Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे सटाण्यात दहन

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काल शिवसेनेतर्फे मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळयांचे दहन करण्यात आले. शहरातील बसस्थानकाजवळ सकाळी १० वाजता शिवसैनिक जमा झाले होते.

सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

$
0
0
शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार वेतनवाढ देण्यात यावी या मागणीसाठी लासलगाव ग्रामपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे लासलगाव शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

त्र्यंबकरोडच्या अतिक्रमणांवर अखेर पडला हातोडा

$
0
0
सातपूर विभागातील आणि विशेषकरुन त्र्यंबकरोडवरील अतिक्रमणांचा विषय महाराष्ट्र टाइम्सने गेल्या काही दिवसांपासून लावून धरला होता. या वृत्ता मालिकेनंतर अखेर महापालिकेच्या यंत्रणेला जाग आली असून, त्र्यंबकरोडवर नव्याने उभारण्यात आलेली पत्र्याची शेड्स हटविण्यात आली आहेत.

गटविकास अधिकारी : लाच प्रकरणी अटक

$
0
0
बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे मूळ अंतिम प्रमाणपत्र देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यासह चालकास लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने ताब्यात घेतले. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

जादूटोण्याच्या बळी महिलाच

$
0
0
महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश जारी करण्यास बुधवारी, २६ रोजी सहा महिने पूर्ण होत आहेत. या काळात राज्यभरात विविध ठिकाणी ५० तक्रारी आल्या असून त्यापैकी ४३ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. मात्र, यातील ८० टक्के गुन्हे हे महिलांशी संबंधित आहेत.

कारागृहात ATM ची घोषणा हवेत

$
0
0
राज्यातील कारागृहांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कारागृहांच्या परिसरात राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम सेंटर सुरू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. या योजनेत नाशिकरोड कारागृहाचाही समावेश करण्यात आला. मात्र तशी कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे एटीएमची घोषणा हवेतच विरणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ओझरची कार्गो सेवा जमिनीवरच

$
0
0
मोठा गाजावाजा करून दोन वर्षांपूर्वी साकारण्यात आलेला ओझर येथील कार्गो प्रकल्पही अल्प प्रतिसादामुळे अपयशी ठरला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेल्या या सुविधा अक्षरशः धुळखात पडल्या असून एचएएल आणि कॉनकॉर यांना याद्वारे संयुक्तरित्या अपयश आल्याचेही यातून स्पष्ट होत आहे.

तलाठी भरतीत क्लीन चीट

$
0
0
सप्टेंबर महिन्यात झालेल्या तलाठी भरतीत घोटाळा झाल्याप्रकरणात महसूल विभागातील दोन्ही कर्मचाऱ्यांना क्लीन चीट देतानाच या दोघांच्या नातेवाईकांनाही कामावर घेण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज ठाकरेंची कार मुंबईत, पण...

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार असते मुंबईत. तरीही ही कार प्रदूषण करत नसल्याचे प्रमाणपत्र नाशिकमध्ये मिळवता येते. आरटीओ अधिकाऱ्याची कार समोर नाही. तरीही तिचे पीयूसी बनवून दिले जाते. ही सगळी करामत तुम्ही नाशिकमध्ये करू शकता.

माईक असेच हवेत !

$
0
0
मनुष्य स्वभाव विचित्र आहे. याचे अनेक पैलू आहेत. या पैलूंमुळेच आपल्या आजूबाजूला अनेक किस्से घडत असतात. यात नगरसेवक हाही एक गंमतीशीर मनुष्य स्वभावाचाच प्रकार आहे.

लाभले आम्हास भाग्य...!

$
0
0
आज २७ फेब्रुवारी ! मराठी भाषा दिन..! नावाने ‘शिरवाडकर’, ‘जन्माने पुणेकर’ परंतु वास्तव्याने आणि अंतःकरणाने स्वतःला आयुष्यभर सर्वस्वी नाशिककर समजणाऱ्या शब्दप्रभू, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो त्यानिमित्ताने...!

मराठीला हवंय तरुणाईचं बळ

$
0
0
कॉलेजचे कट्टे हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनच रंगताना दिसतात. चित्रपटांचा परिणाम म्हणा अथवा खरोखरच दररोजच्या जगण्यात हिंदी आणि इंग्रजीचा वाढता वापर म्हणा; मराठीत संवाद साधणं कमी झालंय हे आता आपल्याला मान्यच करावं लागेल.

युवा पिढीने बदल ठरवावा

$
0
0
सोशल नेटवर्किंगचा वापर तरुणांनी नीट केला, तर भाषा विकासाला मदत होऊ शकते. मराठी सिनेमा आणि नाटकांना जाणं ही आपली संस्कृती व्हायला हवी. सलमान खानला बघायला जसे उसळत जातो, तोच उत्साह मराठी चित्रपट, नाटकांसाठी दाखवायला हवा. युवकांची ही ऊर्जा महाविद्यालयांनी वाया जाऊ न देता योग्य दिशा द्यायला हवी.

नेटीझन्सला मराठीची ओढ !

$
0
0
एरवी फेसबूकवर फोटो अपलोड करणं, त्यावर लाईक्स, कमेंट टाकणं, चॅटिंग करणं, गेम खेळणं सर्रास सुरू असतं. पण, आता फेसबूकवर तरुणाई मराठीतून व्यक्त होताना दिसते.

‘त्या’ पीयूसी सेंटर्सची मान्यता होणार रद्द

$
0
0
नियम धाब्यावर बसवून पीयूसी बिनबोभाट देणाऱ्या सेंटर्सवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२६) दिले. या सेंटर्सची मान्यता काढून घेण्याचे आदेश दिले असून, चौकशीसाठी एक अधिकारीही नेमला जाणार आहे.

शिर्डीतून लढण्याची घोलपांची तयारी

$
0
0
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत पक्षाने आदेश दिला तर आपण तो पाळू, असे सांगत देवळाली मतदारसंघाचे आमदार बबन घोलप यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दक्षता अधिकाऱ्याची प्रतीक्षा

$
0
0
जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात अमलबजावणी सुरू झाली असली तरी त्यासाठीची पुरेशी तरतूद पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेली नाही. या कायद्यांतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचा तपास आणि कारवाई करण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती रखडलेली आहे.

कनेक्टिव्हिटी वाढ‌व‌िण्यावर भर

$
0
0
पोलिस कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळायलाच हवी. तसे होत नसेल तर त्यांच्यावर नाईलाने कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशारा दिला आहे पेठ विभागाच्या नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक मोक्षदा पाटील यांनी.

स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी

$
0
0
महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य शुक्रवारी निवृत्त होत असल्याने निवृत्त सदस्यांच्या जागेवर बसण्याची इच्छा बाळगून असलेल्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात निवृत्त होणाऱ्यांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सर्वांच्या नजरा पक्षाच्या भूमिकेकडे लागून आहे.

सुरक्षेबाबत तडजोड नाही

$
0
0
आगामी कुंभमेळ्यातील प्रशासकीय नियोजनाअंतर्गत सुरक्षिततेसाठी शहरभरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्पष्ट केले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>