Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तीन युवती शहरातून बेपत्ता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून १६ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. यामध्ये दोन मैत्रिणी तर एका बाल निरीक्षण गृहातील मुलीचा सामावेश आहे. या प्रकरणी अंबड तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोरवाडी परिसरातील १६ वर्षांच्या दोघी मैत्रिणी बुधवारी (दि. ३१) पहाटे ३ वाजेच्या सुमारास गायब झाल्या आहेत. या प्रकरणी अपहृत मुलीच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने फूस लावून दोघींचे अपहरण केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल अधिक तपास करत आहेत. दुसरी घटना गुरुवारी (दि.१) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर १६ वर्षांची युवती मुलींच्या निरिक्षणगृहात राहत होती. बाल निरीक्षण गृहातून ती गडकरी चौकातील रमाबाई कन्या विद्यालयात शिक्षणासाठी जात होती. रोजच्या प्रमाणे ती शाळेसाठी म्हणून गेली. मात्र, ती शाळेत पोहचलीच नाही. युवतीच्या आईच्या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक पी. पू. शिंदे करत आहेत.

... म्हणून गुन्ह्यांचा आलेख वाढलेला

या घटनांच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की १८ वर्षांपर्यंतच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार आल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातून दिवसाला किमान एक ते दोन मुल किंवा मुली बेपत्ता होतात. बऱ्याचदा घरच्याशी वाद, अभ्यासाचे कारण, प्रेमप्रकरण यामुळे मुली घर सोडतात. पोलिसांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध सुरू असतो. मुलांचा शोध लागेपर्यंत संबंधित तपासाधिकारी प्रकरणाचा तपास करतात. दरम्यान, अनेक प्रकरणात अशी मुले स्वत:च घरी परततात. तर काहींमध्ये मुलांचे कुटुंबीय त्यांना शोधून काढतात. मात्र, मुले सापडल्याची माहिती पोलिसांना दिली जात नाही. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यांचा आलेख सतत वाढलेला दिसतो, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणुकीचे केंद्र नाशिक!

$
0
0

१७ बनावट खात्यांमधून व्यवहार करणारे पाच संशयित अटकेत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलचा चॉईस क्रमांक देण्याच्या आमिषाने राज्यासह देशभरात उच्चभ्रू व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील टोळीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत या पाच जणांना अटक केली. तब्बल १७ बनावट खात्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींनी एक कोटी सहा लाख ५३ हजार ८७२ रुपयांची उलाढाल झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येते आहे.

ऑनलाईन फ्रॉडचे नवनवीन प्रकार सतत घडत असतात. यातील बहुतांशी आरोपी हे उत्तर पूर्व भारतात बसून हे उद्योग करतात. विशेषत: दिल्ली आणि मुंबईत सुद्धा या टोळ्या सक्रिय आहेत. मात्र, मोबाइल चॉईस क्रमांक देण्याचे आमिष दाखवून भारतातील विविध राज्यातील नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार प्रथमच समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शरद पंडित पगार (बाभळेश्वर अपार्ट. कल्पतरूनगर, अशोकामार्ग), अंकुश सुभाष लोळगे (रा. आदर्शनगर, मोशी, जि. पुणे), पंकज तुकाराम निकम (रा. पाडदळे, ता. मालेगाव), नाजेश ईस्मत झवेरी (२५, रा. मीरा रोड, जि. ठाणे) आणि जेन तसनीन खान (२३, रा. डोंबविली पूर्व, जि. ठाणे) या सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीतील आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, निरीक्षक आनंद वाघ उपस्थित होते.

१७ बँकांमध्ये व्यवहार

शहरातील शरद पंडित हा फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध बँकांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात असताना त्याची ओळख झवेरीशी झाली. तिथे या दोघांनी मोबाइल चॉईस क्रमाकांच्या फसवणुकीच्या उद्योगाची पायाभरणी केली होती. या टोळीने शहरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल १७ बँक खाते उघडली होती. यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यात आली होती.

