Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जायकवाडी’ ५५ टक्क्यांवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्याची भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ टीएमसी पाणी गेले आहे. रविवारच्या महापुरावेळी दोन लाख ९१ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी जायकवाडी धरणात पोहोचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ४२ टक्क्यांवर असलेला जायकवाडीचा पाणीसाठा आज, बुधवारी (दि. ७) ५५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडावासीयांचे लक्ष नाशिक जिल्ह्यातील पावसाकडे लागलेले असते. मराठवाड्यात पाऊस पडेल तेव्हा पडेल, परंतु नाशिक जिल्ह्यात पाऊस व्हायला हवा, अशी सदिच्छा ते व्यक्त करीत असतात. यंदा नाशिक जिल्ह्यावर पाऊस तुटून पडला आहे. त्यामुळे तो मराठवाडावासीयांसाठीच अधिक फायदेशीर ठरू लागला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून, त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने हे पाणी जायकवाडीकडे सोडण्याचा निर्णय घेतला. १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत २१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले होते. परंतु, त्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत ४८ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. रविवारी नाशिकमध्ये महापूर आला त्यावेळी तब्बल दोन लाख ९१ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. हे पाणी मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले असून, मंगळवारी ४२ टक्क्यांवर असलेला जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा बुधवारी ५५ टक्क्यांवर जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

---

२०१६ पेक्षा यंदा अधिक वेगाने विसर्ग

नाशिकमध्ये २०१६ मध्ये महापूर आला होता. २ ऑगस्ट रोजी आलेल्या त्या महापुराच्या वेळी दोन लाख ८४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यंदा मात्र पूरस्थिती अधिक गंभीर असल्याने दोन लाख ९१ हजार ५२५ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदिवानाचा मृत्यू

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी अब्दुल बशीद अब्दुल बारी काझी (वय ६०) या बंदिवानाचा अर्धांग वायूचा झटका आल्याने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. २) मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान या न्यायालयीन बंदिवानास अर्धांग वायूचा झटका आल्यावर त्यास कारागृह कर्मचारी बाळासाहेब शेजवळ यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडीपीविरोधात आज निषेधसभा

$
0
0

पीडीपीविरोधात आज निषेधसभा

मनमाड : पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) खासदार फय्याज मीर व नजीर अहमद राज्यसभेत सोमवारी राज्यघटनेचे तुकडे करून घटनेचा अवमान केला. याच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. ७) मनमाड येथे निषेध सभा होणार आहे. शिवसेना व रिपब्लिकन पक्षातर्फे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी नगरपालिकेजवळ जमावे, असे आवाहन शिवसेना शहर शाखा व रिपब्लिकन पक्ष आठवले गटातर्फे करण्यात आले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्तात अतिधोकादायक वाडे रिकामे करा

$
0
0

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जवळपास १४ वाडे कोसळले आहेत. गेल्या दोन दिवसांत सहा वाडे कोसळले. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या घटनांची गंभीर दखल घेत अतिधोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात तातडीने काढून घेण्याचे निर्देश प्रशासनाला मंगळवारी दिले. नगररचना, बांधकाम विभागासह विभागीय अधिकाऱ्यांनी नाशिक पूर्व, पश्चिम आणि पंचवटीतील धोकादायक वाडे तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने नव्याने सर्वेक्षण करून ७२३ धोकादायक वाडे आणि इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात वाडे खाली करून घेण्याचा इशारा दिला. गेल्या दोन दिवसांत तब्बल नव्याने सहा वाडे कोसळले. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी सकाळी या भागात जाऊन पाहणी केली. प्रशासनाने या धोकेदायक वाड्यांची तपासणी पुन्हा सुरू केली असून, गुरुवारपासून अतिधोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात रिकामे केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळीत सीएनजी डेपो

