Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जयशंकर आज होणार प्रदर्शित

$
0
0
बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाविषयी शंकर महाराजांच्या भक्तापलीकडे इतर सर्व उत्सुकता लागून आहे.

पिंपळगावला २० वाळूचे ट्रक जप्त

$
0
0
सारंगखेडा येथून वाळू घेऊन निघालेल्या सुमारे २० ट्रक पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर ओव्हरलोड म्हणून महसूल विभागाने पकडल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत. वाळूने भरलेले ट्रक पिंपळगाव पोलिस ठाण्यात उभे करण्यात आले आहेत.

आठ हजारांची पगारवाढ

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत त्रैवार्षिक पगारवाढीचा करार करण्यात आला. कामगारांना तीन वर्षांसाठी ८ हजार ३०० रुपयांची भरघोस वाढ देण्यात आली आहे.

‘केबीसी’बाबत पोलिसांचा इशारा

$
0
0
नाशिक- आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौकातील केबीसी मल्टीट्रेड कंपनीने आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे आणि कोणाचीही फसवणूक केली नसल्याचा दावा केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

रेल्वे स्टेशन्सना विकासाची आस

$
0
0
आगामी सिंहस्थात नाशिक हे रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे डेस्टीनेशन असणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने कामाचे नियोजन केले आहे. मात्र, हातात निधी पडला नसल्याने कामे सुरू झाली नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच सर्व कारभार राम भरोसे आहे.

सोलर सबसिडीला थकबाकीचे ग्रहण

$
0
0
विजेचा अभाव आणि प्रदूषण यावर तोडगा काढतानाच पर्यावरणपूरक अशा सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सबसिडीची योजना काही वर्षांपासून लागू केली आहे. मात्र, सोलर हिटरसाठीची सुमारे २१ कोटी रुपयांची सबसिडी थकीत असल्याची बाब पुढे आली आहे.

सावरकरांना आदरांजली

$
0
0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रमुख ठिकाण असलेल्या तीळभांडेश्वर लेन मधील अभिनव भारत मंदीरात सावरकरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सावरकरांचे पुतणे विक्रम सावरकर यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

११ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

$
0
0
जिल्ह्याच्या कृषी आणि महसूल विभागाने अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

वीजबचत कशी होणार?

$
0
0
महापालिकेच्या बहुचर्चित एलईडी निविदा प्रकरणावरून मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान एलईडीमुळे वीजेची कशी व किती बचत होणार असा प्रश्न करत महापालिकेने तीन मार्चला आपली बाजू सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.

बोटिंगसाठी वेट अँड वॉच

$
0
0
गंगापूर धरण परिसरात पर्यटन महासंकुल अंतर्गत साकारण्यात आलेल्या नेचर्स बोटक्लबचे मंगळवारी थाटात उद्घाटन झाल्यानंतर हौशी नाशिककरांना इथल्या बोटिंगची मजा घेण्याची उत्सुकता लागली आहे.

बजेटमध्ये प्राधान्य संशोधनाला

$
0
0
आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अध‌िसभेने संशोधनासाठी भरीव तरतूद करीत या संकल्पाला मंजुरी द‌िली. सुमारे १४२ कोटींच्या अर्थसंकल्पात सुमारे कोटी रुपयांची तरतूद संशोधनाच्या उपक्रमांसाठी करण्यात आली आहे.

कुसुमाग्रजांना हायटेक सलाम!

$
0
0
कवीश्रेष्ठ तात्यासाहेब श‌िरवाडकरांच्या २२ नाटकांच्या दर्जेदार ऑड‌िओ व्ह‌िज्युअल रंगावृत्ती उपलब्ध होणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात तात्यासाहेबांच्या प्रत्येक नाटकाची अर्ध्या-अर्ध्या तासाची ऑड‌िओ व्ह‌िज्युअल रंगावृत्ती सादर करण्यात येणार आहे.

शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण

$
0
0
मोबाइल फोनचे मेमरी कार्ड चोरल्याच्या आरोपावरुन चार शिक्षकांनी कनाशी (ता. कळवण) येथील अनाथलयातील सहावीत शिकणाऱ्या राजूला पंधरा दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती.

जाहला गजर मराठीचा...

$
0
0
नाशिक म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रज म्हणजे मराठी हे समीकरण प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे कुसुमाग्रजांची कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला.

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून खतनिर्मिती

$
0
0
कॉलेजमध्ये फक्त अभ्यास आणि टाइमपास न करता पर्यावरणाविषयी भान ठेवण्याचा विचारही ‘एचपीटी’ कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी केला आहे. कॉलेज कॅम्पसमधील झाडांच्या कचऱ्यापासून त्यांनी खतनिर्मितीचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

सेनेच्या दोन नगरसेवकांचे राजीनामे

$
0
0
पक्षसंघटनेतील व‌िरोधी पक्षनेते आण‌ि नेत्यांच्या अवाजवी हस्तक्षेपाचा न‌िषेध नोंदव‌ित श‌िवसेनेच्या पदाध‌िकाऱ्यांनी राजीनामे द‌िले आहेत. यामध्ये दोन नगरसेव‌क आण‌ि एका पदाध‌िकाऱ्याचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचा ‘माेसम बचाव’ चा नारा

$
0
0
कमालीच्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील मोसम नदीला महापालिकेने स्वच्छ करावे. नगारिकांनीही मोसम नदीला आपले समजावे म्हणून शहरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून ‘माेसम बचाव’ नारा दिला.

मोबाइल अन् टीव्हीमुळे खेळाकडे दुर्लक्ष

$
0
0
आजच्या आधुनिक व धकाधकीच्या युगात सर्वांचेच आयुष्य गतिमान झाले आहे. कुणालाच कुणाकडे पहायला वेळ नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सुविधांची वानवा अन् दर्जा शहरी भागाचा

$
0
0
शासन दरबारी शहरी या तीन अक्षरांचा अजगरी विळखा पडल्याने हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी ग्रामस्थांच्या तोंडाचा घास हिरावला गेला असल्याचे चित्र सध्या लासलगाव जवळच्या पिंपळगाव नजीक या छोट्याशा गावात पहावयास मिळत आहे.

साबूदाण्याची दीड कोटीची उलाढाल

$
0
0
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात आठ दिवसात निव्वळ साबूदाणयाची किमान सव्वा ते दीड कोटी रुपयांची ऊलाढाल झाली आहे. साबूदाण्याबरोबरच खजूर व इतर फराळी पदार्थांची सुध्दा मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images