या गुन्ह्याची व्याप्ती वाढू शकते. अशा प्रकारे फसवणूक झालेली असल्यास नागरिकांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडण्यात आलेले असल्याने या प्रकरणी बँकांनाही सूचना करण्यात येणार आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा फसवणुकीपासून वाचायला हवे.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडच्या कामावर ठपका

$
0
0

जलवाहिन्या टाकताना खबरदारी घेतली नसल्याचे पत्र

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाबाबत आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच कंपनीला आरसा दाखवला आहे. तब्बल २० कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या स्मार्ट रोडच्या कामात महापालिकेच्या जलवाहिन्या टाकताना योग्य ती काळजी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासंदर्भातील पत्रच पाणीपुरवठा विभागाने कंपनीला पाठवले असून, जलवाहिन्यांसाठी आवश्यक ती खोली न ठेवल्याने भविष्यात रस्ता खोदण्याची गरज पडेल, असा धोक्याचा इशारा दिला आहे.

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. कामास विलंब झाल्यानंतर ठेकेदाराने घाईत काम उरकण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून आंदोलने सुरू झाली आहेत. आता स्मार्ट रोडच्या निकृष्ट कामावरून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्मार्ट कंपनीच्या सीईओंना आरसा दाखवला आहे. स्मार्ट रोडच्या बाजूने ३०० ते ४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्रॉस कनेक्शन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी २७ जुलै रोजी त्याची पाहणी केली. त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या ४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कोणतेही कुशन न ठेवता त्र्यंबक नाका सिग्नलजवळ टाकलेली आढळली. विशेष म्हणजे १.२० ते १.५० मीटर खोलीपर्यंत जलवाहिनी टाकणे अपेक्षित होते. मात्र असे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे पाण्याच्या दाबामुळे संबंधित वाहिनी भविष्यात नादुरुस्त होण्याची भीतीही पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जलवाहिनीचे हायड्रोलिक टेस्टिंग केल्यानंतरच क्रॉस कनेक्शन द्यावे, अशा सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्या. विशेष म्हणजे सदरच्या सूचना लेखी स्वरुपात करण्यात आल्या असून, आता ठेकेदाराच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

...

आज स्मार्ट रोड विरोधात मानवी साखळी

स्मार्ट रोडचे निकृष्ट दर्जाचे काम, उंच सखल रस्ता, काम पूर्ण करण्यात वर्षभरापेक्षाही अधिक काळ झालेला विलंब, या कालावधीत चाकरमाने व व्यापारीवर्गाचे झालेले हाल यावरून काँग्रेसेच पालिकेतील गटनेते आणि स्मार्ट सिटीचे संचालक शाहू खैरेंनी आंदोलन सुरू केले आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जा आणि कंपनीकडून ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याने आज, शनिवारी सकाळी १० वाजता मानवी साखळी करून येथील भ्रष्टाचाराला वाचा फोडली जाणार आहे. सकाळी दहा वाजता सर्वप्रथम अशोकस्तंभ येथे सर्व घटक जमा होणार असून, त्यानंतर काळ्या फिती लावून सीबीएसच्या दिशेनेही मानवी साखळी पसरणार आहे. जिल्हा न्यायालयातील वकील तसेच संघटना, बिटको महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी, शासकीय कन्या विद्यालय, पेठे हायस्कूल, सारडा कन्या विद्यालयाचे विद्यार्थी, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोडवरील व्यापारी, हॉकर्स, विक्रेते आदी या मानवी साखळीत सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत रजनीची सोमवारी रंगत

$
0
0

नाशिक : स्व. किशोर कुमार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे सोमवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'द मोस्ट वॉन्टेड किशोरकुमार' या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास पोलिस आयुक्त विश्वास नागरे-पाटील व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची उपस्थिती असेल. किशोरकुमार यांचा ४ ऑगस्टला जन्म दिवस असतो. त्यानिमित्त आत्जित कार्यक्रमात स्थानिक कलावंत आपल्या सुमधुर आवाजात किशोरकुमार यांचा जीवनपट उलगडतील. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड, अध्यक्ष फारुख पिरजादे, सचिव सुनील ढगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ५६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. शहरात दिवसभरात अवघा ३.७ मि.मी. पाऊस झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नाशिककरांवर मेहेरबान असून, जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांत पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ५६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्र्यंबेकश्वरमध्ये १९३ मि. मी. पाऊस पडला. इगतपुरीत १५७, पेठमध्ये १०७, तर सुरगाण्यात ५०.१ मि. मी. पावसाची नोंद झाली. नाशिक तालुक्यात १७.३ आणि सिन्नर तालुक्यात १४ मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

...

