Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सेनेचा उमेदवारावर आज ठरणार?

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून यात नगरसेवक हेमंत गोडसे यांचे नाव आघाडीवर आहे. सेनेकडून राज्यातील प्रमुख मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होत असताना नाशिकच्या उमेदवारीबाबत होणाऱ्या विलंबाने कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

समीर भुजबळ नाशिकचे आमदार

$
0
0
यंदा लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्यामुळे विद्यमान खासदार समीर भुजबळ यांचे काय, यासंबंधीचा चर्चा रंगात आली होती. मात्र, समीर भुजबळ हे नाशिकमधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा सूतोवाच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केल्याने या चर्चेला तुर्त तरी पूर्णविराम मिळाला आहे.

माकप उमेदवारांसाठी नेत्यांची फौज

$
0
0
लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारसंघाता पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी ‘माकप’तर्फे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) केंद्रीय नेत्यांची फौज उतरविण्यात येणार आहे.

​१.७५ लाखांमध्ये ५ कॉपीबहाद्दर

$
0
0
एसएससी बोर्डाच्या पह‌िल्याच भाषा व‌िषयाच्या पेपरला अवघे पाच कॉपीबहाद्दर भरारी पथकांना आढळून आले. धुळे ज‌िल्ह्यात आढळलेल्या या कॉपीबहाद्दरांवर पह‌िल्याच द‌िवशी कारवाई करण्यात आली.

‘रेडिरेकनरचे दर कमी करा’

$
0
0
नाशिकसह राज्याच्या विविध शहरात रेडिरेकनरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला असून हे दर कमी करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आग्रही मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

रेल्वेत बनावट पाणी बॉटल

$
0
0
मध्य रेल्वेच्या कल्याण ते भुसावळ या मार्गावरील अनेक गाड्यांमध्ये बनावट सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे आढळून आले आहे. या बाटल्यांमुळे प्रवाशांच्या जीव‌ितास धोका होण्याचा संभव असून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओझरमध्ये विमानतळ सुरू

$
0
0
ओझर येथील नाशिक विमानतळाच्या अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलचे उद्‌घाटन सोमवारी झाले. टर्मिनलमधील विविध सुविधांची पाहणी मान्यवरांनी केली. लगेज सेक्शनमध्ये असलेल्या कन्व्हेअर बेल्टवर पुष्पगुच्छ टाकून मान्यवरांनी यावेळी टर्मिनलच्या कामाचे कौतुक आणि उद्‌घाटन केले.

पिंपळगाव बसवंतवर भारनियमनाचे संकट

$
0
0
चोवीस तास वीजपुरवठा होणाऱ्या पिंपळगाव बसवंत परिसरातील शीतगृहांकडून विजेचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे भारनियमनाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने शहर व परिसरात भारनियमन न करता कृषी व्यवसायासाठी चोवीस तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अपघातात सटाण्याच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू

$
0
0
कन्टेनरने बोलेरोला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण दुर्घटनेत सटाणा येथील माजी नगरसेवक दयाराम सोनवणे जागीच ठार झाले. तर, अजमीर सौदाणे येथील तीन जण गंभीर जखमी असून उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

माथेफिरूने ३ दिवसात केली दोघांची हत्या

$
0
0
देवळा तालुक्यात सांगवी येथील एका माथेफिरूने तीन दिवसात महिलेसह तरुणाचा कुऱ्हाडीने खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. देवळा पोलिसांनी या माथेफिरुला कुऱ्हाडीसह अटक केली आहे.

१० केंद्र समन्वयकांचे अखेर राजीनामे

$
0
0
सेवा जेष्ठता नसलेल्या दहा केंद्र समन्वयकांचे राजीनामे घेण्यात आल्याचे जाहीर झाल्यानंतर सकाळपासून महापालिका शिक्षण मंडळ कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन रात्री आठ वाजता मागे घेण्यात आले. उर्वरित तीन सदस्यांबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण

$
0
0
नाशिकरोडच्या प्रथमेश पार्क परिसरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीपैकी एका व्यक्तीला उपनगर पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

रेल्वे स्टेशनने घेतला मोकळा श्वास

$
0
0
भुसावळ विभागाचे रेल्वे मॅनेजर महेशकुमार गुप्ता यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनला भेट देऊन स्टेशनच्या बाहेरील पार्किंग हटवण्याबाबत सूचना केल्या. परंतु त्यांची पाठ फिरताच पार्किंगची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापून येताच या बातमीची दखल घेत रेल्वे पोलिसांनी स्टेशन परिसर वाहनमुक्त केला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

$
0
0
आसनगावजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीत अतिलोड झाल्याने सोमवारी दुपारी इंजिन नादुरुस्त झाले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

महिलांच्या टोल नाक्यावर महिलादिनापासून वाढ

$
0
0
पिंपळगाव-बसवंत येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत. देशातला हा अशाप्रकारचा पहिलाच टोलनाका आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी होणारी टोल दरवाढ लागू करण्यासाठीही 'जागतिक महिला दिनाचाच' मुहूर्त टोलचे दर तीनपट वाढविण्यासाठी निवडण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी वाहनांचा खोळंबा

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या टोल नाक्याला दर वाढविण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हायवेचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी वाहनांचा खोळंबा होत असताना वाढीव टोल कसा भरायचा, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

रेल्वे रिझर्वेशनसाठी लागताहेत रांगा

$
0
0
परीक्षांचा हंगाम संपल्यानंतर साहजिकच सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. बच्चेमंडळींसह अनेक पालकांनी पर्यटनाची तयारी केली असून, त्यातूनच तिकिटांसाठी आतापासूनच नाशिकरोडच्या तिकीट खिडक्यांवर गर्दी होत आहे.

कांदा १०० रुपयांनी घसरला

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात नऊशे पन्नास रुपयांपर्यंत असणारे कांद्याचे बाजारभाव लिलाव सुरू होताच शंभर रुपयांनी घसरले.

४५८ नळ कनेक्शन सील

$
0
0
दहा हजार रूपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या सुमारे ४५८ मिळकतधारकांचे नळ कनेक्शन महापालिका प्रशासनाने सील केले आहे. याबरोबर ४ हजार १२० मिळकतधारकांना कनेक्शन बंद का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

नाशकात पावसाच्या तुरळक सरी

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या हवामानात लक्षणीय बदल झाला असून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास शहरात तुरळक सरी; तर इंदिरानगर भागात पावसाच्या धारांनी हजेरी लावली. आगामी काही दिवस हवामान असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images