$
0
0

महापालिकेची जागा देण्यास संमती; थेट पाईपलाईनद्वारे होणार पुरवठा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील नागरिकांना थेट पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यासह शहर बससेवेसाठी प्रस्तावित असलेल्या दीडशे बसेसला सीएनजी पुरवठा करण्याचा मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. महापालिकेने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला विल्होळी नाक्यावरील पाणीपुरवठा विभागाची आरक्षित सहा हजार चौरस मीटर जागा सीएनजी डेपोसाठी १५ वर्षाच्या भाडेकराराने देण्यास समंती दिली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने सदरची जागा सहा ऐवजी अडीच टक्के रेडिरेकनर दराने देऊ केल्याने जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. महासभेच्या मान्यतेनंतर शहरात सीएनजी तसेच थेट घरांमध्ये गॅसपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमध्ये मुंबई, पुण्याच्या धर्तीवर ग्राहकांच्या घरात थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचे काम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला देण्यात आले असून कंपनीने शहरात सर्वेक्षण केले आहे. कंपनीच्या वतीने त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. गॅस पुरवठ्यासोबत आता नाशिकमध्ये सीएनजीचेही पेट्रोल पंप सुरू होणार आहेत. तसेच शहर बससेवेंतर्गत तब्बल दीडशे बसेस सीएनजीवर चालणार आहेत. त्यामुळे यासाठीही गॅसचा पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे कंपनीच्या वतीने डेपो तयार करण्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. या जागेत गॅस डेपोसह सीएनजीचाही स्वतंत्र डेपो तयार करण्यात येवून पाईपलाईनद्वारे त्याचे शहरात वितरण केले जाणार आहे. नॅचरल गॅसने त्यासाठी राज्य परिवहन मंहामंडळाच्या ताब्यातील आडगाव नाक्यावरील जागेची मागणी केली होती. परंतु, या जागेसाठी महापालिकेने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला सहा टक्के रेडिरेकनरचे दर आकारण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, हा दर कंपनीला परवडणारा नव्हता. त्यामुळे दुसऱ्या जागेची चाचपणी करण्यात आली. विल्होळी नाक्यावरील पाणीपुरवठा विभागासाठी आरक्षित असलेली सर्वे क्र. १८१ मधील सहा हजार चौरस मीटर जागा देण्याची मागणी केली. या ठिकाणी सीएनजी आणि गॅसचे सेंटर उभे करणे कंपनीला सोपे होते. त्यामुळे या जागेचा आग्रह धरण्यात आला होता. परंतु, रेडिरेकनरच्या दरावरून महापालिकेसोबत चर्चा सुरू होती. अखेरीस केंद्र आणि राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर अखेर एकमत झाले आहे. महापालिकेने सदरची जागा देण्यास संमती दिली असून त्यासाठी अडीच टक्के रेडिरेकनर दर लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे गॅससह सीएनजी पुरवठ्याच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे.

महासभेवर प्रस्ताव येणार

महापालिकेकडून अडीच टक्के रेडिरेकनर दराने सदरची जागा १५ वर्षांच्या कराराने दिली जाणार आहे. महापालिकेला या जागेची गरज २०४१ नंतर भासणार आहे तोपर्यंत कंपनीला गॅस डेपोसह सीएनजी डेपोसाठी ही जागा दिली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच महासभेवर सादर केला जाणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर करारनामा होऊन तात्काळ डेपोचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शहर बससेवेची अडचण दूर होण्यासह शहरात गॅसपुरवठा करण्यासाठीचा मार्गही मोकळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डीसाठी आडगावला साकारणार क्रीडा संकुल

$
0
0

सव्वा तीन कोटींच्या निधीला मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कबड्डी खेळाची दीर्घ परंपरा असलेल्या आडगावने राष्ट्र, राज्य आणि जिल्हास्तरावरील अनेक कबड्डी खेळाडू दिलेले आहेत. कबड्डी खेळाच्या जोरावर येथील युवकांनी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविला आहे. या खेळाला आणखी चालना देण्यासाठी आडगावला अडीच एकरमध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. महापालिकेने या क्रीडा संकुलासाठी ३ कोटी २७ लाख रुपये मंजूर केले आहे.

आडगावची कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळख जाते. कबड्डीत प्रावीण्य मिळविणाऱ्या अनेक खेळाडू सध्या पोलिस शिपाई ते पोलिस अधिकारी, सैन्यदल, शिक्षक, प्राध्यापक, विविध सहकारी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. या गावातील सुमारे ३०० मुले आणि ५० मुली ब्रह्मा स्पोर्टस क्लबच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचा नियमित सराव करीत आहेत. त्यांना आडगाव येथील शाळेच्या मैदानाचा वापर करावा लागत आहे. तेथे सुविधा मिळत नसल्यामुळे आडगावला क्रीडा संकूल असावे, अशी मागणी क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे यांनी केली होती.