निम्म्या तालुक्यांतून पाऊस गायब

देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव आणि बागलाण तालुक्यात पावसाने गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतली. चांदवडमध्ये तीन, निफाडमध्ये २.६, तर कळवणमध्ये २ मि. मी. पावसाची नोंद झाली.

...

सूर्यकिरणांच्या दर्शनाने शहरवासी सुखावले

श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, श्रावण सरींचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. विशेष म्हणजे सकाळी काही वेळ सूर्यनारायणाचेही दर्शन घडल्याने नागरिक सुखावले. गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या कालावधीत शहरात १८ मि. मी. पावसाची नोंद झाली. परंतु, पावसाचा जोर अधिकच ओसरला. सायंकाळी साडेपाचपर्यंत अवघ्या ३.७ मि. मी. पावसाची नोंद झाली.

...

धरणांमधून पाणी सोडणे सुरूच

गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारीदेखील या धरणांमधून पाणी सोडण्यात येत होते. सकाळी सात वाजता दारणा धरणातून १३ हजार १२४ क्युसेकने, तर भावलीतून ९४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. गंगापूरमधून ३ हजार १६८ क्युसेकने विसर्ग सुरू होता. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने सकाळी नऊ वाजता ५ हजार ३१० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. दुपारी १२ वाजता ६ हजार ४३४ क्युसेकने, सायंकाळी पाच वाजता ७ हजार ८३० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता आळंदी धरणातूनही ६८७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वाड्यांच्या कोसळल्या भिंती

$
0
0

जुन्या नाशिकमधील घटना

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुने नाशिक परिसरात शुक्रवारी दिवसभरात दोन वाड्यांच्या भिंती कोसळल्या. संभाजी चौक येथील चुंबळे वाडा, तर सोमवार पेठेतील गायधनी वाड्याची भिंत कोसळली. सुदैवाने दोन्ही घटनेत जीवितहानी टळली. पावसाळा सुरू झाल्यापासून जुन्या नाशकातील धोकादायक वाड्यांची भिंत कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका कायम आहे.

शुक्रवारी (दि. २) दुपारी १२ च्या सुमारास संभाजी चौकातील चुंबळे वाड्याची एक भिंत कोसळली. तसेच, सायंकाळी ५.३० वाजता सोमवार पेठेतील वीरबापू गायधनी वाड्याचा पुढील भाग कोसळला. सुदैवाने दोन्ही वाड्यांची भिंत कोसळण्यापूर्वी अपघाताची शक्यता रहिवाशांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही घटनेत वस्तूंचे नुकसान झाले. मात्र, महापालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही धोकादायक वाड्यात रहिवाशी वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम आहे.

जून महिन्यात संभाजी चौकातील काकडे वाडा कोसळून ढिगाऱ्याखाली अडकून तीन जण जखमी झाले होते. यानंतर कांबळे वाडा, पवार वाडा, बालाजी कोट, भोई गल्ली, रोकडोबा महाराज मंदिर या परिसरातील वाड्यांचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. महापालिकेने धोकादायक वाडे खाली करण्याच्या वेळोवेळी सूचना केल्या असून, पुन्हा एकदा वाडे खाली करण्याचे आ‌वाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाववरील पाणीसंकट तूर्तास तळले मालेगावकरांवरील पाणीसंकट तूर्तास तळले तळवा

$
0
0

तळवाडे साठवण तलाव निम्मे भरला

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या आठ दिवसांत चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात समाधानारक पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला होता. गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलाव व तसेच गिरणा धरणातील पाणीसाठा देखील वाढल्याने मालेगावकरांवरील पाणीसंकट तूर्तास तरी टळले आहे.

