Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मतदार बना’साठी झुंबड

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करायच्या पुरवणी यादीत नाव समाविष्ट व्हावे, म्हणून रविवारच्या विशेष मोहिमेत नवमतदारांची मोठी झुंबड उडाली. या मोहिमेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी न केल्याने अनेकांना रविवारी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मतदार नोंदणीचा गोंधळात गोंधळ

$
0
0
मतदानाचा हक्क बजावू पाहणाऱ्या नागरिकांनी नाव नोंदणीसाठी रविवारी शहरातील केंद्रांवर गर्दी केली. परंतू अर्जांचा तुटवडा, अचूक मार्गदर्शनाचा अभाव, यामुळे अनेकांना अर्ज न भरताच माघारी परतावे लागले.

प्रगतीपुस्तक ऑनलाइन

$
0
0
मुले शाळेत अभ्यास करतात का, असा प्रश्न पालकांना नेहमी पडतो. दररोजच्या कामकाजाचा ताण, धावपळ यामुळे पालकांना शाळेत नियमित जाऊन ते समजून घेणे अवघड असते. यावर नाशिककर तरुण हर्ष देवधर याने ‘एज्युनेट’ ऑनलाइन प्रगतीपुस्तक पोर्टलचा तोडगा काढला आहे.

१० हजार हेक्टर शेतीचे नुकसान

$
0
0
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यात एकूण १० हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकहून भारतासह परदेशात जाणाऱ्या द्राक्ष आणि कांदा या पिकांना फटका बसला आहे.

नारळ फोडा

$
0
0
लोकसभेची निवडणूक आल्याने विकासकामांचा शहर परिसरात मोठाच पुळका आला होता. विकासकामांचा बार बघून मतदार आपल्याच मतदाराला मत देईल अशा भाबड्या अपेक्षेने गेल्या पंधरा दिवसात अनेक कार्यक्रम गाजावाजा करीत झाले.

‘सोशल साइटस्’वरच प्रचाराची मदार

$
0
0
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजक‌ीय पक्षांनी आपल्या भूमिकांकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तरुणाईचे मत कॅश करण्यासाठी सोशल नेट्वर्किंग साइटसच्या माध्यमातून कंबर कसली आहे.

रेल्वेवर दगडफेक, टीसी जखमी

$
0
0
पुण्याहून भुसावळकडे जाणाऱ्या ११०२६ डाऊन या गाडीवर देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशननजीक अज्ञात इसमांनी एसी कोचवर केलेल्या हल्ल्यात गाडीतील तिकीट तपासनीस डी.पी. मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

प्लम्बर करणार पर्यावरणाचे रक्षण

$
0
0
हवामानातील बदलांची दखल घेत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्लंबर्सनेही पुढाकार घेतला आहे. ग्रीन प्लम्बर्स या अनोख्या संकल्पनेद्वारे देशभरात असंख्य प्लम्बर्स पर्यावरण संरक्षणासाठी सज्ज झाले असून अशा प्रकारचे १७ ग्रीन प्लम्बर्स जिल्ह्यात सेवा देत आहेत.

योजनांचा सुकाळ; अंमलबजावणीचा दुष्काळ

$
0
0
योजनांचा सुकाळ आणि अंमलबाजवणीचा दुष्काळ असे चित्र त्र्यंबक शहरासह तालुक्याचा विचार करता दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या भल्यासाठी योजना आल्या तथापि, त्या गरजवतांपर्यंत कधी पोहचणार असा प्रश्न निर्माण होत आहे. अन्नसुरक्षा आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांचे मणामणाचे दळण दळले गेले.

त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कामांना सापडेना मुहूर्त

$
0
0
नाशिकला सिंहस्थ कामांची सुरुवात झाली असून त्र्यंबकचे काय? असा सवाल येथील साधुमहंतासह नागरिकांनी उप‌स्थित केला आहे. त्र्यंबक पालिकेने सिंहस्थ आराखड्यातील ३२ कोटींची कामे मंजूर करून घेतली.

पुनर्नियुक्त्यांचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात?