सध्या कबड्डीचे पारंपरिक रुप बदलून व्यावसायिक रुप आले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोयी-सुविधांची गरज लक्षात घेऊन ही मागणी करण्यात येत होती. या मागणीचा पाठपुरावा उद्धव निमसे व नगरसेविका शीतल माळोदे यांच्याकडे करण्यात येत होता. त्यांच्या प्रयत्नातून या क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. आडगाव परिसरातील शेरताटी परिसरातील महापालिकेच्या आरक्षित अडीच एकर जागेत हे क्रीडा संकूल साकारणार आहे.

असे असेल संकूल

२ कुस्तीचे मैदान

२ कबड्डीचे मैदान

२ स्टेज

४ गॅलरी

हॉल

उद्यान

जॉगिंग ट्रॅक

धावपट्टी

प्रशस्त पार्किंग

५० खेळाडूंची निवासाची व्यवस्था

....

आडगावचे १५० कबड्डी खेळाडू सध्या पोलिस दलात आहेत. सध्या २ खेळाडूंची राज्यस्तरीय तर २ खेळाडूंची प्रो-कबड्डीसाठी निवड झालेली आहे. या खेळाचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी त्यांना मैदानाबरोबरच इतर सुविधा मिळून देण्याच्या दृष्टीने आडगावला सुसज्ज क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे.

-उद्धव निमसे, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसारा घाटाची ‘कोंडी’

$
0
0

जुन्या घाटाबरोबरच आता नव्या घाटावरही पडल्या भेगा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-मुंबई या शहरांना जोडणाऱ्या कसारा घाटाची पावसाने पुरती दैना केली आहे. जुन्या कसारा घाटातील रस्त्याला भेगा पडल्यानंतर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे नव्या कसारा घाटातील रस्त्यावरच वाहतूक पूर्णपणे अवलंबून आहे. पण, आता या रस्त्यावरही भेगा पडल्या आहेत. त्यातच मंगळवारी पहाटे ट्रक फेल झाल्याने वाहतूक दुपारी एक वाजेपर्यंत मंदगतीने सुरू होती. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मागील ८० वर्षांचे सर्व रेकॉर्ड ब्रेक पाऊस घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या भागात झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो मुंबई आग्रा हायवेवरील कसारा घाटाला. मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील रस्ता खचला. त्यामुळे प्रशासनाला हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. सातत्याने कोसळणाऱ्या तुफान पावसात नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यातच नव्या कसारा घाटातील रस्त्यालाही आता भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुसरा रस्ताही अडचणीत सापडला आहे. तसेच मंगळवारी (दि. ६) पहाटे घाटातच एक ट्रक फेल झाला. अगदी काही वेळातच वाहनांच्या रांगा लागल्या. अत्यंत धिम्या पद्धतीने वाहतूक सुरू करण्यात घोटी हायवे मदत केंद्रातील पोलिसांना यश मिळाले. बंद असलेल्या मार्गावरून अगदी हलक्या स्वरूपाच्या वाहनांना सोडण्यात आले. यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. ट्रक हटविण्यासाठी क्रेन घेऊन जाणे हे सुद्धा पोलिसांसाठी आवाहन ठरले. ट्रक हटवेपर्यंत तब्बल दुपारचे एक वाजले होते.

हायवे पोलिसांची वाऱ्यावर वरात

घोटी हायवे पोलिस केंद्रात २५ ते ३० कर्मचारी असून, दोन शिफ्टमध्ये हे पोलिस वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघातसमयी मदत करणे आदी महत्त्वाची कामे करतात. घोटी टॅब ते कसारा हे किमान १० ते १२ किलोमीटरचे अंतर आहे. कासारा घाटात वेगवेगळ्या समस्या सध्या उद्भवत असताना या केंद्रातील पोलिसांकडे सरकारी वाहन उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर येते आहे. हे वाहन २५ जुलै रोजी काढून घेण्यात आले. तेव्हापासून भरपावसात कसारा घाटात पोहचणे आणि मदत करणे हे हायवे पोलिसांसाठी दिव्य ठरते आहे. पावसात दुचाकीवर जाणे निव्वळ अशक्य आहे. खासगी वाहनांनी मदत केल्यास कसारा घाटापर्यंत पोहचता येते. रात्री तर खासगी वाहनेही मदतीला उभी राहत नाही. त्यामुळे किमान १० ते १२ किलोमीटर अंतर पायी चालून कसारा घाटापर्यंत पोहचता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांची मदत वेळत मिळत नसल्याने येथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहेत. तरी, संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वाडे कोसळले