गेल्या आठ दिवसात चणकापूर, हरणबारी या गिरणा मोसम नदीवरील धरण पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे ३० व ३१ जुलै रोजी पुनद व हरणबारी धरणातून सुमारे २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. बुधवारी हे पूरपाणी मालेगाव हद्दीत आल्याने गिरणानदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच शुक्रवारी देखील चणकापूर धरणातून १४४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणपाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली असून मालेगाववरील पाणीसंकट तूर्तास टळले आहे.

शुक्रवार अखेर चणकापूर धरण ६६ टक्के, हरणबारी ८७ टक्के तर गिरणा धरण ११ टक्के भरले आहे. गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात ही लक्षणीय वाढ झाली आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारे तळवाडे साठवण तलावात देखील ४६ दलघफू इतका पाणीसाठा झाल्याने तलाव निम्मे भरला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तलावात जेमतेम २५ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात येऊन तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसेच तलावात १४ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीसंकट उभे राहिले होते. मात्र गिरणानदीत चणकापूर धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या तलावात ४६ दलघफू इतका पाणीसाठा झाला असून, पुढील दीड ते दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास तरी मालेगावकारांवरील पाणीसंकट टळले आहे.

मोहीम सुरूच राहणार

शहरात अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू असून, शुक्रवारअखेर २०५ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सचिन माळवळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणराव पाटील ‘शिवबंधना’त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात सलग दोन पंचवार्षिकांत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार कल्याणराव पाटील शुक्रवारी मुंबई येथे ' मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत भाजपमधून पुन्हा स्वगृही परतले

आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पाटील पुन्हा शिवसेनेचा झेंडा हातात घेतील अशी चर्चा होती. शिवसेना पक्षप्रमुखांनी सुमारे अर्धा तास पाटील यांच्याशी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीत येथे शिवसेनेचा झेंडा फडकावण्याचे आवाहन करतानाच पाटील यांच्या घरवापसीमुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल, असेही नमूद केले. खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सुनील पाटील, शिवा सुराशे, बाळासाहेब टापसे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे १९९५ आणि १९९९ या दोन पंचवार्षिकांत प्रतिनिधित्व करणारे कल्याणराव पाटील यांनी २००४ मध्ये शिवसेनेकडून लढताना छगन भुजबळ यांना कडवी लढत दिली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००९ मध्ये भुजबळांचे निकटवर्तीय माणिकराव शिंदे यांना शिवसेनेत आणत थेट शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत त्यांनी भुजबळांना मोठा धक्का दिला होता. मात्र, त्यावेळी माणिकराव शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. २०१४ मध्ये भुजबळांविरोधात स्थानिक सर्व नेत्यांनी कल्याणराव पाटलांना अंतर्गत पाठिंबा दिला आणि या जोरावर कल्याणराव यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, त्यांना उमेदवारी न देता शिवसेनेने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पवार यांना उमेदवारी दिल्याने नाराज होत पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांच्या प्रचार सभेदरम्यान उपस्थिती नोंदवत उघडपणे शिवसेना उमेदवाराला विरोध दर्शविला होता. पाटील यांनी नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, तेथे न रमल्याने आता पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भुजबळांसमोर कडवे आव्हान

येवला येथील आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे हे बंधू हे शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य असल्याने शिवसेनेची येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील ताकद वाढलेली असतानाच आता कल्याणराव पाटलांनी घरवापसी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकणार आहे. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले आणि २०१४ मध्ये भुजबळांच्या विरोधात उमेदवारी केलेले संभाजी पवार, येवला पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती रूपचंद भागवत यांच्यापैकी कोणाला भुजबळांच्या समोर उमेदवारी मिळेला का, तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार जर भुजबळच शिवसेनेत आले, तर या इच्छुकांचे काय होणार, असे प्रश्नही चर्चिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी -५