$
0
0
वर्षानुवर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठाच्या ‘मुक्त’ कारभाराला कंटाळलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी राज्यपालांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. प्रात‌िन‌िधीक स्वरुपात पुढे आलेल्या सहाय्यक पदांसारखे ‘मुक्त’ कारभार प्रकरण अन् या माल‌िकेतील पदाध‌िकाऱ्यांचे तपशील दर्शव‌िणारे पत्रही राज्यपालांना काही मह‌िन्यांपूर्वी अस्वस्थ कर्मचाऱ्यांनी पाठव‌िले होते.

रायडिंगची हौस भारी, त्यासाठी ‘वाटमारी’

$
0
0
केवळ मोटरसायकलवरून रपेट मारण्याच्या हौसेखातर त्यांची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दहावीच्या वर्गात शिकणारी ही मुले आहेत. पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांनी बेवारस अवस्थेत सोडलेल्या ११ मोटरसायकल्सही जप्त करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसतर्फे उत्तर महाराष्ट्रातून रघुवंशी

$
0
0
नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून नंदूरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेचे नाशिकमधील आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या जागवेर रघुवंशी यांना संधी दिल्याने विधान परिषद निवडणुकीतून छाजेड यांचा पत्ता कट झाला आहे.

होर्डिंग्ज हटवणे सुरूच; गुन्ह्यांचे काय?

$
0
0
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुरू केलेली होर्डिंग्ज तसेच बॅनर हटवण्याची कारवाई अद्याप कामी झालेली नाही. याची दखल घेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, मनमाड, सटाणा, मनमाड, भगूर या नगरपालिकांना सोमवारी पुन्हा निर्देश दिले आहेत.

५० हजारांहून अधिक नवमतदारांचे अर्ज

$
0
0
रविवारच्या मतदार नोंदणीला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद लाभला असून सोमवारीही मोठ्या प्रमाणात अर्जांची स्विकृती झाली आहे. जिल्ह्यात ५० हजाराहून अधिक मतदारांचे अर्ज प्राप्त झाले असून सोमवारपर्यंत सादर झालेल्या अर्जदारांची नावे पुरवणी यादी प्रसिद्ध होऊ शकणार आहेत.

गारपिटीनंतर आता पाहणी सत्र

$
0
0
जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरू असताना आता या नुकसानीच्या पाहणी दौऱ्याचे सत्र सुरु होणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे मंगळवारी तर केंद्र सरकारचे पथक गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना तुरूंगवास!

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरात अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले. या गोंधळाला केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जबाबदार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खुनापूर्वी झाली होती वादावादी

$
0
0
मखमलाबाद रोडवरील एका हॉटेलात रविवारी रात्री जेवण करण्यासाठी प्रवीण हांडे मित्रांसमवेत गेला होता. सव्वा अकराच्या सुमारास तेथून परतताना एका ओळखीच्या तरुणाने त्याला हटकले. तू माझ्या मैत्रिणीशी गप्पा का मारतोस, अशी विचारणा करीत त्याच्याशी वाद घातला.

आरक्षणाबरोबरच संरक्षण हवे

$
0
0
आरक्षणाबरोबरच संरक्षणाच्या हक्कासाठी काय करता, हे उमेदवारांना विचारण्याची वेळ आली आहे. तेव्हा मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना महिलांसाठी काय करणार हे विचारा, त्यांना खिंडीत पकडा, त्यांना अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष अॅड. वर्षा देशपांडे यांनी केले.

वसुलीसाठी सुट्ट्या रद्द

$
0
0
पाणीपट्टी आणि घरपट्टी बिल वसुलीचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी प्रशासनाकडे अवघे २० दिवस शिल्लक आहेत. उर्वरित दिवसांमध्ये अशक्यप्राय वाटणारी वसुली प्रशासनाला करावी लागणार असून जास्तीत जास्त महसूल संकलित व्हावा म्हणून सार्वजनिक सुट्टी, शनिवार आणि रविवारीदेखील भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images