$
0
0

आतापर्यंत तब्बल नऊ वाडे कोसळले; सुदैवाने जिवीतहानी टळली

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुने नाशिक भागातील नाव दरवाजा येथील पाच वाडे एकमेकांवर आदळून कोसळले. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी पाटील गल्लीतील एका वाडा, तर दिवसभरात पंचवटी, गाडगे महाराज पूल, संताजी मंगल कार्यालय या प्रत्येक परिसरातील एका वाड्याची भिंत कोसळली. या सर्व घटनांमुळे धोकादायक वाडे कोसळण्याची मालिकाच सुरू झाली असून, सुदैवाने वाडे कोसळण्यापूर्वी येथील रहिवाशांनी स्थलांतरीत केल्याने जिवीतहानी टळली. दिवसभरात सहा वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

सोमवारी (दि. ५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा येथील भालेराव वाड्याचा काही भाग दीक्षित वाड्यावर, दीक्षित वाड्याचा भाग कुलकर्णी वाड्यावर, तर या सर्व वाड्यांचा भाग शेजारी असलेल्या तेलाच्या गिरणीवर पडल्याने एकाचवेळी पाच वाडे कोसळले. रविवारी (दि. ४) याच भागातील जोशी वाडा कोसळला होता. मंगळवारी (दि. ६) सकाळी या वाड्यांचा ढिगारा उपासण्याचे काम सुरू असताना पाटील गल्लीतील भांगरे वाड्याचा काही भाग कोसळला. यामुळे दिवसभरात सहा वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या सर्व वाड्यातील रहिवाशांनी स्थलांतरीत केले असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, वाडे कोसळण्याची मालिका सायंकाळपर्यंत सुरू होती.

दुपारनंतर पंचवटी कारंजा येथील शिंदे वाडा, गाडगे महाराज पुलाजवळील गरूड वाडा आणि संताजी मंगल कार्यालय येथील पाटील वाड्याची भिंत कोसळली. यानुसार रविवार ते मंगळवार या कालावधीत जुने नाशिकमध्ये तब्बल नऊ वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. रविवारी गोदामाईला आलेला महापूर आणि अतिवृष्टीमुळे या वाड्यांचा भाग ढासळला असून, ही मालिका सुरूच आहे. नाव दरवाजा भागातील हिंगणे आणि पंचाक्षरी हे दोन्ही वाडे केव्हाही कोसळण्याची शक्यता असून, या वाड्यांसह इतर सर्व धोकादायक वाड्यातील रहिवाशांना त्वरित स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

...

स्थलांतर सुरूच

वाडे कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह महापालिका, अग्निशमन दल, पोलिस आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक वाड्यांची पाहणी केली. मंगळवारी सकाळी जुने नाशिक भागातील वाड्यांची पाहणी करताना त्वरित वाडे खाली करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी दिल्या. यानंतर नाव दरवाजासह इतर भागातील धोकादायक वाड्यांतील रहिवाशांनी स्थलांतरास सुरुवात केली.

...

वीजपुरवठा खंडित

वाडे कोसळण्याची मालिका सुरू असल्याने मदतकार्यात अडथळा नको म्हणून जुने नाशिक भागातील वीजपुरवठा मंगळवारी दुपारी खंडित करण्यात आला. सोमवारी रात्री काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या ठिकाणच्या मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या.

...

महापुराच्या पाण्यामुळे वाड्याचा पाया खचला. सुरक्षेच्या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच भालेराव वाडा रिकामा केला होता. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी ढिगाऱ्याखाली संसारोपयोगी वस्तू अडकून मोठे नुकसान झाले आहे.

- प्रशांत बागूल, भालेराव वाड्यातील रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६३७ मेट्रिक टन कचरा उचलला

$
0
0

नाशिक : महापुरानंतर रामकुंडासह गोदाकाठावर पालिकेच्या आरोग्य विभागाने साफसफाई करीत दोन दिवसांत २८ ट्रॅक्टर गाळ उपसला. तसेच शहरातून ६३७ मेट्रिक टन कचरा संकलित केला आहे. गाळ साफ करण्यासाठी तब्बल २८ जेसीबींचा वापर करण्यात आला. अग्निशमन दलाच्या २२ बंबाद्वारे रस्त्यांवरील गाळ स्वच्छ करण्यात आला. शहरातील ५१ ठिकाणांहून पाणी उपसण्यात आले. गोदाघाट परिसरासह शहरातील कचरा गोळा करण्यासाठी २४४ घंटागाड्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पावसाची विश्रांती

$
0
0

नाशिक : गेले तीन दिवस जोरदार मुसंडी मारणाऱ्या पावसाने मंगळवारी काहीकाळ विश्रांती घेतल्याने जिल्हावासियांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे काही क्षणांसाठी का असेना सूर्यदर्शन झाल्याने नागरिक सुखावले. शहरात दिवसभरात अवघा दोन मिलीमीटर पाऊस झाला. तर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत ७९५.६ मिमी पावसाची नोंद झाली.