$
0
0

सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी

भारताचा प्रशिक्षक व्हायला आवडेल

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करायला नक्कीच आवडेल. मात्र, त्यासाठी ही वेळ योग्य नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर आरक्षण सोडतीची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर रंजना भानसी यांचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला संपत असून, नवीन महापौरांच्या निवडीसाठी आरक्षण सोडतीची तयारी शासनाकडून सुरू झाली आहे. राज्य नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवत महापौरांचे आरक्षणविषयक तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ७ ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, १५ ऑगस्टपर्यंत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नाशिकचे पंधरावे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यामुळे भानसी यांच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हा येत्या १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. यामुळे नवीन महापौरांच्या निवडीपूर्वी महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १२-१३ सप्टेंबर रोजी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर भानसी यांना मुदतवाढ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, नवीन महापौरपद आरक्षणाच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आरक्षण सोडतीची तयायी नगरविकास विभागाने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिन्यांपासून बिनबोभाट उद्योग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माोबाइल चॉईस क्रमांक प्रकरणात सात जणांच्या टोळीने किमान मागील सहा महिन्यांपासून हा उद्योग सुरू केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

विविध बँका व संस्थाचे रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे बनावट दाखले, आधारकार्ड, बनावट भाडे करार, १३ मोबाइल, एक लॅपटॉप, रबरी स्टॅम्प तयार करण्यासाठी लागणारी मशिन्स एवढे साहित्य घेऊन आरोपींनी फसवणुकीचा उद्योग सुरू केला होता. देशभरातील नागरिकांशी ते वेळोवळी संपर्क साधत होते. एअरटेलचा चॉईस मोबाइल क्रमांक स्वस्तात उपलब्ध करून देतो, असे आमिष ते दाखवत होते. सावज हाती आले, की ते बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइल क्रमांक मिळवून देत असल्याचे भासवित आणि त्या आधारे लाखो रुपये उकळत. विशेष म्हणजे टोळीतील प्रत्येक आरोपीचे काम ठरलेले होते. अंकुश आणि पंकज हे दोघे फक्त बँकेतून पैसे काढणे, बँक खाते सुरू करणे एवढेच काम पाहत होते. या टोळीचे मुख्य सूत्रधार म्हणून शरद पगार आणि झवेरी हे काम पाहत होते.

विंदू दारासिंगच्या कॉलनंतर भांडाफोड

या टोळीने तेलंगणातील हैदराबाद येथील एका व्यक्तीला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. हैदराबाद पोलिसांनी तपास केला असता हे पैसे नाशिकमधील बँक खात्यात आल्याचे समोर आले. फसवणूक झालेली व्यक्ती अभिनेता विंदू दारासिंग यांचा मित्र आहे. त्यामुळे विंदूने लागलीच पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला. यानंतर पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या पथकातील एपीआय महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पुष्पा निमसे, पीएसआय बलराम पालकर, एएसआय पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, येवाजी महाले, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, शांताराम महाले, विशाल काठे, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, शांताराम महाले, रावजी मगर, यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास हाती घेत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणी सोमवारसाठी ७५ जादा बस

$
0
0

तिसऱ्या सोमवारी वाढविणार गाड्यांची संख्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रा‌वण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा ७५ बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला, दुसरा व चौथ्या सोमवारी हे नियोजन केले असून तिसऱ्या सोमवारी वाढणारी गर्दी बघून यात वाढ केली जाणार आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी जवळच्या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली आहे.

नाशिक ते त्र्यंबक हे सुमारे २८ किलोमीटर अंतर असून त्यासाठी प्रौढांसाठी सुधारित भाडे ४० रुपये तर लहान मुलांसाठी २० रुपये असेल. या सर्व बस जुने सीबीएस, निमाणी बस स्थानक व नाशिकरोड येथून जाणार आहे. नाशिक एक आगारातून १३ तर नाशिक दोन आगारातून १२ बस सोडल्या जाणार आहेत. या यात्रेसाठी रविवारी २५ तर सोमवारी ५० बसेस असणार आहे. नाशिकबरोबरच भगूर येथून सर्वतीर्थ टाकेद, इगतपुरी व घोटी येथून सर्वतीर्थ टाकेद व त्र्यंबकेश्वर, कळवण, पिंपळगाव बसवंत येथून श्रीक्षेत्र सिद्धेश्वर, शिरसमणी व पारेगाव येथे बस जाणार आहे. तर मनमाड येथून नागापूर व अनकई बस धावणार आहे. नांदगाव येथून श्रीक्षेत्र जातेगाव येथे बस जाणार आहे. पहिला श्रावणी सोमवार ५ ऑगस्ट, दुसरा १, तिसरा १९ व चौथा २६ ऑगस्टला असणार आहे. त्यामुळे एसटीने नियोजन केले आहे.

