडी सुनावणी लांबली

0
0
मुंबई हायकोर्टाने वीजबचतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी महापालिकेला २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर २५ मार्चला त्यावर युक्तिवाद होणार आहे.

उमतील पहिले पेट-सिटी स्कॅन मशिन शहरात

0
0
कॅन्सरच्या पेशंटला विविध चाचण्यांसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी आणि एकाच जागी ती उपलब्ध व्हावी याकरिता क्युरी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये पेट-सिटी पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग हे अत्याधुनिक मशिन उपलब्ध करून दिले आहे.

एलबीटीच्या फेऱ्याने व्यापारी हैराण

0
0
नाशिकरोड परिसरातील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) संबंधी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महापालिकेच्या मुख्यालयात राजीव गांधी भवन येथे चकरा माराव्या लागतात.

फायर ब्रिगेडच्या इमारतीचे काम रखडले

0
0
नाशिकरोड परिसरात नव्याने तयार होत असलेल्या फायर ब्रिगेड स्टेशनचे काम दोन वर्षापासून रखडले असून हे काम त्वरित पूर्ण करावे यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने गोसावीवाडीतील फायर स्टेशन तोडून रेड हॉस्पिटलच्या जागेत नव्या अद्ययावत अशा फायर स्टेशनच्या निर्मितीचे काम सुरू केले.

उद्योगांची उंची वाढणार

0
0
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत नव्या उद्योगांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नाराजी असताना उद्योगांना वाढीव एफएसआय देऊन औद्योगिक विकास महामंडळाने उद्योजकांना दिलासा दिला आहे.

चुकलेला कार्यक्रम

0
0
अनेकदा घाईगडबडीत ‘जाना था जपान पोहोच गये चीन’ असा किस्सा होतो. परवा असाच एक किस्सा झाला. टिळकपथावरील एका सभागृहात सुरु असलेल्या सत्कार सोहळ्यात एक महाशय घाईगडबडीने येऊन बसले.

‘शिवकार्य गडकोट’चे श्रीगडावर श्रमदान

0
0
नाशिकच्या शिवकार्य गडकोट मोहिमेचा ११ वा श्रमदानाचा टप्पा भक्कम श्रीगडावर (ता.त्र्यंबक) पार पडला. उंचच उंच कातळ कडा आणि खोल दरी, भुयारी पायऱ्यांच्या श्रीगडकडे संबंधित विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असले तरीही तो आजही अभेद्य अवस्थेत आहे.

विजय पांढरेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

0
0
समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती आमच्या रडारवर आहेत. या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत साम‌ील होताना मतदानाअगोदर तेलगीची नार्को टेस्ट आठवा अन् नंतरच व्होटींग मश‌िनचे बटन दाबा, असे सांगत आम आदमी पक्षाचे उमेदवार व‌िजय पांढरे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधले.

सिडकोतील रस्ते देताहेत अपघातांना निमंत्रण

0
0
सिडकोतील रस्त्यांची समस्या नाशिककरांसाठी नवी नाही. मात्र, आयटीआय पूलापासून शिवशक्ती चौक व त्रिमूर्ती चौकाकडे जाणारा रस्ता वाहनचालकांसाठी वेदनादायी ठरत आहे. खड्डे चुकवत अन् आट्यापाट्या खेळतच वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. यातून अपघातानांही निमंत्रण मिळत आहे.

लायब्ररी अन् जीम पडली धुळखात

0
0
मोठा गाजावाजा करत लायब्ररी व जीम उभारण्यात आली. पण गेल्या दोन वर्षांपासून आवश्यक उपकरणे व साहित्याअभावी दोन्ही इमारती धुळखात पडल्या आहेत. एखाद्या खेड्यावरचे हे चित्र नव्हे, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील स्नेहबंधन पार्क वसाहतीतील ही समस्या आहे.

भूखंड बनले कचऱ्याचे आगार

0
0
नाशिकरोड परिसरातील मोकळे भूखंड कचऱ्याची आगार बनली आहेत. मोठ्या मैदानांवर तर चक्क गार्बेज आणून टाकले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भ्रष्ट प्रवृत्तींवरील कार्यवाहीचे आदेश गुलदस्त्यातच?

0
0
मुक्त व‌िद्यापीठात काही पदांच्या होणाऱ्या शंकास्पद पुनर्न‌ियुक्त्या आण‌ि तथाकथित म‌िली‌जुली प्रकरणी यापूर्वीच राज्यपालांन‌ी कार्यवाहीचे आदेश व‌िद्यापीठाला द‌िले होते.

अपहरण प्रकरणी कोठडी

0
0
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फय्याज इरफान शेख असे संशयिताचे नाव असून तो प​श्चिम बंगालमधील रहिवाशी आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images