३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत पावसाने जिल्हावासियांना अक्षरश: झोपडून काढले. नदीकाठच्या रहिवाशांसह चांदोरी, सायखेडा, चाटोरी आणि आसपासच्या गावातील रहिवाशी या पुरामुळे बाधित झाले. पावसाने आठवडाभरापासून मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सुमारे ७९६ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

संबंधित वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली फोटो ओळ

$
0
0

सांगली शहरातही पुराचे पाणी शिरले असून, ज्या रस्त्यांवर दररोज गाड्या फिरतात तेथे बोटी फिरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापार्क नव्हे, कचरा घाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात झालेल्या अतिवृष्टी आणि गोदावरीच्या महापुराचा फटका गोदापार्कला बसला असून, येथील झाडांसह कथडे वाहून गेले आहेत. गोदापार्कची माती वाहून गेल्याने येथील झाडे पडली असून, रस्ताही खचला आहे. तसेच पुराच्या पाण्यात वाहून आलेला गाळ रस्त्यावर साचला असून, तेथील झाडांवर, पथदीपांवर आणि इतरत्र मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेला हा गोदापार्क नव्हे, तर कचरा घाट म्हणण्याची वेळ आली आहे.

गंगापूररोडवरील सावरकरनगर लगत असलेल्या गोदापार्कची दुरवस्था झाली आहे. येथील शहीद अरुण चित्ते पुलाच्या संरक्षक भिंतीसह लोखंडी पाइप वाहून गेले आहेत. यामुळे पुलावर उभे राहणेदेखील धोक्याचे झाले आहे. तसेच आनंदवल्ली ते चोपडा लॉन्स भागातील गोदापार्कलगतची माती वाहून गेल्याने येथील झाडेदेखील गोदापात्रात पडली आहेत. गोदापात्राला असलेला संरक्षक दगडी बांधदेखील पुरात वाहून गेल्याने पादचाऱ्यांना नदीकाठाहून चालणे कठीण झाले आहे.

...

- झाडांसह कथडे वाहून गेले; रस्ताही खचला

- फरश्या गेल्या वाहून, कट्ट्याची दुरवस्था

- सुयोजित गार्डन येथील वनविभागाच्या रोपांचे नुकसान

- पथदीपांचे खांब जमीनदोस्त

- फूटपाथवरील पेव्हर ब्लॉक निघून फूटपाथ तुटला

- सायकल स्टँड गायब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत

$
0
0

आमदार देवयानी फरांदे यांचे तहसीलदारांना निर्देश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि रविवारी गोदावरी, नंदिनी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्त भागाची आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासोबत पाहणी केली. नुकसान झालेल्या नागरिकांचे तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहेत. शासन नियमाप्रमाणे पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे सांगत जुने नाशिकमधील वाडेधारकांनाही आर्थिक मदत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

गेल्या आठ दिवसांत नाशिक शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला. गोदावरी पुरामुळे शहरातील गावठाणसह झोपडपट्ट्यांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरांची पडझडही झाली आहे. पुराच्या पाण्याने घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजही जुन्या नाशकातील सोमवारपेठेतील भालेकरवाडा, दीक्षित वाड्यासह पाच सहा वाडे कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या भागाची आमदार फरांदेनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना बोलावून घेत या वाड्यांचेही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासाही दिला.

गोदावरी पूरबाधित शिंदे मळा, काझीगढी, मल्हारखाण, आंबेडरकरवाडी, अमरधाम ते तपोवन परिसर, गोदावरीनगर, गंगावाडी, मिलिंदनगर, उत्कर्षनगर, शिवाजी वाडी, आगरटाकळी, जोशीवाडा, अशोकनगर अशा विविध वस्त्यांमधे पुराचा प्रभाव झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्त कुटुंबीयांच्या घरांचे तातडीने पंचानामे करण्याचे आदेश संबंधित भागातील तहसीलदारांना आमदार फरांदे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दिवसांत शहर स्वच्छ करा