इदगाह मैदानासाठी प्रयत्न

एसटीने पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या श्रावणी सोमवारसाठी जुने सीबीएस येथून व्यवस्था केली आहे. या तिन्ही सोमवारी गर्दी कमी असल्याने हा निर्णय घेतला आहे. येथे स्मार्ट रोडचे तर मेळा बसस्थानकावरही काम सुरू आहे. त्यामुळे येथे अडचण होऊ शकते. भाविकांची तिसऱ्या सोमवारी गर्दी जास्त राहणार असल्याने या बस इदगाह मैदान येथून सोडण्यात येणार आहे. पण, त्यासाठी अद्याप महापालिकेची परवानगी मिळालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलाना मुफ्तींचा राष्ट्रवादीला ‘तलाक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करीत अनेक बड्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला असून, मालेगाव मध्यचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मौलाना मुफ्ती इस्माईल यांनीदेखील शुक्रवारी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत 'तलाक' दिला आहे.

संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विधेयकास धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी विरोध न केल्याने आपला भ्रमनिरास झाला असून, त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे मौलाना मुफ्ती यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. मौलाना मुफ्ती हे हजला रवाना झाले असून, तत्पूर्वी शुक्रवारी उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. महापालिकेत राष्ट्रवादीतून निवडून आलेले आणि नंतर महागठबंधन आघाडीत सामील झालेले सर्व नगरसेवक आपल्या सोबत असून, त्यांनी राजीनामे दिले नसल्याचे मौलानांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलाना मुफ्ती प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत असल्याने त्यांचा राष्ट्रवादीशी झालेला 'तलाक' अनेक अर्थांनी सूचक मानला जात आहे.

आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट करताना मौलाना म्हणाले, की केवळ मुस्लिम समुदायास लक्ष्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून तिहेरी तलाक विधेयक आणले गेले. धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी राज्यसभेत या विधेयकास विरोध करून मुस्लिमांच्या बाजूने उभे राहणे अपेक्षित होते. मात्र, खासदार गैरहजर राहिल्याने हे विधेयक मंजूर झाले. त्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला आहे. तीन तलाक यामुळे गुन्हा ठरवला गेला असून, मुस्लिम समुदायावर अन्यायकारक असा हा कायदा मंजूर झाला आहे.

सर्व पर्याय खुले!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलाना मुफ्ती प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. मात्र, मालेगाव मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीत असलेल्या मौलाना मुफ्ती यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे उमेदवारीसाठी ते वेगळा पर्याय निवडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांच्या राजीनाम्याने त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेला बळ मिळाले आहे. यासंदर्भात विचारले असता मौलाना यांनी विधानसभेसाठी 'एमआयएम', तसेच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीबाबत आपणास विचारणा झाल्याचे मान्य केले. मात्र, आपल्यापुढे त्यांच्यासह तिसरा महाज, जनसुराज्य असे सर्व पर्याय खुले असून, हज यात्रेवरून आल्यावर याविषयी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा मर्चंट बँकेच्या शाखेला ठोकले कुलूप नामपूर, : सटाणा मर्चेन्ट बँकेच्या नामपूर शाखेत गेल्या दोन वर्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नामपूर

नामपूर बाजार समितीची एक कोटी रुपयांची दोन वर्षांपासून अडकलेली ठेव परत मिळविण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने सटाणा मर्चंट बँकेच्या नामपूर शाखेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश गुरव यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन ३० एप्रिल २०१५ रोजी नामपूर येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. विभाजनाच्या अधिसूचनेनुसार, नामपूर बाजार समितीची एक कोटी रुपयांची ठेव सटाणा मर्चंट बँकेच्या नामपूर शाखेत ठेवण्यात आली. ते पैसे २०१७ पासून परत मिळविण्यासाठी बाजार समिती प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु, बँक प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

