Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अल्फ इंजिनीअरिंगमधील ५२ कामगार झाले कायम

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील अल्फ इंजिनीअरिंगमधील कंपनीतील ५२ कामगारांना कायम करण्यात आले आहे. आज कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात २६ कामगारांना कायम केल्याचे पत्र देण्यात आले.

मनसे वीज सेनेची निदर्शने

$
0
0
वीज कामगारांना तीस टक्के अंतरिम पगारवाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी मनसे वीज कामगार सेनेतर्फे नाशिकरोड येथील विद्युत भवनसमोर आज निदर्शने करुन व्दारसभा घेण्यात आली. राज्यात एकाचवेळी ही निदर्शने करण्यात आली.

राणेनगरमध्ये धावणार हायटेक घंटागाडी

$
0
0
घंटागाड्यांची अनियमितता हा कळीचा प्रश्न बनलेला असतानाच, राणेनगर भागातील प्रभाग 53 मध्ये हायटेक घंटागाडी धावू लागली आहे. 48 तासांच्या आत घंटागाडी प्रभागात आली नाही तर महापालिकेचे आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व संबंधित नगरसेवकांना दूरध्वनीवर तत्काळ संदेश मिळणार आहे.

भय इथले संपत नाही...

$
0
0
दिल्ली येथील सामूहिक बलात्काराचे लोन नाशिकमध्येही पसरू पाहत आहे. देवळाली परिसरातील बलात्कार प्रकरणानंतर या भागात दहशतीचे वातावरण आहे.गुन्हेगारी प्रवृत्तींची नांगी ठेचा, कठोर कारवाई करा, मुलगा असो वा मुलगी त्यांनी सातच्या आत घरात परतावे, अशा प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरातून व्यक्त होत आहेत.

आता नजरा शिवसेना, मनसेच्या उमेदवारांकडे

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जसजसे जाहीर होत आहेत, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकसह दिंडोरीचे उमेदवार तर भाजपने दिंडोरी व धुळ्यातील उमेदवार जाहीर केले आहेत.

आता लक्ष स्थायीच्या सभापतीपदाकडे

$
0
0
स्थायी समितीतील सोळापैकी निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची शुक्रवारी महासभेत घोषणा करण्यात आली. पक्षांच्या रोटेशन पध्दती​नुसार उर्वरित आठ सदस्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याची शक्यता असून, त्यानंतर सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होईल.

नाशिक विमानतळावरुन सोमवारी पहिले टेकऑफ

$
0
0
ओझरजवळ साकारण्यात येत असलेल्या नाशिक विमानतळाची निर्मिती अखेरच्या टप्प्यात आली असून, तीन मार्च(सोमवार)ला विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. खासदार समीर भुजबळ यांनी शुक्रवारी विमानतळाला भेट देत अंतिम कामांचा आढावा घेतला.

सामूहिक बलात्कार : तपासपथके रवाना

$
0
0
शहरात खळबळ उडविणा-या देवळालीगाव येथील रोकडोबावाडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुख्य संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती उपनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांनी दिली.

ATM साठी आता शंभर रुपये

$
0
0
महाराष्ट्र बँकेची एटीएम सेवा घेणाऱ्या ग्राहकांकडून वर्षाला शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तशी नोटीस उपनगर येथील बॅंकेच्या शाखेत लावण्यात आली आहे. ग्राहकांना एटीएम सेवा पुरविण्यात आली असून, त्यांनी बँकेत गर्दी करण्याऐवजी एटीएमचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येते.

बेदाणा उत्पादकांवर परिणाम

$
0
0
पिंपळगाव बसंवत येथे द्राक्ष हंगाम जोमाने सुरू झाला असली तरी शिवार खरेदीमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत द्राक्षमण्यांची आवक मंदावली आहे. द्राक्षमण्यांची मुबलक आवक नसल्यामुळे बेदाणा उत्पादकांना पुरेसे द्राक्षमणी मिळत नाही.

शिवसेनेची बदनामी थांबवा

$
0
0
महापालिकेतील स्थायी समिती निवडणुकीवरुन नाशिक शिवसेनेत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली गटबाजी व त्यातून होणारी पक्षाची बदनामी थांवबिण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले असून, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी या गटबाजीचा निषेध केला आहे.

'आप'चे टार्गेट भुजबळच

$
0
0
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाही त्याना नाशिकमधून उमेदवारी दिलीच कशी, असा प्रश्न 'आप'चे(आम आदमी पार्टी) नाशिकमधील उमेदवार विजय पांढरे यांनी केला आहे. नाशिककर भुजबळांचा भ्रष्टाचार विसरलेले नाहीत. त्याचा फटका भुजबळांना या निवडणुकीत बसेल, असा दावाही त्यांनी केला.

भुजबळ समर्थकांचे राजीनामास्त्र

$
0
0
विकासाची गंगा आणून येवल्याचा चेहरामोहरा बदलणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्याच्या वृत्ताने येवला शहर व परिसरात सर्वत्र नाराजीचे सुर उमटले.

नाशिकच्या डॉक्टरबंधूंची सायकलभरारी

$
0
0
चार वर्षापूर्वी हौसेखातर सायकल चालविणाऱ्या डॉ. महेंद्र व डॉ. हितेंद्र महाजन या नाशिकमधील बंधूंनी सायकलिंगला आव्हान मानत जगातील मानाच्या सायकल रेसपैकी असलेल्या 'रॅम'मध्ये (रेस अक्रॉस अमेरिका) धडक मारली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या 'द डेक्कन क्लिफहँगर' सायकल स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याने हे दोन्ही बंधू 'रॅम'साठी पात्र ठरले आहेत.

जपानी कंपनीचा लखमापूरला प्रकल्प

$
0
0
टोमॅटोवर प्रक्रिया करणारी जपानमधील आघाडीची कंपनी कागोमे आणि मित्सुई या कंपन्यांनी भारतात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे निश्चित केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी इंदूरच्या रुची सोया कंपनीशी करार केली असून त्यांचा पहिला प्रकल्प दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे सुरू होणार आहे.

सिडको-सातपूर भागात उद्या पाणी नाही

$
0
0
महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात येणाऱ्या दुरुस्ती कामामुळे सिडको व सातपूर परिसरातील काही भागात उद्या (सोमवार) पाणी पुवरठा होणार नाही.

जुन्या नाशकातील ‘इटीपी’ सुरु होणार

$
0
0
शहरातील सर्वांत मोठा म्हणून गणल्या जाणाऱ्या जुने नाशिक येथील कत्तलखान्यातील इटीपी (इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) अखेर सुरु होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदार आणि महापालिकेच्या वादामुळे तो सुरु होऊ शकलेला नाही.

मतदारसंघावरून शिवसेनेत रंगली खलबते

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा बार उडविताना शिवसेनेने राज्यातील वीस जागांवरील उमेदवार घोषित केले. मात्र यात नाशिकसारख्या प्रमुख मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना जोर चढला आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्षांसह ८ जणांवर गुन्हा

$
0
0
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विजय अप्पा करंजकर, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विनोद नुनसे, महेश सोपे, बाळु कोकणे, संतोष कहार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सामूहिक बलात्कार : २ संशयित ताब्यात

$
0
0
शहरात खळबळ उडविणाऱ्या देवळालीगावातील रोकडोबा वाडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुख्य संशयितांपैकी दोघांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस तिसऱ्या संशयिताच्या मागावर असून तोही लवकरच हाती लागेल असे पोलिसांनी सांगितले. संशयिताचे वर्णन संबंधित महिलेने पोलिसांना दिले होते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images