$
0
0

सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांचे निर्देश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापूर ओसरल्यानंतर शहरात रोगराईचे संकट उभे ठाकले असून, येत्या आठ दिवसांत शहर स्वच्छ करा, असे आदेश वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाला दिले आहेत. शहरातील स्वच्छता करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, पडून असलेल्या भंगारात डेंग्यूंच्या अळी पोसल्या जात असून, शहरातील सर्वचं भंगार, टायर विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटीस बजावण्यासह पोलिसांत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नव्याने गठीत झालेल्या वैद्यकीय व आरोग्य समितीची पहिलीच बैठक मंगळवारी सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला उपसभापती अंबादास पगारे, सदस्य चंद्रकांत खाडे, अर्चना थोरात, सुवर्णा मटाले, आशा तडवी उपस्थित होते. कचरा वर्गीकरणातील दुजाभाव नगरसेवक अॅड. श्‍याम बडोदे यांनी उघड केला. घंटागाडीत कचरा वर्गीकरणाची सोय झाल्यानंतरच दंडात्मक कारवाईच्या सूचना यावेळी सभापतींनी दिल्या.

महापुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता करण्याचे आदेश देत शहरात आठ दिवसांत स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देणे, रजा नामंजूर करणे, प्लास्टिक बंदीची कारवाई करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कचरा वर्गीकरणाबाबतीत सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होत असली तरी घंटागाडी चालकांकडून लॉन्स, हॉटेल व धाबे यामधून कचरा संकलित करताना वर्गीकरणाचे निकष पाळले जात नसल्याची बाब गांभीर्याने घेत कारवाईच्या सूचना दिल्या.

...

आयुक्तांच्या फोननंतर बैठक गुंडाळली

महापुरामुळे शहरात निर्माण झालेली रोगराई व अस्वच्छता आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत सभापती डॉ. कुलकर्णी यांनी बुधवारी आरोग्य व वैद्यकीय समितीची बैठक तब्बल सव्वादोन तास घेतली. स्वच्छतेशी संबंधित अधिकारी व स्वच्छता निरीक्षकासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीत गुंतल्याने स्वच्छतेचे कामकाज ठप्प झाले होते. शहरातील कामे खोळबंल्यानंतर अखेरीस आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठक आटोपती घ्या, असा फोन सभापतींना केला. आयुक्तांच्या या फोननंतर मात्र सभापतींनी घाईघाईत बैठक गुडांळत चर्चा आटोपती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेघरांना निवारा देण्याची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुसळधार पावसामुळे आणि रविवारी आलेल्या महापुरामुळे शहरात बिकट परिस्थिती झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे आनंदवली ते मल्हारखान दरम्यान गोदाकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने स्थानिक बेघर झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

शहरातील महापूर ओसरल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेत निवेदन सादर केले. गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने शहरातील नद्या व उपनद्यांना महापूर आल्याने गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरे, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, धोकादायक घरे पडली. त्यामुळे नागरिकांचेही नुकसान झाले आहे. कचरा, गाळ व चिखलामुळे निर्माण झालेली रस्त्यांची कोंडी तात्काळ दूर करावी, साथ रोग होऊ नये म्हणून शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, त्यासाठी सर्व विभागांना तत्काळ आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली.

यावेळी गोदावरी, नंदिनी, वालदेवी, दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे स्थानिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करीत त्यांना आर्थिक मदत देण्याची गरज असे आशयाचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूरबाधितांना धावाधाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदेच्या पुरामुळे बाधित झालेल्या नदीकाठावरील आणि पूरग्रस्त भागातील रहिवाशी मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. यासाठी महसूलमधील तलाठी आणि महापालिका अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली १२ संयुक्त पथके तयार करण्यात आली असून या पथकांनी दारोदारी जाऊन पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.

वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांच्या कणा कवितेची आठवण व्हावी अशा स्मृती गोदामाईने यंदाही नाशिककरांच्या हृदयात कोरल्या आहेत. पाहुणी म्हणून आलेली ही गोदामाई ओसंडून वाहिली. अनेकांच्या घरांमध्ये, व्यावसायिक आस्थापनांमध्ये माहेरवाशीण पोरीसारखी नाचली. होते नव्हते ते समवेत घेऊन गेली. यामुळे शहरातील अनेक कुटुंब शब्दश: उघड्यावर आली आहेत. या महापुरामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. पूरबाधित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी या कुटुंबांना नुकसानातून सावरता यावे, यासाठी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. शहरात ३ ते ५ ऑगस्ट या काळात पुरामुळे बाधित झालेल्या नदीच्या दोन्ही काठालगतच्या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी १२ पथके नेमण्यात आली आहेत.