आंदोलनप्रसंगी सभापती हेमंत कोर, उपसभापती अविनाश निकम, संचालक संजय भामरे, कृष्णा भामरे, भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम निकम, लक्ष्मण पवार, आनंदा मोरे, भाऊसाहेब कांदळकर, डी. डी. खैरनार, अविनाश सावंत, दीपक पगार, मधुकर चौधरी, चारुशीला बोरसे, चंद्रभागा शिंदे, सचिन मुथा, दत्तू बोरसे, सचिव संतोष गायकवाड यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

बँकेची आज बैठक

आपल्या हक्काची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बाजार समिती संचालकांनी शुक्रवारी सटाणा मर्चंट बँकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत बँक प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे ठेवी परत करण्याबाबत बँक प्रशासनातर्फे शनिवारी (दि. ३) तातडीची बैठक घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएनपी’साठी पंतप्रधानांना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या काळात नाशिकरोड येथील करन्सी प्रेस नोट आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसने चांगले काम केले असल्याचा दाखला देत सीएनपी आणि आयएसपीचे मंजूर झालेले आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे साकडे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत जगदीश गोडसे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोंदीची भेट घेऊन सीएनपी आणि आयएसपीचे आधुनिकीकराणाचा विषय तत्काळ मार्गी लावण्याचे साकडे घातले. पंतप्रधानांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले. इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी प्रेस नोटमधील यंत्रे जुनी झाल्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे मजदूर संघाच्या वतीने या दोन्ही संस्थांचे आधुनिकीकरण करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या पंचवार्षिकमध्ये आयएसपी आणि सीएनपीच्या आधुनिकीकरणासाठी १४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून नवीन आधुनिक यंत्रणा घेण्याचा निर्णय झाला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५० कोटी रुपये मिळून काम सुरू होणे अपेक्षित असून, उर्वरित कामाला पाच ते सहा वर्षे लागणार आहेत. परंतु, सदरचा निधी अद्याप मिळालेला नाही. नोटाबंदीच्या काळात नाशिकच्या सीएनपीने उत्तम काम करीत २४ तास अहोरात्र उत्पादन सुरू ठेवले. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. एकीकडे गरज वाढली असताना दुसरीकडे मात्र जुन्या यंत्रांमुळे त्रास होत आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या आधुनिकीकरणाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे साकडे गोडसेंनी घातले. दोन मशिन लाइन, बी. पी. एस. न्यूमरोटा, इंन्टॅग्लिओ आदी यंत्रणा मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सीएनपीला भेट देण्याचे आमंत्रणही त्यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत अर्थमंत्रालयाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगत नाशिकला आल्यावर सीएनपीला भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री बनबराव घोलपही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य शिबिरांवर 'वॉच'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी आठ तालुक्यांत घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांवर आता लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी एक अॅप तयार करण्यात येत असून, त्यातून शिबिरांचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. जिल्ह्यात मानव निर्देशांकात असलेल्या तालुक्यांत ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व चार ग्रामीण रुग्णालये आहेत. येथे दर महिन्यात होणाऱ्या दोन शिबिरांसाठी आदिवासी भागात ३६ हजार, तर बिगर आदिवासी भागात २६ हजार रुपये खर्च केले जातात. मानवी जीवन उंचावण्यासाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यांची निवड करण्यात आली असून, येथे आरोग्य व शिक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. दरवर्षी १५ कोटींच्या आसपास हा खर्च असतो. गैरप्रकार टाळण्यासाठी या सर्व शिबिरांची सर्व माहिती असावी, त्यावर लक्ष असावे यासाठी हे अॅप महत्त्वाचे आहे. यात शिबिराची उपस्थिती, डॉक्टरांची हजेरी, फोटो, यांसह इतर माहिती द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षीय मुलीने केले ‘नोर्बू’ सर

$
0
0

नाशिक : नाशिकच्या पंधरा वर्षीय तनया कोळी हिने एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून, त्यासाठी अनेक शिखरांवर ती मोहिमा करीत आहे. तिने नुकतेच हिमालयातील ५,२२६ मीटर उंचीच्या 'नोर्बू' शिखरावर चढाई केली. हे शिखर सर करणारी ती नाशिकमधील पहिलीच युवा गिर्यारोहक ठरली आहे.

सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांची सतरा प्रकरणे अपात्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नापिकी, कर्जबाजारीपणा यांसारख्या कारणांमुळे जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात आजारपण, कौटुंबिक कलहासारखी कारणे असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले असून, ४३ पैकी १७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. १६ प्रकरणे सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी पात्र ठरली असून, १० प्रकरणे प्रलंबित आहेत.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळावा याकरिता सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. परंतु, याकरिता आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा, बँकांचा तगादा, नापिकी यांसारखी कारणे असावी लागतात. १ जानेवारी ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी १६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १७ शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले असून, १० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्येच्या सर्वाधिक १० घटना दिंडोरी तालुक्यात घडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातच नव्हे, तर देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. चालू वर्षात जुलैअखेरपर्यंत ४३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. गतवर्षी १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला होता.

-

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या

-

तालुका आत्महत्या

दिंडोरी १०

मालेगाव ९

निफाड ६

सिन्नर ४

बागलाण ३

नाशिक २

नांदगाव २

त्र्यंबकेश्वर २

चांदवड १

देवळा १

कळवण १

येवला १

पेठ १

एकूण ४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रुझर- ट्रकच्या धडकेतदोन ठार, नऊ जण जखमी

$
0
0

जखमींमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/पेठ

नाशिक रोडवरील राशेगाव शिवारात क्रुझर आणि आयशर ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. क्रुझरचा चालक बाळू शंकर गांगुर्डे (वय २६, रा. पेठ) जागीच ठार झाला, तर कल्पेश दत्तात्रेय बोरसे (३५, रा. पावरापाडा, नाचलोंडी, ता. पेठ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींमध्ये नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले आणि पेठ तालुक्यामध्ये कार्यरत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ येथे कार्यरत असलेले व रोज पेठ-नाशिक प्रवास करणारे कर्मचारी नेहमीप्रमाणे नाशिककडे येण्यासाठी निघाले होते. खासगी क्रुझर (एमएच ०४/डीबी ३३४४) वाहनातून ते नाशिककडे येत असताना मालवाहू आयशरने (एमएच १४/एचजी ३६६६) क्रुझरला धडक दिली. राशेगावजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास पूल ओलांडल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या मालवाहू आयशरने (एमएच १४/एचजी ३६६६) क्रुझरला धडक दिली. या धडकेमुळे क्रुझरचालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर आयशर ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात क्रुझरचा चक्काचूर झाला. यात आयशर ट्रकदेखील उलटला. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी भरपावसात बचावकार्य हाती घेतले. दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, के. के. शिरसाठ, एच. सी. गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. खासगी वाहने, तसेच १०८ अॅम्बुलन्समधून जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. क्रुझरचा चालक गांगुर्डे जागीच ठार झाला. तर बोरसेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघातातील जखमी : अमित भुसावरे (सहाय्यक गटविकास अधिकारी), डॉ. योगिता पगार (३०), पुष्पा अरविंद गीत (५५, झेडपी शाळा केंद्रप्रमुख), शिवकुमार पाल (२६), शिवाजी मल्हार शिंदे (४२), अभिजित सूर्यवंशी (२७, रा. औरंगाबाद), आर्थर जबारण (६१), संजू बाबूराव गांगुर्डे (४०, रा. शेवरी, दिंडोरी), योगेश गणपत गायकवाड (२७, रा. मखमलाबाद, पोलिस कर्मचारी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावा-बहिणीस मारहाण

$
0
0

नाशिकरोड : उपनगर परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने भावा-बहिणीस बेदम मारहाण केली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन ओमचंद काकडा (वय २०, रा. मनपा बिल्डिंग, महाराष्ट्र हायस्कूलजवळ, उपनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बहीण वर्षा, दीपा व कविता या घराजवळ उभ्या असताना अमन लोट, आकाश लोट, अन्नू रिडलॉन, संदेश रिडलॉन, सल्लू रिडलॉन आदींनी मागील भांडणाची कुरापत काढली. सचिन त्यांना समजावून सांगत असताना, त्यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images