गंगावाडी, जोशीवाडा परिसर, गोदावरीनगर, सरदार चौक, गंगाघाट, क्रांतिनगर (रामवाडी), शिंदे मळा, मरिमाता मंदिर परिसर, अमरधाम ते तपोवन रोड, टाळकुटेश्वर मंदीर, शितळा देवी परिसर, गाडगे महाराज धर्मशाळा परिसर, मोदकेश्वर वसाहत, रोकडोबा मंदिर परिसर, मोदकेश्वर मंदिर, खैरेगल्ली परिसर, दहीपूल व बालाजी कोट पिंपळचौक परिसर, सराफ बाजार, राम सेतूजवळील परिसर, मल्हारखान झोपडपट्टी या परिसरात ही पथके स्थळ निरीक्षण करणार आहेत. सकाळी आठ वाजता या पंचनाम्यांना सुरुवात करावी. पंचनामे करताना त्याचे जिओ टॅगिंग देखील करणे अनिवार्य आहे. संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हीडिओ शुटींग करावे, अहवाल वस्तुस्थिती दर्शक असावा आणि त्यावर बाधित व्यक्तीची स्वाक्षरी असावी, संयुक्त पंचनाम्यासोबत बाधित व्यक्तीचे आधारकार्ड जोडावे तसेच पंचनाम्यावर दोन पंचांची नावे, पत्त्यासह स्वाक्षरी असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अतिक्रमितांवर टांगती तलवार

पंचनामे करताना संबंधित बाधित व्यक्ती रहात असलेले घर अधिकृत आहे की अनधिकृत हे पाहून घ्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधित पथकांना दिले आहे. काही घरे अतिक्रमित असण्याची शक्यता असून त्याबाबतची माहिती या पथकांना नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे अनधिकृतरित्या किंवा अतिक्रमित जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना मदत मिळणार की नाही असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. मंत्रालय स्तरावरील बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या आढाव्याबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली जाणार आहे. त्यात मदतीबाबतचे निकष स्पष्ट होऊ शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तलाठी कार्यालये बंद

महसूलमधील तलाठी पंचनाम्यांच्या कार्यालयात गुंतून पडल्याने तलाठी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी एखादा तास तलाठी उपलब्ध होऊ शकतात. पंचनाम्यांची कामे पूर्ण झाली की पुन्हा तलाठी कार्यालयांमधील कामे नियमित सुरू होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पथकात यांचा समावेश

- दोन तलाठी

- कोतवाल

- महापालिकेचे सहायक अभियंता

- कनिष्ठ अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना आसरा देत मानवधर्माचे पालन

$
0
0

बौद्ध विहारासह चर्चकडून पुढाकार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वालदेवी नदीला आलेल्या पुरात सर्वस्व गमावलेल्या येथील विविध जाती धर्माच्या कुटुंबांना तीन दिवसांपासून बौद्ध विहार आणि चर्चने मात्र निवारा दिला आहे.

वालदेवी नदीला आलेल्या पुराचे पाणी मालधक्का रविवारी राजवाड्यात घुसले. जवळपास अडीचशे ते तीनशे नागरिकांचे घरे पाण्यात गेली. यापैकी बहुतेकांचे संसार पुरात वाहून गेले. काही नागरिकांच्या दुकानातील हजारो रुपायांचे साहित्य खराब झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. अंथरुण पांघरुनही राहिले नाही. घरातील धान्य, कपडे, किचनमधील साहित्य, टीव्ही, फर्निचर असे सर्व साहित्य पाण्यात भिजले. दुसऱ्या दिवशी पाणीपातळी कमी झाल्यावर नागरिकांना नुकसानीचा अंदाज आला. सर्व नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात चिखल-गाळ वाहून आल्याने या नागरिकांना बसण्यासाठीही उसंत मिळाली नाही.

वालादेवीचे पाणी घरात शिरलेल्यापैकी ५० ते ६० कुटुंबांना दोन दिवसांपासून पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्नही उपलब्ध होऊ शकले नाही. लता पाईक, संगीता वाघमारे, नजमीन पठान, खैरुन्निसा सय्यद, जयरुन्निसा मन्सुरी, ज्योती इंगळे, माया पगारे, लता सोनवणे, मंदा कदम यांचा संसारच पुराच्या पाण्यात वाहून गेला. सुमन रिपोरटे यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह पाळीव बकऱ्याही पुरात नाहीशा झाल्या. मनोज बत्तीशे यांच्याही घराची भिंत ढासळली. यातील बहुतेक नागरिक बौद्धविहार चर्चमध्ये वास्तव्याला आहेत.

वालदेवीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने संपूर्ण संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. खाण्यासाठी धान्यही शिल्लक राहिलेले नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून बौद्ध विहारातच आसरा घेतला आहे.

- नाजमीन पठाण, नागरिक

धान्य, कपडे, कागदपत्रे सर्व काही डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेले. आता चूल पेटवण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापालिका प्रशासनानेही ऐन संकटाच्यावेळी माणुसकी दाखवायला पाहिजे होती.

- खैरुन्निसा सैय्यद, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत १६ पासून श्रीकृष्ण जन्मोत्सव

$
0
0

पंचवटीत १६ पासून श्रीकृष्ण जन्मोत्सव

नाशिक : चतु:शाखीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्टतर्फे दि. १६ ते दि. २४ ऑगस्ट या कालावधीत श्री योगेश्वर श्रीकृष्ण जन्मोत्सव-२०१९ रंगणार आहे. पंचवटीतील सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात हा उत्सव होईल. त्यात दि. १८ रोजी भजन, गीता पाठांतर स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, दि. २३ रोजी मंत्रजागर हे कार्यक्रम होतील. मोहन उपासनी प्रस्तुत वेणुनाद हा कार्यक्रम दि. २३ रोजी रात्री साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत होईल. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. दि. २४ रोजी सकाळी साडेदहा ते १२ वाजेदरम्यान दिगंबर काशीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. उत्सवकाळात दररोज रात्री ९ ते १० डॉ. एकनाथ कुलकर्णी आणि डॉ. अनिता कुलकर्णी श्रीकृष्ण कथामृत वाचन व निरूपण करतील.

--

बासरीवादन स्पर्धा चतु:शाखीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्टतर्फे

नाशिक : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट, महाविद्यालयीन विद्यार्थी एक गट व खुला वयोगट अशा चार वयोगटांमध्ये बासरीवादन स्पर्धा रंगणार आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पंचवटीतील सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता ही स्पर्धा होईल. विजेत्या स्पर्धकांना ३०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहन रानडे, अॅड. मनोहर पुजारी, सुभाष जोशी आदींनी कळविले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी धनंजय जोशी यांच्याशी ९८६०६८५८२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना रस्त्याने चालणेदेखील मुश्किल झाले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला.

शहरात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या चांदवडकर गल्ली, सराफ बाजार, भांडीबाजार, कापडबाजार, गंगावाडी, तांबट घाट या परिसरात पुराचे पाणी पोहचले. हे पाणी सोमवारी ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला. सराफ बाजार, कापड बाजार, भांडी बाजार, चांदवडकर गल्ली येथील दुकानदारांनी व तांबट घाट, गंगावाडीतील रहिवाशांनी घरातील चिखल बाहेर काढून रस्त्यावर टाकला. रस्त्यावरचा हा चिखल हटवणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिकरीचे झाले. यासाठी विविध ठिकाणी जेसीबी लावण्यात आले. सोमवार सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. द्वारकेकडून अमरधामकडे येणाऱ्या रस्त्यावरदेखील चिखलाचे साम्राज्य होते. या परिसरातून दुचाकी नेणेदेखील अवघड झाले होते. शहरातील अमरधाम रोड, गंगावाडी, सरदार चौक, सराफ बाजार, गंगावाडी, नेहरू चौक, नाव दरवाजा, अशोक स्तंभ, घारपुरे घाट या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य होते.

सिटी सेंटर मॉल परिसरातील गाळ काढण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. शहरातील चार पूल पाण्याखाली गेले होते. कामटवाडे परिसरातील आयटीआय पुलावरून प्रशासनाने चिखल काढला. एकंदरीतच हा चिखल दुर करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला निदर्शने

$
0
0

नाशिकरोड : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व टीव्ही अँकर सिध्दार्थ कनन यांनी प्रसारमाध्यमातून वाल्मीकी समाजाबदल अपशब्द वापरल्याने त्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय वाल्मीकी नवयुवक संघातर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. त्यांच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल बहोत, राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढकोलिया, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र बागडे, महासचिव रामनिवास बेद आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images